mustard Oil Sakal
आरोग्य

Healthy Tips: मोहरीच्या तेलात लवंग मिक्स करून लावल्यास 'या' 5 समस्या होतील दूर, असा करा वापर

Healthy Tips: मोहरीचे तेल लवंगात मिक्स करून लावल्यास शरीरातील अनेक समस्या दूर होतात.

Puja Bonkile

Healthy Tips: भारतीय घरांमध्ये स्वयंपाक घरात मोहरीचे तेल आणि लवंगचा वापर केला जातो. हे दोन्ही पदार्थ केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतात. याचे सेवन केल्यास आरोग्याशी संबंधित अनेक आजार दूर राहतात. पण मोहरीच्या तेलात लवंग मिक्स करून लावण्यास कोणते फायदे मिळतात हे माहिती नसेल तर जाणून आज घेऊया.

आयुर्वेदात मोहरीचे तेल आणि लवंग यांचे मिश्रण अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. मोहरीच्या तेलामध्ये जीवनसत्त्वे, फॅटी ऍसिडस्, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी यासारखे अनेक गुणधर्म असतात.

लवंगात अँटीऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. या दोघांचे मिश्रण त्वचेपासून ते केसांपर्यंतच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. चला तर मग घेऊया मोहरीच्या तेलात लवंग मिक्स करून लावल्यास कोणते फायदे मिळतात.

दातदुखी आराम

मोहरीचे तेल आणि लवंग दातदुखीची समस्या कमी करण्यास मदत करते. तसेच हिरड्यांवरील सूज कमी करू शकते. यासाठी मोहरीच्या तेलात लवंग गरम करून दुखणाऱ्या भागावर लावावे. यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळू शकतो.

त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल

मोहरीच्या तेलात लवंग मिक्स करून लावल्यास त्वचेशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. यामुळे त्वचेला संसर्गापासून दूर ठेवतात. त्याच्या वापराने मुरुम, खाज सुटणे आणि त्वचेचे संक्रमण बरे होण्यास मदत होते. यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार राहतो.

सांधेदुखी आणि सूज यापासून आराम मिळतो

मोहरीचे तेल आणि लवंग यांचे मिश्रण सांधेदुखी आणि सूज यापासून आराम देण्यासाठी प्रभावी आहे. यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतात. मोहरीच्या तेलात लवंग मिक्स करून मसाज केल्याने स्नायूंचा ताण आणि इतर शारीरिक वेदनांपासून लवकर आराम मिळतो.

सर्दी, खोकला यापासून आराम मिळेल

लवंग आणि मोहरीच्या तेलाचे मिश्रण खोकला आणि सर्दी कमी करण्यास मदत करते. मोहरीच्या तेलामुळे शरीरात उष्णता निर्माण होते, ज्यामुळे थंडीपासून आराम मिळतो. हे मिश्रण छातीत जमा झालेला कफ बाहेर टाकण्यास मदत करते. ज्यामुळे मोकळा श्वास घेता येतो. सर्दी-खोकल्याचा त्रास असेल तर मोहरीच्या तेलात लवंग शिजवावी. नंतर छाती आणि पाठीवर लावावे आणि मसाज करावी.

मोहरीचे तेल आणि लवंग कसे वापरावे

मोहरीच्या तेलात 3-4 लवंग मिक्स करून गरम करा. यानंतर, हे मिश्रण प्रभावित भागावर लावावे. याचा नियमित वापर करून तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

भारतात सोन्याचं दर कमी होणार? RBI ने देशात परत आणलं १०४ टन सोनं

SCROLL FOR NEXT