बदलत्या जीवनशैलीचा आणि आहारपद्धतीचा परिणाम हळूहळू लहान मुलांवरही होताना दिसत आहे. गेल्या काही काळात अनेक लहान मुलांना ब्लड कॅन्सर झाल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाही तर ५ ते १४ वयोगटातील असंख्य मुलांचा मृत्यू ल्युकेमिया म्हणजेच बल्ड कॅन्सरमुळे झाला आहे. याविषयी the Journal of Indian Paediatrics च्या अहवालातदेखील नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळेच मुलांमध्ये ब्लड कॅन्सरची लक्षण दिसल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. त्यापूर्वी लहान मुलांमधील ब्लड कॅन्सरची लक्षण कोणती ते पाहुयात. (symptoms of childhood blood cancer or leukaemia)
१. जखम होऊन रक्त वाहणे -
ज्या मुलांना ल्युकेमिया झालेला असतो त्या मुलांमध्ये साधारणपणे ही समस्या निर्माण होते. किंचितसं खरचटलं किंवा कापलं तरीदेखील लगेचच जखम होऊन त्यातून मोठा रक्तस्राव होऊ लागतो. यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे शरीरातील लहान रक्तवाहिन्यांवर इंटर्नल ब्लिडिंग होणं. जर इंटर्नल ब्लिडिंग होत असेल तर मुलांना लागल्यावर लगेच त्याची जखम होऊन रक्तस्राव होऊ लागतो.
२. पोटदुखी-
पोटदुखी किंवा भूक न लागणे ही खरं तर सगळ्याच लहान मुलांमधील सर्वसामान्य समस्या आहे. परंतु, मुलांचं पोट वारंवार दुखत असेल तर अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण कॅन्सर सेल्समुळे पचनसंस्थेतील यकृत, किडनी या सारख्या अवयवांवर परिणाम होतो. त्यामुळे भूक न लागणे, वजन कमी होणे, पोटात जळजळ होणे असा समस्या निर्माण होतात. तसंच ब्लड कॅन्सर झालेल्या मुलांचं वजनही झपाट्याने कमी होत असतं.
३. सांधेदुखी -
उतारवयामध्ये सांधेदुखीची समस्या निर्माण होते हे साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, ज्या मुलांना ब्लड कॅन्सर झालेला असतो त्या लहान मुलांमध्येही सांधेदुखीची समस्या जाणवू लागते. रेड ब्लड सेल्सची निर्मिती bone marrow मध्ये होत असल्यामुळे ल्युकेमियामुळे रेड ब्लड सेल्सच्या निर्मितीला वेग येतो. ज्यामुळे हाडांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त सेल्सची निर्मिती होऊ लागते. परिणामी, सांधे दुखू लागतात.
४.सूज येणे -
लहान मुलांमध्ये ब्लड कॅन्सर फोफावत असेल त त्यांच्या हात, मान या सारख्या भागावर सूज येऊ लागते. lymph nodes मधून रक्त फिल्टर होत असतं. परंतु, काही वेळा अतिरिक्त रक्त lymph nodes मध्ये जमा होतं.ज्यामुळे शरीरावर सूज येते.
५. सतत ताप येणे -
मुलांना ताप येणं ही काही नवीन गोष्ट नाही. परंतु, मुलांना वारंवार ताप येत असेल तर त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण, ल्युकेमिया असलेल्या मुलांना व्हायरल आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शन लवकर होण्याची शक्यता असते. त्यातच व्हाईट ब्लड सेल्स अशक्त झाल्यामुळे त्या या इन्फेक्शनला रोखूदेखील शकत नाहीत. त्यामुळे मुलांना वारंवार ताप येऊ शकतो.
६. चिडचिड करणे -
ब्लड कॅन्सर झालेली मुलं प्रमाणापेक्षा जास्त चिडचिडे होतात. लहान लहान गोष्टींमध्ये त्यांना राग येतो व ती चिडतात.
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.