sleep 
health-fitness-wellness

Lockdown मध्ये बिघडलं झोपेचं गणित? अशी सोडवा समस्या

सकाळ वृत्तसेवा

सध्या लॉकडाऊन सुरू असले तरी त्यात काही प्रमाणात शिथिलता आली आहे. काही जणांचा दिनक्रम पुन्हा सुरळित झाला आहे. तर काही जण अजूनही वर्क फ्रॉम होम करत आहेत. लॉकडाऊनचा सर्वात जास्त परिणाम हा झोपेवर झाला. या कालावधीत हालचाली मंदावल्यामुळे झोप पुरेशी येईनाशी झाली. घरी असल्याने कामाच्या गतीवर परिणाम झाला. स्क्रीन टाईममध्येही वाढ झाली होती, घरचे खाणे असल्याने जास्त जेवण, आर्थिक अनिश्‍चिततेची काळजी, सतत कोरोनाच्या बातम्या, दुपारची झोप यामुळे झोपेच्या समस्या निर्माण झाल्या होत्या.
आपले शरीर व झोप एका जैविक घड्याळ्यावर चालत असते. अनेकांना उशिरा झोपून उशिरा उठण्याची सवय लागत चालली आहे. सध्या हे जैविक घड्याळच बिघडल्याने लॉकडाऊन संपल्यावर झोपेची समस्या भेडसावू शकते.

हे आवर्जुन करा...

  • घरी असलो तरी आपले उठण्याचे व झोपण्याचे वेळापत्रक निश्‍चित असले पाहिजे.
  • शक्‍यतो लवकर कामावर जाणाऱ्यांनी सकाळी त्याच वेळेत उठण्याची सवय सोडू नये. ती सवय मोडली असेल तर प्रयत्नपुर्वक आधीच्या वेळा पाळण्यास सुरवात करावी.
  • रोज किमान तीस मिनिटांचा घाम निघेल असा शारिरीक व्यायाम घरात करणे गरजेचे आहे. यात दोरीवरच्या उड्या, टेरेसवर जॉंगिग करणे, पुशअप्स, सुर्यनमस्कार असा कोणताही व्यायाम करावा.
  • झोपताना दहा ते पंधरा मिनीटे खोलवर श्‍वास घ्यावा. किंवा श्‍वास घेताना पोट बाहेर येईल व सोडताना आत जाईल या पद्धतीने श्‍वसनाचा व्यायाम करावा.
  • सायंकाळी सहा नंतर शक्‍यतो चहा, कॉफी टाळावी.
  • घरी असला तरी रात्री आठपर्यंत रात्रीचे जेवण टाळावे.
  • झोपण्याआधी दोन तास फोन, टिव्ही, संगणक, लॅपटॉपचा वापर करू नये.
  • झोपताना तळपायांना तिळाचे तेल लावावे.

वेळापत्रक तयार करा. ते नजरेसमोर ठेवा. त्याची कार्यवाही त्यापद्धतीने व्हावी, यासाठी प्रयत्न करा. झोप येत नाही म्हणून सोशल मिडीयावर वेळ घालवू नका. शारिरीक हालचाल, व्यायाम करण्यास प्राधान्य द्या.
- सुखदा आठले, समुपदेशक  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकाटेंच्या राजीनाम्याचा निर्णय तुम्हीच घ्या, खातं कुणाला द्यायचं सांगा; मुख्यमंत्री फडणवीसांनी अजितदादांना स्पष्टच विचारलं

Shivaji Maharaj Video: शिवरायांनी अफजल खानाचा वध कसा केला? महाराजांचे भक्त असाल तर फक्त 7 मिनिटे वेळ काढा, थरारक AI व्हिडिओ व्हायरल

Sangli Miraj Kupwad Politics : जयंत पाटील–विश्वजीत कदम–विशाल पाटील एकत्र; महायुतीचा गेम! दोन माजी महापौरांना लावले गळाला

Latest Marathi News Live Update : महायुतीची ठाण्यात होणार आज बैठक; जागा वाटपांवर होणार चर्चा

Pune Crime News : “मुळशीत पाय ठेवलास तर ‘मुळशी पॅटर्न’ करेन”; व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी

SCROLL FOR NEXT