Vasundhara Talware Sakal
health-fitness-wellness

योगा लाइफस्टाईल : कपालभाती प्राणायाम

कोरोना महामारीच्या याकाळात फुफ्फुसांच्या शुद्धीकरणात व श्वसनदोष दूर करण्यात कपालभातीचा मोठा उपयोग होतो.

वसुंधरा तलवारे

कोरोना काळात अनेक रुग्णांमध्ये श्वासाच्या समस्या निर्माण झाल्याचे आपल्या पाहण्यात आले असेलच. कोरोनामुळे निर्माण होणाऱ्या या समस्येवर प्राणायाम हा अत्यंत उपयुक्त व्यायामप्रकार आहे. यामध्ये कपालभाती आणि नाडीशुद्धी प्राणायमांचा खूपच जास्त फायदा होतो. या भागात आपण त्यातील कपालभाती प्राणायामाची माहिती घेणार आहोत.

कोरोना महामारीच्या याकाळात फुफ्फुसांच्या शुद्धीकरणात व श्वसनदोष दूर करण्यात कपालभातीचा मोठा उपयोग होतो. त्यामुळे मज्जासंस्थेमध्ये समतोल साधला जातो व ताकदही वाढते. त्याचबरोबर चयापचयाचे कार्य करणाऱ्या अवयवांच्या कार्यात सुधारणा घडून येते. कपालभातीमुळे नाडीचे शुद्धीकरण होते व ज्ञानेंद्रियांमध्ये निर्माण झालेले अडथळेही दूर होतात. मनाला त्याचे कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळते व डोळ्यावर सारखी झापड येणे बंद होते. तुमच्या प्रतिकारशक्तीला बळकटी मिळून तुम्ही आरोग्यदायी व व ऊर्जावान राहता.

असे करावे कपालभाती...

  • ध्यानधारणेसाठी तुम्हाला सोयीच्या आसनामध्ये बसा. तुमचे डोके व पाठीचा कणा एका सरळ रेषेमध्ये असावा. हात गुडघ्यांवर ठेवावेत. तुम्ही तुमच्या हाताचे पंजे गुडघ्यावर ठेवले, तरी चालेल.

  • डोळे बंद करा व तुमचे संपूर्ण शरीर शिथिल अवस्थेत ठेवा.

  • पोटाचे स्नायू प्रयत्नपूर्वक आत ओढून दोन्ही नाकपुड्यांच्या मदतीने श्वास सोडा. त्यानंतर पोटाचे स्नायू मोकळे सोडून कोणताही प्रयत्न न करता, सहजपणे श्वास आत घ्या.

  • लक्षात घ्या, तुमची श्वास आत घेण्याची प्रक्रिया उत्स्फूर्त व्हायला हवी, त्यासाठी कोणतेही प्रयत्न करू नयेत. ती आपोआप घडणारी प्रक्रिया असावी

  • श्वास आत घेण्याची प्रक्रिया बेंबीपासून व्हावी व त्यावेळी चेहरा व खांदे शिथिल स्थितीत असावेत.

श्वासोच्छ्वास

  • पहिली फेरी - दहावेळा वेगाने श्वासोच्छ्वास केल्यानंतर श्वास खोलवर आत घ्या व सावकाश बाहेर सोडा. श्वास सामान्य स्थितीत येऊ द्या.

  • हे क्रिया पाच वेळा करा.

  • तुम्ही कपालभतीची प्रथमच करीत असल्यास प्रत्येक फेरीनंतर मोकळा श्वास घ्या.

  • सरावाने पोटाच्या स्नायूंमध्ये ताकद येते व नंतर तुमच्या श्वासांची संख्या सुरवातीच्या १० आकड्यांनंतर ५० पर्यंत पोचू शकते.

  • तुम्ही खूप सरावानंतर एका फेरीमध्ये ६० ते १०० वेळा श्वासोच्छ्वास करू शकता.

  • नाकातील अतिरिक्त म्युकस बाहेर काढण्यासाठी प्राणायाम करण्याआधी कपालभातीचा सराव करणे फायद्याचे ठरते.

ही काळजी घ्या

  • कपालभाती करताना पोट रिकामे असावे व खाल्ल्यानंतर ३ ते ४ तासांनीच कपालभातीचा सराव करावा. तुम्ही रात्री उशिरा सराव केल्यास झोप लागण्यात अडचण येऊ शकते.

  • वेदना होत असल्यास किंवा चक्कर आल्यास कपालभातीचा सराव थांबवा व काही वेळासाठी शांत बसा. सराव अधिक जाणीवपूर्वक व बळाचा वापर न करता करा. तरीही त्रास होत राहिल्यास चांगल्या प्रशिक्षकाचा सल्ला घ्या.

हे टाळाच

  • हृदयाचा त्रास, उच्च रक्तदाब, व्हर्टिगो, अपस्मार, ब्रेन स्ट्रोक, हर्निया असणाऱ्यांनी कपालभाती करू नये. महिलांनी गरोदरपणामध्ये कपालभाती करू नये, असा सल्ला दिला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NHAI-Jio safety alert system: ‘हायवे’वरील धोक्यांचा इशारा आता मोबाइलवर आधीच कळणार ; 'NHAI-Jio' मध्ये करार!

मैदानी चाचणी फेब्रुवारीपासून! पोलिस भरतीत एका पदासाठी ८३ उमेदवार; इच्छुकांना रविवारपर्यंत करता येईल अर्ज; १५,६३१ पदांची भरती

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारचं मोठं विधान; कर्मचाऱ्यांची 'ही' मागणी फेटाळून लावली

Pune Voter List : मतदार यादीवर हरकत नोंदविण्यासाठी आज शेवटचा दिवस; हरकतींची संख्या १२ हजाराच्या वर!

Ahilyanagar Leopard Attack : बिबट्याच्या अचानक हल्ल्याने भागूबाई खोडदे यांचा बळी; पारनेर तालुक्यात भीतीचं वातावरण!

SCROLL FOR NEXT