Eye Cataract Sakal
आरोग्य

संवाद : दृष्टी अंधूक करणारा मोतीबिंदू

बाहेरून येणारे प्रकाशकिरण एकत्र येऊन ते डोळ्याच्या आतील पडद्यावर (रेटिना) एकवटून पडण्यासाठी डोळ्याच्या रचनेमध्ये एक भिंग असते.

सकाळ वृत्तसेवा

- आदित्य केळकर

बाहेरून येणारे प्रकाशकिरण एकत्र येऊन ते डोळ्याच्या आतील पडद्यावर (रेटिना) एकवटून पडण्यासाठी डोळ्याच्या रचनेमध्ये एक भिंग असते. बाहुलीचा उपयोग प्रकाशकिरणांची तीव्रता कमी-जास्त करण्यासाठी असतो. वयाच्या चाळिशीपर्यंत खूप दूरवरचे पाहण्यासाठी किंवा दुसऱ्याच क्षणी अगदी डोळ्यासमोर धरलेली वस्तू निरखण्यासाठी या भिंगामध्ये जरुरीप्रमाणे ताकद कमी-जास्त करण्याची योजना असते. सर्वसामान्यतः हे भिंग अतिशय पारदर्शक असते. वृद्धावस्थेत मात्र या भिंगाची पारदर्शकता कमी होते. ते अपारदर्शक होऊ लागते. या प्रक्रियेला मोतीबिंदू सुरू झाला असे म्हणतो.

लक्षणे कोणती?

सुरुवातीला अशा रुग्णांना चाळिशीचा चष्मा काढून वाचता येऊ लागते. मात्र, दूरचे पाहताना सर्व दृश्य अंधूक धुक्यातून पाहिल्यासारखे वाटते. समोरून येणारा माणूस पाच ते दहा फूट अंतरावर येईपर्यंत त्याचा चेहरा ओळखता येत नाही. रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रकाशामुळे वाहन चालविणे अडचणीचे वाटू लागते. मोतीबिंदू वाढत जातो, तशी नजर कमकुवत होते.

मोतीबिंदू सर्वांना होतो का?

वयाची सत्तरी ओलांडलेल्या ९९ टक्के नागरिकांना मोतीबिंदू थोड्या-फार प्रमाणात आढळतोच. काही मुलांमध्ये जन्मतःच हा विकार दिसतो. डोळ्याला इजा पोहोचल्यास स्टेरॉईजसारख्या औषधांचा वापर वारंवार केल्यामुळे मधुमेह असलेल्या काही रुग्णांमध्ये हा विकार लवकर उद्‍भवतो.

शस्त्रक्रिया केव्हा करावी?

प्रत्येक रुग्णाने वैयक्तिक गरजेनुसारच ठरवावे लागते. आपले दैनंदिन व्यवहार पार पाडण्यास नजरेची असमर्थता जाणवताच शस्त्रक्रिया करावी. मात्र, मोतीबिंदू पिकल्यावरही शस्त्रक्रिया न केल्यास डोळ्याचा ताण वाढून काचबिंदूमुळे दृष्टी कायमची जाण्याची शक्यता असते.

शस्त्रक्रियेचे प्रकार

एक्स्ट्रा कॅप्सूलर कॅटरॅक्ट एक्स्ट्रॅक्शन : या शस्त्रक्रियेत डोळ्यात १० ते १२ मिलिमीटरचा छेद घेऊन त्यातून अखंड मोतीबिंदू बाहेर काढला जातो. त्या ठिकाणी उर्वरित पटलावर भिंगाचे प्रत्यारोपण केले जाते. त्यानंतर दिलेला छेद बंद करण्यासाठी टाके घातले जातात.

स्मॉल इन्सिजन कॅटरॅक्ट सर्जरी : या प्रकारामध्ये सहा ते आठ मिलिमीटरचा छेद दिला जातो. मोतीबिंदू काढून त्या ठिकाणी लेन्स टाकली जाते. या प्रकारात शक्यतो टाके घ्यावे लागत नाही.

फेकोअमल्सीफिकेशन : या प्रकारामध्ये डोळ्यासमोरील पारदर्शक भाग म्हणजेच बुबुळावर २.८ मिलिमीटरचा छेद दिला जातो. त्याद्वारे अत्याधुनिक तंत्राच्या साहाय्याने मोतीबिंदूच छोटे-छोटे तुकडे करून त्यास बाहेर काढले जाते आणि त्याच छिद्रातून कृत्रिम भिंगाचे रोपण केले जाते. यामध्ये भिंग बाहुलीच्या मागे दृष्टिमणीच्या जागी ठेवले जाते.

मायक्रो फेकोइमल्सीफिकेशन : बुबुळावर १.८ ते २.२ मिलिमीटरचा छेद दिला जातो. त्याद्वारे अत्याधुनिक तंत्राच्या साहाय्याने मोतीबिंदूचे तुकडे करून तो बाहेर काढला जातो. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे डोळ्यांना अधिक सुरक्षितता मिळते. तेथील छेद भरून येण्यासाठी कमी कालावधी मिळतो. त्यामध्येही भिंग बाहुलीच्या मागे दृष्टिमणीच्या जागी ठेवले जाते.

फेम्टो लेसर असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरी : या प्रकारात लेसरच्या साहाय्याने छेद घेतला जातो. मोतीबिंदूवरील पारदर्शक पापुद्रा लेसरच्या साहाय्याने काढून मोतीबिंदूचे तुकडे केले जातात. ही प्रक्रिया सर्वाधिक सुरक्षित मानली जाते.

झेप्टो असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरी : या प्रकारात मोतीबिंदूचा पापुद्रा निटिनॉल रिंगच्या साहाय्याने काढून नंतर त्याचे छोटे तुकडे करून बाहेर काढतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

Iran Hormuz Strait Toll : इराणने हॉर्मूझच्या सामुद्रधुनीवर सुरु केला टोलनाका; एक जहाज सोडण्याचे घेत आहे तब्बल 'इतके' कोटी

Chiplun Crime : प्रेयसीसाठी मृतदेहाची लावली विल्हेवाट? हाडांच्या तुकड्यांनी उघड केलं 4 लाखांच्या बदल्याचं भयंकर गुपित, मुंबईतील महिलेला अटक

'ते ज्येष्ठ आहेत म्हणून मी घाबरलं पाहिजे असं...' प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांबद्दल बोलताना म्हणाली...'मी कोणालाच घाबरत...'

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावरील शिवसमाधी परिसरात लावलेला अनधिकृत बोर्ड रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी काढून टाकला

SCROLL FOR NEXT