Bel Patra Benefits esakal
आरोग्य

Bel Patra Benefits : सोमवारी शंकराच्या पिंडीवर वाहिल्या जाणाऱ्या बेल पत्राचे महत्व माहितीये?

बेलाच्या पानांचं जेवढं अध्यात्मिक महत्व आहे तेवढंच आयुर्वेदिक महत्वही आहे. अनेक दूर्धर आजारांवर ते गुणकारी आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bel Patra Ayurvedik Benefits : सोमवार हा भगवान शंकर यांचा वार समजला जातो. या दिवशी शंकराच्या पूजेचं फार महत्व सांगितलं जातं. या दिवशी भाविक लोक मंदिरात जाऊन शंकराच्या पिंडीवर अभिषेक करतात. बेल पत्र वाहतात. बेल पत्र हे भगवान शंकराला प्रिय आहे, ते वाहिल्याने देव प्रसन्न होतो, अशी भाविकांची श्रद्धा असते.

पण तुम्हाला माहित आहे का की, जेवढं या बेल पत्राचं अध्यात्मिक किंवा धार्मिक महत्व आहे, तेवढंच त्याचं आयुर्वेदिक महत्वही खूप आहे. बेल पत्र अनेक दूर्धर आजारांवर प्रभावीरित्या गुणकारी ठरू शकतं असं तज्ज्ञांच मत आहे. जाणून घेऊया महत्व.

बेल पत्राचं आयुर्वेदिक महत्व

  • बेल या वनस्पतीचे जेवढे अध्यात्मिक महत्त्व आहे. तेवढेच आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी आहे.

  • बेलाच्या पानाचा 30ml रस रोज सकाळी उपाशीपोटी पिल्याने मधुमेह नियंत्रणामध्ये राहतो.

  • ️बेलाच्या पानाचा दोन दोन थेंब रस डोळ्यांमध्ये टाकल्याने डोळ्याचे विकार दूर होतात.

  • ️ज्या लोकांमध्ये मानसिक अस्थिरता असते अशा लोकांनी रोज सकाळी उपाशीपोटी बेलाची तीन-चार पाने चावून खावीत.

  • ️दहा-पंधरा बेलाची पाने चेचून एक कप तिळाचे तेल गरम करून घ्यावेत हे तेल कानामध्ये टाकल्याने कानाच्या समस्या दूर होतात.

  • ️बेलाच्या पानाचा रस पिल्याने किडनी व यकृताच्या समस्या दूर होतात.

  • ️कच्चा बेलफळाचा रस पिल्याने पोटाच्या समस्या जसे पोटामध्ये मुरडा येणे पोट दुखणे आतड्यावर सूज असणे अल्सरेटिव कोलाइटिस यासारख्या समस्या दूर होतात.

  • बेल पानाचा रस 30 ते 40 ml सकाळी उपाशीपोटी पिल्याने हृदयाच्या सर्व समस्या निघून जातात व त्याचे कार्य सुधारते.

  • ️बेलफळ हे शरीरातील उष्णता नष्ट करण्यासाठी खूप गुणकारी आहे.

  • बेल पानाचा रस नियमित पिल्याणे शरीरामध्ये रक्त वाढ होते. व कॅन्सरसारख्या आजारापासून शरीराचे रक्षण करते.

  • ️सात ते आठ बेलपान चा एक कप काढा बनवून सकाळी उपाशीपोटी पील्याने शरीरामधील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रनात ठेवते.

  • ️बेलाच्या पानाचा रस ४-५ चमचे सकाळी उपाशीपोटी पिल्याने अपचन गॅसेस मलावरोध यासारख्या समस्या त्वरित नष्ट होतात.

  • ️बेल या वनस्पतीचे पानाचे फळाचे सालीचे मुळीचे अध्यात्म मध्ये वेगवेगळे फायदे आहेत. आरोग्य मध्येही खूप गुणकारी फायदे आहेत. या वनस्पतीचे संवर्धन केले पाहिजे संगोपन केले पाहिजे. आपले आजार नष्ट करण्यासाठी निरोगी राहण्यासाठी वेळोवेळी वापर करावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Ahmedabad Highway: मुंबई-अहमदाबाद महामार्गाला कवच; १३ ठिकाणी स्मार्ट कॅमेरे बसवणार, प्रत्येक वाहनावर करडी नजर राहणार

India squad for World Cup 2027: शुभमन गिल-रोहित शर्मा ओपनर; शमी, भुवीचे पुनरागमन! वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी रवी शास्त्रींनी निवडला भारतीय संघ

Live Updates Marathi : लोकआयुक्त कार्यालयातील १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Rautwadi Waterfall Parking Facility : राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची तुफान गर्दी अन् तासनतास वाहतूक कोंडी! 300-400 वाहनांच्या पार्किंगसाठी 'हा' पर्याय उपलब्ध?

Delhi Protest ला Manoj Jarange Patil यांचा पाठिंबा, काय म्हणाले? | Abhijeet Dipke | CJP

SCROLL FOR NEXT