Ayurvedic Tips For Piles: Sakal
आरोग्य

Ayurvedic Tips For Piles: 'ही' 2 पाने मूळव्याधाच्या जखमावर रामबाण उपाय, जाणून घ्या तज्ज्ञांकडून वापरण्याची पद्धत

Ayurvedic Tips For Piles: मूळव्याधाचा त्रास कमी करायचा असेल तर आयुर्वेदीक पानांचा वापर करू शकता.

Puja Bonkile

Ayurvedic Tips For Piles: मूळव्याध हा अक सामान्य आजार आहे. जगभरात अनेक लोकांना या समस्येचा त्रास असतो. यात गुदद्वाराच्या नसांना सूज, वेदना आणि खाज सुटते. मूळव्याधावर उपचार करणे अगदी सोपे आहे. औषधांसोबतच मुळव्याधची समस्या काही आयुर्वेदीक उपायांनीही कमी करता येऊ शकते. जर तुम्हाला मूळव्याधांच्या जखमांमुळे खूप त्रास होत असेल तर तुम्ही काही आयुर्वेदिक औषधी वनस्पती वापरू शकता. ज्या मूळव्याधाची समस्यापासून आराम देतात. चला तर मग जाणून घेऊया मूळव्याधाच्या जखमा कोरड्या करण्यासाठी आयुर्वेदीक पानांचा कसा वापर करावा.

कडुलिंबाची पाने

कडुलिंबाच्या पानांचे महत्त्व जवळपास सर्वांनाच माहीत आहे. या पानांमध्ये अँटी-फंगल, अँटीऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल सारखे गुणधर्म असतात. जे सूज आणि वेदना कमी करू शकतात. मूळव्याधांच्या जखमा लवकरात लवकर भरून काढण्यातही हे परिणामकारक ठरू शकते.

कडूलिंबाच्या पानांचा कसा वापर करावा?

सर्वात आधी 200 ग्रॅम कडुनिंबाची पाने घेऊन ती चांगली कोरडी करावी.

नंतर ते बारीक करून त्याचा रस काढा.

रस काढल्यानंतर तो गाळून बाजूला ठेवा.

नंतर रस थंड करायला ठेवा आणि नंतर जखम झालेल्या भागावर लावा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही याचे सेवनही करू शकता.

कोरफड

कोरफडमध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म असतात. कोरफडचा वापर केस, त्वचा निरोगी राहण्यासाठी केला जातो. तसेच अनेक आरोग्यासंबंधित समस्या देखील दूर ठेवण्यास मदत करते. कोरफड जेल मूळव्याधामुळे होणारी जखम कमी करण्यास मदत करते. पण याचा कसा वापर करावा हे जाणून घेऊया.

कोरफड जेलचा कसा वापर करावा?

सर्वात आधी कोरफडीच्या ताज्या पानांपासून गर काढावा.

नंतर गर थेट तुमच्या सुजलेल्या नसांवर लावा.

यानंतर त्वचेवर हळू हळू मसाज करा. ते शोषले जाईपर्यंत मसाज करा.

ही प्रक्रिया दररोज 3 ते 4 वेळा केल्यास मूळव्याधच्या जखमा कमी होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL, Video: CSK विरुद्ध RCB चा सामना विराट कोहलीला सर्वात जास्त का आवडतो? म्हणाला, 'त्यांचे फॅन्स बंगळुरूत....'

Solapur : काँग्रेससह शरद पवारांना धक्का; भगीरथ भालके, अनिल सावंत शिवसेनेच्या वाटेवर; DyCM शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता

सत्ताधारी पक्षाचा नेता तरुणीसोबत नको त्या अवस्थेत; सापडताच कुठे पळू झालं? शेतातून....

Solapur Ambedkar Jayanti: बुद्धिजीवी भीमप्रेमींना साेलापूरात हवीय एकत्रित मिरवणूक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, मध्यवर्तीचा बुधवारी होणार निर्णय!

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

SCROLL FOR NEXT