Healthy Food
Healthy Food Sakal
health-fitness-wellness

हेल्दी फूड : वजन वाढविणारे ‘हेल्दी फूड’!

शौमा मेनन

या शीर्षकातील विरोधाभास वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असणार! मात्र, हे सत्य आहे. नमस्कार वाचकांनो, तुम्ही घरातच राहत असाल आणि सुरक्षित आहात ही अपेक्षा करते.

आपण सर्वजण या महामारीच्या काळात आरोग्यपूर्ण अन्नाचे (हेल्दी फूड) सेवन नक्कीच करात असाल. मात्र, पुढे काही पदार्थांची यादी देत आहे, जे तुमच्या आहारात अधिक प्रमाणात आल्यास तुमच्या वजन कमी करण्याच्या ध्येयामध्येच नक्कीच अडथळा निर्माण होऊ शकतो. चला तर, अशा पदार्थ्यांची यादी पाहूयात.

नट्स (शेंगदाणे)

होय, तुम्ही बरोबर वाचलेत! नट्स हे फॅट्सचा (मेदाचा) खूप मोठा स्रोत आहे व त्याचा ‘मायक्रो काउंट’ तब्बल ९ ग्रॅम आहे. आरोग्यपूर्ण आहेत, हा गैरसमज करून घेत ते मोठ्या प्रमाणावर खाल्ल्यास तुमच्या शरीरामध्ये फॅट्स अधिक प्रमाणात जातील व त्याचे अनेक दुष्परिणाम समोर येतील.

फ्रूट ज्यूस

फळे खा, मात्र फळांचा रस काढून त्यातील फायबर बाहेर फेकून देण्याची चूक अजिबात करू नका. फळांचा रस अधिक प्रमाणात घेतल्यास तुमच्या शरीरातील शर्करेचे प्रमाण अत्यंत वेगाने वाढते, हे लक्षात ठेवा.

प्रोटीन बार

प्रोटीन बारमध्ये तुमच्या जिभेला छान वाटावे म्हणून मोठ्या प्रमाणात साखर घातलेली असते. प्रोटीन बारऐवजी दही व फळांचे आहारातील प्रमाण वाढवणे कधीही श्रेयस्कर.

मुसेली

नाश्त्यामधील मुसेलीचा वापर तुमच्यासाठी अजिबात आरोग्यपूर्ण नाही, हे लक्षात घ्या. यामध्ये छुप्या सारखेचे मोठे प्रमाण व पाम तेल असते व त्यामुळेच मुसेलीचा वापर अत्यंत चुकीची निवड ठरते. त्याऐवजी तुम्ही नाश्त्यासाठी काही प्रमाणात अंडी व ताजी फळे घेणे कधीही चांगले.

अतिप्रमाणत धान्यांचा वापर

तांदूळ, गहू व बाजरीचा तुमच्या जेवणाचा मुख्य भाग करण्यामुळे तुमचे वजन वाढू शकते व त्याचबरोबर तुमच्या शरीरात प्रथिने जाण्याचे प्रमाण खूप कमी होऊ शकते. हे दररोजच्या जेवणाचे काही काळासाठी विश्लेषण केल्यानंतर लक्षात येते. त्यामुळे धान्यांचा वापर मर्यादित ठेऊन प्रथिने तुमच्या जेवणाचा मुख्य भाग असू द्या.

निष्कर्ष - तुमच्या घरात सिझनल फळे, भाज्या, तृणधान्ये, नट्स आणि सीड्स यांचा भरपूर साठा नक्की करा, मात्र त्यांचे आहारातील प्रमाण मर्यादितच ठेवा. तुमचे आरोग्य चांगले राहणे व कोरोना लॉकडाउनच्या काळात वजन वाढू नये यासाठी हे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT