Maharashtra’s First AI Heart Diagnosis System to Give Report in Just 2 Minutes sakal
आरोग्य

AI For Heart Disease Detection: हृदयरोग निदानासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत; अवघ्या दोन मिनिटांत मिळणार अचूक रिपोर्ट

How AI is used in Heart Disease Diagnosis: महाराष्ट्रात हृदयरोग निदानासाठी एआय तंत्रज्ञानाची नवी सुरुवात; अवघ्या दोन मिनिटांत अचूक चाचणी अहवाल.

सकाळ वृत्तसेवा

थोडक्यात:

  1. हृदयरोगाचा धोका ओळखण्यासाठी एआय-आधारित प्रणाली विकसित करण्यात आली असून, ती अवघ्या दोन मिनिटांत परिणाम देऊ शकते.

  2. मुंबईतील खासगी रुग्णालयात राज्यातील पहिलं एआय-सक्षम हृदयरोग प्रतिबंधक मॉडेल लॉन्च करण्यात आलं आहे.

  3. या प्रणालीमुळे हृदयरोगाची लक्षणं दिसण्यापूर्वीच जोखीम ओळखून वेळीच प्रतिबंधात्मक उपाय करता येणार आहेत.

Maharashtra’s First AI Heart Diagnosis System: लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका ओळखण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)च्या मदतीने एक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ज्याच्या मदतीने हृदयविकाराचा धोका दोन मिनिटांत ओळखता येणार आहे. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात शनिवारी (ता. १९) राज्यातील पहिले एआय-सक्षम हृदयविकार प्रतिबंधक मॉडेल लॉन्च करण्यात आले आहे.

एआयचे संस्थापक नमन गोसालिया यांच्या म्हणण्यानुसार २,०३५ लोकांवर हा अभ्यास करण्यात आला. त्यापैकी ६२ टक्के लोक हृदयरोगाच्या उच्च जोखीम श्रेणीत, तीन ते पाच टक्के लोक कमी जोखीम श्रेणीत आणि उर्वरित लोक मध्यम जोखीम श्रेणीत आढळले. तर या लोकांमध्ये आजाराची लक्षणे नव्हती.

तर ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अजित देसाई म्हणाले, की हृदयरोग लाखो भारतीयांना प्रभावित करतो आणि बहुतेकदा त्याचे निदान उशिरा होते, म्हणूनच वेळेवर प्रतिबंध करण्यासाठी पुढाकार घेत जसलोक रुग्णालय अँड रिसर्च सेंटरने देशातील पहिले एआय-आधारित ‘डॉक्टर असिस्टंट अँजाइना एक्स एआय’ लॉन्च केले आहे. लवकरच हा उपक्रम सरकारी रुग्णालयातही सुरू केला जाणार आहे.

चाचणीसाठी १०८ रुपयांचे शुल्क

पद्मभूषण आणि रुग्णालयाच्या कार्डिओलॉजी विभागाचे संचालक डॉ. अश्विन बी. मेहता म्हणाले, की प्रगत एआयच्या मदतीने आपण नुकसान सुरू होण्यापूर्वीच जोखीम मूल्यांकन करू शकतो. हृदयरोगाचा धोका लक्षणे दिसण्यापूर्वी काही मिनिटांतच मोजता येतो. यासाठी फक्त १०८ रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे.

FAQs

  1. हृदयरोगाचा धोका ओळखण्यासाठी नवीन कोणती प्रणाली वापरण्यात येत आहे? (What is the AI-based heart disease detection system and how does it work?)
    लोकांमध्ये हृदयरोगाचा धोका ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence - AI) आधारित प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ही प्रणाली अवघ्या दोन मिनिटांत हृदयविकाराचा धोका ओळखते.

  2. ही प्रणाली प्रथम कुठे सुरू करण्यात आली आहे? (Who developed this AI model for heart disease prevention?)

    ही एआय-सक्षम प्रणाली मुंबईतील एका खासगी रुग्णालयात, म्हणजे जसलोक रुग्णालय अँड रिसर्च सेंटरमध्ये, शनिवारी (ता. १९) प्रथमच सुरू करण्यात आली आहे.

  3. या प्रणालीने किती लोकांवर चाचणी करण्यात आली आणि काय निष्कर्ष निघाले? (How accurate is the diagnosis using this AI system?)

    या प्रणालीची चाचणी २,०३५ लोकांवर करण्यात आली, ज्यामध्ये ६२% लोक उच्च जोखीम गटात, ३–५% लोक कमी जोखीम गटात, आणि उर्वरित मध्यम जोखीम गटात आढळले.

  4. या चाचणीची फी किती आहे आणि ती कोणती माहिती देते? (Where can people avail this AI-based heart test and what is the cost?)
    ही चाचणी फक्त ₹१०८ मध्ये उपलब्ध असून, लक्षणं दिसण्यापूर्वीच हृदयरोगाचा धोका ओळखण्यासाठी मदत करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारतीय संघ सेमीफायनलमध्ये! न्यूझीलंडचे पराभवासह आव्हान संपलं; स्मृती मानधना-प्रतिका रावल विजयाच्या नायिका

Raireśhwar Fort Incident VIDEO : रायरेश्वर किल्ला परिसरात दारू पार्टी करणाऱ्या परप्रांतीय तरूणांना शिवप्रेमींकडून चोप!

Ambulance Fire : मध्यरात्री लातूरकडे जाताना ॲम्बुलन्स जळून खाक! डॉक्टरांनी दाखवले प्रसंगावधान, महिलेचा जीव वाचला

Lonar News : समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई! संशयास्पद कंटेनर चालकाजवळ आढळले देशी पिस्तूल व जिवंत काडतुसे

PM Kisan Yojana News: पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याबाबत नवीन अपडेट; जाणून घ्या, २००० रुपये कधी येणार?

SCROLL FOR NEXT