Blood Donation sakal media
आरोग्य

Health : प्रत्येक रुग्णाला रक्त देणे शक्य !

सुयोग्य नियोजन : वैद्यकीय समाजसेवक, कर्मचाऱ्यांचे प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुण्यात मे महिन्यात जेमतेम २०० पिशव्या रक्त संकलित होत होते आणि मागणी मात्र हजाराच्या वर होती, त्यामुळे रक्ताचा मागणीप्रमाणे पुरवठा करताना रक्तपेढ्यांची दमछाक होत असे. यंदा प्रथमच शहरात मागणीप्रमाणे प्रत्येक रुग्णाला रक्त देणे शक्य होत आहे, असे निरीक्षण रक्तपेढ्यांतर्फे नोंदविण्यात आले.

शहरात २०२० ते २०२१ पर्यंत कोरोना उद्रेकाचा काळ होता. या काळात रक्ताची मागणी कमी झाली. पण, त्याच वेळी संकलनही अत्यल्प होते. मोठ्या शस्त्रक्रिया होत नव्हत्या. त्यामुळे रक्ताची गरज कमी झाली होती.

मात्र, आता उपचार नियमित सुरू झाले आहे. त्यातून रक्ताची मागणी पुन्हा वाढली आहे. यंदा प्रथमच रक्तदान शिबिरे मे मध्ये व्यवस्थित झाल्याने मागणीप्रमाणे रुग्णाला रक्तपुरवठा करता येत आहे.

डॉ. अतुल जोशी म्हणाले, ‘‘यंदा रक्ताचे नियोजन करताना जूनमध्ये होणारे रक्तदान शिबिरं संयोजकांनी मेमध्ये घेण्याचे आवाहन केले. त्याला संस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.’’

ससून रुग्णालयाचे वैद्यकीय समाजसेवा अधिक्षक डॉ. शंकर मुगावे म्हणाले, ‘‘सध्या रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये पुरेसा रक्तसाठा आहे. पुढील १५ दिवसांनंतर रक्त संकलनासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.’’

केईएम रुग्णालयातील रक्तपेढीचे प्रमुख डॉ. आनंद चाफेकर म्हणाले, ‘‘दरवर्षीप्रमाणे यंदा उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा जाणवत नाही. मागणीप्रमाणे रक्तपुरवठा करता येत आहे.’’

विविध रक्तपेढ्यांमधील वैद्यकीय समाज सेवक, कर्मचाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला, असे डॉक्टरांनी सांगितले.

यंदा काय झाले?

पुण्यातील प्रमुख रक्तपेढ्यांनी मे महिन्यामध्येच रक्तदान शिबिरांचे नियोजन केले, त्यामुळे प्रत्येक आठवड्याला एक रक्तदान शिबिर होईल. त्यातून पुरेशा प्रमाणात रक्तसंकलन होईल, याचे नियोजन रक्तपेढ्यांनी केली.

विविध सेवाभावी संस्था, संघटना यांच्याकडून सदस्यांनी रक्तदानाचे आवाहन केले.

यंदा रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली नाही

शहरात मे अखेरपर्यंत पुरेल इतका रक्तसाठा रक्तपेढीमध्ये आहे. आता जूनमधील रक्तसंकलनाची तयारी सुरू आहे.

- डॉ. अतुल कुलकर्णी, कार्यकारी संचालक, जनकल्याण रक्तपेढी, पुणे

मे महिन्यात काय होते?

उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे महाविद्यालयांमध्ये होणारी रक्तदान शिबिरे बंद होतात. नोकरदार पर्यटनासाठी बाहेर पडतात, त्याचा थेट परिणाम रक्तदानाचे प्रमाण घटण्यावर होतो. गणपती मंडळे, ढोल-ताशा पथके यांच्याकडून रक्तदान शिबिरे आयोजित केली जात होती; पण रक्ताची मागणी वाढल्याने यातून संकलित होणाऱ्या रक्तपिशव्यांची संख्या पुरेशी होत नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT