autism 
आरोग्य

सावधान! लहान मुलांच्या हाती मोबाईल देताय, मग 'असा' होईल धोका

मोबाईलमुळे दोन वर्षाच्या आतील मुलांनवर असे लागले परिणाम दिसू

अर्चना बनगे

कोल्हापूर: आज काल धगधगीच्या जीवनामध्ये पालकांना आपल्या पाल्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळच मिळत नाही. विभक्त कुटुंब असल्यामुळे दोघांनाही नोकरी शिवाय पर्याय राहिलेला नाही. गडबडीच्या कामामध्ये अशा वेळेस लहान मुलांच्या हाती मोबाईल सोपवला जातो. मात्र या मोबाईल मुळे दोन वर्षाच्या आतील मुलांनवर आता खूप वेगवेगळे परिणाम घडू लागले आहे. त्यातीलच एक म्हणजे ऑटिझम(स्वमग्नता). त्याचा धोका इतका वाढला आहे की आता १०० बालकांमध्ये ५ टक्के दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

आज सोशल मीडियामुळे ऑनलाईन अनेक वेबसाइट आहेत. ज्यावरती ऑटिझम संदर्भात माहिती उपलब्ध आहे. मात्र खूप सारी माहिती समोर असल्यामुळे यातील कोणती नेमकी माहिती घ्यावी याचा वेध घेता येत नाही. म्हणूनच ऑटिझम म्हणजे काय? त्याची लक्षणे काय? आणि वेळीच त्यावर काय उपाय केला पाहिजे हे जाणून घेऊ या भागातून..

ऑटिझम म्हणजे काय

ऑटिझम म्हणजे स्पेक्ट्रम डिसऑर्डर (एएसडी),. म्हणजे स्वमग्नता. हा एक मनोविकार आहे.ही गुंतागुंतीची मानसिक स्थिती आहे. ज्यामध्ये मुले आपल्याच विश्वात रममाण होतात.

काय येतात अडचणी

सर्वसाधारणपणे आपल्या पंच पंचेंद्रियाच्या साह्याने मेंदूपर्यंत विविध माहितीचे, वस्तूचे संवर्धन होत असते. आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याचा अर्थ लावून शरीराचा प्रत्येक अवयवा मार्फत कृती करत असतो. याउलट ऑटिझम मुलांच्या बाबतीत या संवेदनांचे एकत्रिकरण करणे, अर्थ लावणे व प्रतिक्रिया देणे हे घडत नाही. म्हणून त्यांना बोलण्यामध्ये अडथळा निर्माण होतो.

कशामुळे येते ऑटिझम

स्वमग्नता ही गुंतागुंतीची वैकासिक समस्या असून मेंदूच्या दोषामुळे निर्माण होते.

मुलींपेक्षा मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त असते

75 टक्के केसेसमध्ये अध्ययन क्षमता असू शकते

ही अक्षमता जन्मभर असते.

माहिती असलेली ऑरगॅनिक कारणे Maternal Rubella,Encphalitis,Infantile,Spasms,Tuberous Sclerosis,Birth Trauma

ऑटिझम बाबत गैरसमज

भावनिक कुपोषण किंवा भावनिक ताण तणावाचा परिणाम म्हणून स्वमग्नता येते.

पालकांच्या नकारात्मक किंवा असंवेदनशील वागण्याने स्वमग्नता येते.

हा मानसिक आजार आहे.

काय आहेत लक्षणे

१)एकच गोष्ट सतत पाहणे जसे की टीव्ही, कम्प्युटर, मोबाइल

२) शब्दांची फोड करून न बोलणे

३) एकच शब्द परत परत उच्चार करणे

३) एखाद्या गोष्टीसाठी अट्टाहास करणे

४) वर्तन समस्या

५) दैनंदिन कार्यक्रमात सारखेपणा राखण्यासाठी आवाजवी अट्टाहास

६) खेळामध्ये सहभागाचा अभाव

७) वैयक्तिक मैत्री जोडण्यास अभ्यास

९) बोलताना खाणाखुणा, हातवारे, हावभाव या देहबोलीची उणीव .

अशी घ्यावी पालकांनी काळजी

खरेतर स्वमग्नताची लक्षणे वयाच्या दुसऱ्या वर्षापासून समजण्यास सुरुवात होते. त्याच्या हालचाली इतर मुलांसारखा आहेत की नाही यावर लक्ष ठेवणे. अशा अडचणी आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे. अशावेळी पालकांनी मानसिक दृष्ट्या कमकुवत न होता वेळेस योग्य तो डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मोबाईल चे परिणाम

कोवळ्या वयात लहान मुलांना मोबाईल वापरण्यास दिल्यामुळे त्याच्या मेंदूवर परिणाम होतो. सतत एकटक एकाच दिशेला बघणे यामुळे आजूबाजूच्या आवाजाचा आणि त्या मुलाचा काही संबंध न आल्यामुळे त्याच्या श्रवण इंद्रियां ॉवरती परिणाम होतो. आणि मुले आत्मकेंद्री होण्यास सुरुवात होते.

आज अनेक वेबसाईट वरती ऑटिझम संदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे घाबरून न जाता. माहितीचे अनुकरण करावे तसेच वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डॉ. जयकांता बडबडे, बालरोग तज्ञ व अध्यक्षा दिशा अध्ययन अक्षम मुलांची शाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Force Fighter Jet Crash : राजस्थानात वायुसेनेचे विमान कोसळले, पायलटसह सहकाऱ्यांचाही मृत्यू झाल्याची शक्यता

Goa Crime: पुणेकर पर्यटकाची गोव्यात दादागीरी, गेट बंद केल्याच्या वादातून थेट कारखाली चिरडलं! सुरक्षा रक्षक गंभीर जखमी

Karnataka Politics : कर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर, राहुल गांधीही परदेशातून परतले

Latest Maharashtra News Live Updates: विदर्भात पावसाचा जोर कायम, पुरामुळे बंद झाले 'हे' मार्ग

Inspiring Story:'वयाच्या साठीत ५० हजार किलोमीटर सायकल प्रवास'; चंद्रकांत सूर्यवंशी यांनी निवृत्तीनंतर जोपासला छंद

SCROLL FOR NEXT