asafoetida 
health-fitness-wellness

एक चिमूटभर हिंगचे आरोग्यास बरेच फायदे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आतापर्यंत तुम्ही फक्त डाळ आणि भाजी बनवता तडका मारण्यासाठी हिंग वापरत असाल बरोबर ना. हिंग हा पदार्थ बहुतेक सर्वांच्याच स्वयंपाकघरामध्ये सहज सापडणारा आणि दररोजच्या स्वयपांकामध्ये वापरले जाते. याच्या वापराने आमटी-भाजीची लज्जत वाढतेच, पण त्याशिवाय हिंगाचे सेवन आरोग्याच्या दृष्टीनेही चांगले आहे. या एक चिमूटभर हिंगचे तुमच्या आरोग्यास फायदे मोठ्या प्रमाणात आहे. तुमचे पोटदुखीपासून ते कान दुखण्यापर्यंत काही त्रास सुरु असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता. चला तर मग त्याचे फायदे जाणून घेऊया.

आपल्या आजूबाजूला अनेकांना मसालेदार पदार्थ खायला खूप आवडतात. त्याशिवाय भाजीला चवच येत नाही. मसाल्यातील एक पदार्थ तो म्हणजे हिंग. हिंग केवळ पदार्थांचा स्वाद वाढत नसून त्याचे अनेक फायदेही अनेकांना माहित नाहीत. हिंगचे नाव घेताच एखाद्याला चाट, भेळ, पराठे, सॅन्डविच आणि पाणीपुरीच्या पाणीची आठवण आली असेल. हिंग हे सर्दी, अपचन आणि इतर रोगांसाठी प्रभावी औषध आहे. या व्यतिरिक्त हिंगचे बरेच फायदे आहेत.

पोटदुखीपासून मुक्ती 

बर्‍याच दिवसांपासून पोटाच्या समस्येसाठी हिंग वापरले जात आहे. हिंगमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. अँसिडिटी आणि पोट दुखत असल्यास हिंग घेणे खूप फायदेशीर आहे.

डोकेदुखीपासून आराम

सर्दी आणि मायग्रेनमुळे उद्भवलेल्या डोकेदुखीमध्ये हिंगचा उपयोग केल्याने आराम मिळतो. हिंगमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात म्हणून ते डोक्याच्या रक्तवाहिन्यांचा दाह कमी करते, ज्यामुळे वेदना कमी होतात.

रक्तदाब नियंत्रित करते 

हिंगमध्ये कोमॅरिन नावाचा पदार्थ आढळतो. हे केवळ रक्त गोठवण्यापासून प्रतिबंधित करते, तसेच रक्त सौम्य देखील करते. हे रक्तदाब (ब्लड प्रेशर) नियंत्रित करण्यात मदत करते.

कान दुखी असल्यास त्यास फायदेशीर

हिंगमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बायोटिक गुणधर्म असतात. कान दुखत असेल तर हिंगचा वापर केल्यास आराम मिळतो. यासाठी दोन चमचे नारळ तेल एका छोट्या पॅनमध्ये गरम करा. गरम झाल्यावर त्यात एक चिमूटभर हिंग घाला आणि फोडणीनंतर कोमट होण्यासाठी ठेवा. त्यानंतर हे तेल ड्रॉपरच्या मदतीने किंवा इतर कोणत्याही प्रकारे कानात घाला. यामुळे आपले कान दुखण्यापासून काही मिनिटांत आराम मिळेल.

स्किन इंफेक्शन झाल्यास फायदेशीर

स्किनला खाज होत असल्यास यासारख्या त्वचेच्या आजारासाठी हिंग खूप फायदेशीर आहे. स्किनच्या आजारांमध्ये हिंग पाण्यात मिक्स करून लावल्यास त्याचा उत्तम फायदा होतो. हींग हे गरम असल्यामुळे जास्त प्रमाणात सेवन करू नये. आपण मसाल्याच्या रूपात कमी प्रमाणात नियमितपणे हिंगचा वापर  करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Ashok Kharat : कॅप्टन खरातकडून पंचवीस वर्षांपासून अंधश्रद्धेला खतपाणी! 'सकाळ'ने वृत्तमालिकेद्वारे भोंदूगिरीवर टाकला होता प्रकाशझोत

IPL 2026 New Rule : १५ नवीन नियम... BCCIने खेळाडू, त्यांचे कुटुंबिय अन् फ्रँचायझीची डोकेदुखी वाढवली; चुका केल्यास कठोर कारवाई

धुरंधर ते नॅशनल क्रश झालेल्या उझैर बलोचची 'ही' आहे गर्लफ्रेंड, अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट, म्हणाली...'आता दुनिया तुझ्यासाठी...'

Investment: भारतात गुंतवणुकीची क्रांती! 84% भारतीय आणि 56% महिला आता स्वतः घेतात आर्थिक निर्णय

Farsawale Baba Death: गोरक्षकांना मिळणार 'शस्त्र परवाना' आणि विशेष सुरक्षा कवच; काय आहे योगींचा गोतस्करांविरुद्ध 'सीक्रेट' मास्टरप्लॅन?

SCROLL FOR NEXT