symptoms and treatment of nasal congestion nagpur news 
health-fitness-wellness

वारंवार नाक बंद होत असेल, तर सावधान! असू शकतो गंभीर आजार; वाचा कारण अन् उपाय

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : आपल्याला जेव्हा सर्दी होते तेव्हा श्वास घ्यायलाही त्रास होते. नाक बुजलेले असते. तसेच अस्थमा नसेल तर त्यासारखी लक्षण जाणवतात. कधी कधी तापामुळे देखील अनकांचे नाक बंद होत असते. घरगुती उपायांमुळे बंद नाक खुले केले जाऊ शकते. मात्र, कधी कधी परिस्थिती गंभीर बनत जाते. चार-पाच दिवस नाक बंद असेल आणि त्यानंतर ठिक होत असेल तर काही धोका नाही. मात्र, ८ दिवसांपेक्षा जास्त दिवस नाक बंद राहत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

का होते नाक बंद?
नाकाच्या आत कोणताही द्रव पदार्थ भरला जातो किंवा नाकात सूजन येते यावेळी नाक बंद होते. सर्दी-ताप आला त्यावेळी देखील नाक बंद होत असते. पण काही दिवसात ते नाक ठीक देखील होते. मात्र, आठ दिवसांपेक्षा अधिक दिवस नाक बंद असेल तर त्यामागे धोकादायक कारणे असू शकतात. 

  • नाकाच्या मार्गात ट्युमर तयार होणे
  • कोणत्या रासायनिक पदार्थांच्या संपर्कात येणे
  • अॅलर्जीमुळे
  • सायनस संक्रमणामुळे देखील नाक बंद होऊ शकते.
  • नाकामधील पडदा तिरपा होता.

अशी समस्या गर्भवस्थेत होऊ शकते. पहिल्या तीन महिन्यामध्ये याचे लक्षणे दिसतात. मात्र, हे हार्मोन बदलामुळे देखील होऊ शकते. त्यामुळे नाक कोरडे पडणे, सूजन येणे तसेच रक्त वाहणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

नाक बंद होण्याचे लक्षणे -

  • वाहणारे नाक किंवा कोरडे नाक
  • सायनसमध्ये दुखणे
  • नाकामधील कोरडेपणा
  • श्वास घेण्यास अडचण
  • नाकात लालसरपणा येणे
  • नाकाजवळ सूजन येणे

अनेकवेळा नाक बंद झाल्यानंतर घरगुती उपाय कामात येत नाही. त्यावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. याशिवाय तीन दिवसांपेक्षा जास्त ताप आणि नाकातून हिरवे पाणी निघत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

घरगुती उपाय -

वाफ घ्या -
एका भांड्यात पाणी गरम करा. पाण्यातून ज्यावेळी वाफ निघायला सुरुवात होईल त्यावेळी एखाद्या कपड्याने ओढून ती वाफ आत ओढा आणि बाहेर सोडा. यामुळे तुमचे बंद नाक लगेच सुरू होईल.

आल्यानं करा नाक साफ -
आल्यामध्ये सूजनविरोधी गुण असतात. सर्दी झाली असेल तर आल्यानं लवकर नाक बरे होते. तसेच आळ्याचा उपयोग हर्बल चहाच्या रुपातही करू शकता. आल्याचा एक छोटासा तुकडा घेऊन पाण्यात उकळा. त्यानंतर टॉवेलन बुडवून चेहऱ्यावर लावा.

गरम सूपमुळे देखील बंद नाक खुलते. दररोज तीन ते चार कप लसूण आणि आल्याने बनवलेला सूप प्या. याशविया नॉनव्हेज सूप देखील पिऊ शकता.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andre Russell Retirement: वेस्ट इंडिजचा 'ऑलराउंडर' आंद्रे रसेलने केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर!

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT