Fitness
Fitness Sakal
health-fitness-wellness

हेल्दी फूड : फिटनेस एक सवय, ध्यास नव्हे...

शौमा मेनन

आपल्याला ज्या गोष्टी कराव्या वाटतात, त्या सध्याच्या कोरोना लॉकडाउनच्या काळात करणे शक्य होत नाही. त्यामुळे आपली मानसिक अवस्था फारशी चांगली नाही, हे खरे आहे. बाहेर फिरायला जाणे, काहीतरी चांगले खाऊन येणे, मित्रांना भेटणे व एकंदरीतच गोष्टी साजऱ्या करणे शक्य नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, या कठीण कालखंडातही तुम्हाला चांगल्या वाटणाऱ्या आणि तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टींभोवती तुमचा दिनक्रम गुंफणे अतिशय आवश्यक आहे. तुमच्या आरोग्यपूर्ण दिनक्रमासाठी काही टिप्स...

  • तुमचा दिवस आरोग्यपूर्ण निर्धाराने सुरू करा : यामध्ये तुमच्या आवडीच्या वर्कआउटचा समावेश होऊ शकतो. तो एखादा खेळही असू शकतो किंवा नृत्यप्रकारही. त्यातल्या त्यात चांगला प्रकार म्हणजे दमसास वाढविणारे व्यायाम प्रकार आणि वेट ट्रेनिंग करणे.

  • जेवणाचे नियोजन : मी यावर आता फार जास्त जोर देऊ इच्छित नाही. मात्र, तुम्ही तुमच्या दररोजच्या जेवणाचे नियोजन केले नाही, तर तुम्ही जंक फूड अधिक खाल व तुमच्या फ्रिजमध्ये केवळ तेच भरलेले असेल. त्यामुळे तुम्ही काय नाश्ता करणार आहात, दुपारच्या जेवणाचा मेन्यू काय आहे व रात्री तुम्ही काय खाणार आहात याचे योग्य नियोजन अनिवार्य आहे.

  • कार्यरत राहा : तुमच्या कामाच्या टेबलावर बसून राहणे टाळा. आजूबाजूला थोडे चालत राहा. कामातून छोटे छोटे ब्रेक घ्या. तुमच्या खोलीच्या बाहेर पडा. आजूबाजूला थोडे पाहा आणि शक्य असल्यास थोडे नाचा!

  • ‘व्हिटॅमिन डी’चा खुराक घ्या : तुम्ही टेरेसवर जाऊन व्यायाम करण्याची हाच योग्य काळ आहे. सकाळच्या उन्हात थोडा काळ घालवा आणि पाहा दिवसभर तुम्हाला कसे छान आणि फ्रेश वाटते!

  • दिवसभराची डायरी लिहा : तुम्हाला काय करायचे आहे याची यादी करत राहिल्यास तुम्हाला प्राप्त करण्याच्या गोष्टी खूपच परिणामकारतेने मिळतात, हे तुमच्या लक्षात येईल. त्यासाठी डायरी लिहिणे गरजेचे आहे.

या छोट्या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील आणि त्यातून तुम्ही तुमच्या सवयी बदलून छान आयुष्य जगायला सुरवात कराल, या अपेक्षेसह....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT