Apple Benefits  
आरोग्य

Apple Benefits : सफरचंद कोणत्या वेळी खावं? तज्ज्ञ सांगतात सफरचंद रात्री खावं का?

आरोग्यासाठी चांगले असल्याने हे फळ अनेकजण आवडीने खातात.

सकाळ डिजिटल टीम

आरोग्यासाठी चांगले असल्याने हे फळ अनेकजण आवडीने खातात.

Eat Apple at Night : नियमित सफरचंद खाणे शरीरीसाठी पोषक असते. आरोग्यासाठी सफरचंद फायदेशीर आहे त्यामुळे दिवसांतून एकदा तरी एखादं सफरचंद खावं असा सल्ला आहारतज्ज्ञ आणि डॉक्टर देत असतात. कुणी आजारी असले तर त्याच्यासाठी आपण सफरचंदच घेऊन जातो. हे आरोग्यासाठी चांगले असल्याने हे फळ अनेकजण आवडीने खातात.

बऱ्याचवेळा आहारतज्ज्ञ सफरचंद खाण्यासाठी एक ठराविक वेळ देतात. त्याच वेळेला तुम्ही सफरचंद खाल्लं तर कोणतेही साईड इफेक्ट होणार नाहीत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा आरोग्यासाठी घातक ठरु शकतो. तसेच अवेळी सफरचंद खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. एवढेच नाही, तर ही सवय तुम्हाला इतका त्रास देऊ शकते की तुमच्या पोटात तीव्र वेदना होऊ शकतात.

'या'वेळी सफरचंद खाल्ल्याने आरोग्यासाठी तोट्याचे ठरेल..

काही सल्लागार आहारतज्ञ सांगतात की, तुम्ही रात्री अधिक प्रमाणात सफरचंद खाणे टाळले पाहिजे. यामुळे तुमची पचन प्रक्रिया खूप मंद होऊ शकते आणि सफरचंद पचने कठीण होऊ शकते. याचा परिणाम म्हणून तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवू शकतो. याशिवाय गॅसमुळे तीव्र ओटीपोटात दुखू शकते. त्यामुळे सफरचंद सहसा सकाळी खावे. ज्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहिल.

सफरचंद खाण्याचे फायदे -

  • आहारतज्ज्ञांच्या मते, सफरचंद सकाळी आणि दुपारी खावे यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. सफरचंद रात्री ऐवजी सकाळी आणि दुपारी खाल्ल्यास खालीलप्रमाणे फायदे मिळतील.

  • सफरचंदांमध्ये एक प्रकारचे विरघळणारे फायबर असते जे तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल तयार होण्यापासून रोखत असते.

  • जर तुम्ही सकाळी सफरचंद खाल्ले तर त्यात असलेले फायबर तुमच्या पोटासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

  • सफरचंदाच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

  • सफरचंदांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

    आणि व्हिटॅमिन-सी किंवा इतर अनेक रोगांपासून तुमचे संरक्षण करण्याचे काम करतात.

  • मधुमेहाचे रुग्ण सफरचंदाचे सेवन करू शकतात. कारण मधुमेहासाठी सफरचंद हे एक अनुकूल फळ आहे. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ जुलै २०२६

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Loan Waiver : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर! 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांचा समावेश; तुमचे नाव 'या' पोर्टलवर करा चेक

Ashadhi Ekadashi : महापूजेवेळीही भाविकांसाठी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू; पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून 20 किमी अंतरावर, पंढरपुरात 30 लाखांहून अधिक भाविकांचा महापूर

SCROLL FOR NEXT