health-fitness-wellness

खडीसाखर आहे गुणकारी; खडीसाखरेच्या सेवनाने रोग राहतील दूर, उन्हाळ्याच्या दिवसांत अधिक लाभदायी

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : घरगुती उपायांतून अनेक आजार सहज बरे होऊ शकतात. जुनी-जाणती माणसे कोणत्याही आजारावर घरीच औषध शोधून काढायची. घरात असे अनेक पदार्थ असतात ज्यांच्यामध्ये दुर्धर आजारांशी लढण्याची ताकद असते. आबालवृद्धांसह साऱ्यांच्या आवडीची खडीसाखरही अशीच गुणकारी आहे. घराघरांमध्ये सहज उपलब्ध असणारी खडीसाखर अनेक औषधी गुणांनी युक्त आहे. कोणत्याही वयातील व्यक्तींसाठी ती फायदेशीर आहे. थंड असल्याने विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत ती अधिक लाभदायी ठरते. परंतु, इतरही ऋतूंमध्ये खडीसाखरेचे सेवन आरोग्यदायीच आहे. जाणून घेऊया त्याबाबत...

खडीसाखर प्रत्येकाच्या घरी असतेच. खडीसाखरेचे खडे ओबडधोबड आकाराचे असतात. रिफाइंड साखरेपेक्षा कमी गोड असलेली खडी साखर तुमच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. आयुर्वेद शास्त्रातील अनेक औषधांमध्ये खडीसाखरेचा वापर केला जातो. रिफाइंड साखर खाणे आरोग्यासाठी हितकारक नसले तरी खडीसाखर काही प्रमाणात खाण्यास काहीच हरकत नाही. विशेष म्हणजे खडीसाखरेत रिफाइंड साखरेपेक्षा कमी प्रमाणात कॅलरीज असतात. यासाठीच खडीसाखरेचे फायदे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

खडीसाखरेत अनेक पोषक घटक असतात. आयुर्वेदानुसार खडीसाखर थंड गुणधर्म असलेली आणि वात, पित्त, कफ यांचे संतुलन राखणारी आहे. रोज वापरल्या जाणाऱ्या साध्या साखरेपेक्षा खडीसाखर केव्हाही उत्तमच. कारण खडीसाखरेत व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अमिनो ॲसिड असतात.

भाज्यांमध्ये अतिशय दुर्मिळ असलेले व्हिटॅमिन बी १२ खडीसाखरेतून मिळू शकते. एका पंधरा ग्रॅंमच्या खडीसाखरेतून तुमच्या शरीराला जवळपास ६० कॅलरीज मिळतात. त्यामुळे मर्यादित प्रमाणात खडीसाखर उपयोगाची नक्कीच आहे. यासाठी खडी साखरेचे फायदे जाणून घेणे गरजेचे आहे.

घशातील इन्फेक्शन, खोकल्यावर गुणकारी

जर तुम्हाला सतत कफ अथवा खोकल्याचा त्रास होत असेल तर तुम्ही खडीसाखरेचा वापर करू शकता. जर तुम्हाला सतत खोकल्याचा त्रास होत असेल तर खडीसाखर अथवा पत्री खडीसाखर तुमच्या जवळ ठेवा. खोकला सुरू झाल्यावर तोंडात खडीसाखरेचा तुकडा ठेवा. ज्यामुळे तुमचा खोकला थोडावेळ थांबेल. खडीसाखर चावून खाऊ नका. खडीसाखर फक्त तोंडात ठेवा. ज्यामुळे तुमचं घशाचं इनफेक्शन कमी होईल. शिवाय खडीसाखर आणि आल्याचा रस एकत्र करून घेतल्यास तुम्हाला खोकल्यापासून नक्कीच आराम मिळेल.

हिमोग्लोबीनची कमतरता असलेल्यांसाठी अमृत

खडीसाखरेमुळे तुमच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते. जर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर दुधातून खडीसाखर घेतल्याचा नक्कीच चांगला फायदा होईल. अशक्त लोकांनी नेहमी त्यांच्याजवळ खडीसाखर ठेवावी. ज्यामुळे जेव्हा अचानक थकवा जाणवेल तेव्हा खडीसाखर तोंडात ठेवावी. खडीसाखरेचा उपयोग केवळ मुखवासासाठी नाही तर अन्नाचे योग्य पचन व्हावे यासाठीही करू शकता. जेवणानंतर बडीसोप आणि खडीसाखर खाण्याची पद्धत आहे. यामुळे तुमची पचनसंस्था मजबूत होते. जेवणानंतर खडीसाखर खाल्ल्याने अन्न लवकर पचते आणि अपचनाच्या समस्या कमी होतात.

नाकातून रक्त येण्याचा त्रास होतो कमी

तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही की खडीसाखरेमुळे नाकातून होणारा रक्तस्त्राव त्वरित थांबू शकतो. बरेचदा अनेकांना उन्हाळ्याच्या दिवसांत नाकातून रक्त येण्याचा त्रास होत असतो. अशावेळी तोंडात एखादा खडीसाखरेचा खडा टाकणं फायद्याचं ठरेल. उन्हाळ्यात पाण्यात खडीसाखर टाकून ते पाणी पिण्यामुळे फायदा होऊ शकतो. खडीसाखर खाण्यामुळे तुमची दृष्टी सुधारते. जेवणानंतर अथवा दोन जेवणाच्या मध्ये जर तुम्ही खडीसाखरेचे पाणी प्यायले तर तुमचा दृष्टीदोष कमी होतो. शिवाय मोतीबिंदूपासून तुमचा बचाव होतो. जर तुम्हाला खडीसाखरेचे चांगले फायदे हवे असतील तर खडीसाखरेची पावडर करून वापरा.

सततच्या तोंड येण्यावर गुणकारी

खडीसाखरेमुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते. म्हणूनच जर तुमचे सतत तोंड येत असेल तर खडीसाखरेचा खडा तोंडात ठेवा. ज्यामुळे तुमचा त्रास कमी होईल. शिवाय तोंड येण्यामुळे होणारी जळजळ आणि दाहही कमी होण्यास मदत होईल. आजकाल अनेकांना किडनी स्टोन अथना मूतखड्याचा त्रास जाणवत असतो. मूतखड्यावर घरगुती उपचार करण्यासाठी तुम्ही खडीसाखर वापरू शकता. आयुर्वेदानुसार खडीसाखरेमुळे मूतखडा विरघळून पडून जातो. यासाठीच जर तुम्हाला मूतखड्याचा त्रास असेल तर नियमित कांद्याच्या रसासोबत खडीसाखर घ्या.

संकलन आणि संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT