Cataract Free Mission | Mayo WCL Health sakal
आरोग्य

Cataract Treatment Success: मेयो व डब्ल्यूसीएलच्या करारातून अंधत्वमुक्तीची वाट; दोन महिन्यांत ६१९ रुग्णांना दृष्टीची नवी आशा

Cataract treatment initiative by Mayo and WCL in Maharashtra: मेयो व डब्ल्यूसीएलच्या उपक्रमातून ६१९ रुग्णांना मोतीबिंदूवर यशस्वी उपचार; अंधत्वावर मात करण्याची नवी दिशा.

सकाळ वृत्तसेवा

Vision Restoration Programs For Underprivileged Cataract Patients: केंद्र सरकारच्या मोतीबिंदू मुक्त भारत अभियानाला बळ देण्यासाठी वेस्टर्न कोल फिल्डने सामाजिक उत्तर दायित्वातून इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी (मेयो) सामंजस्य करार केला आहे.

या अभियानातून वेकोलिच्या सहकार्याने मेयो मोतीबिंदू शल्यक्रिया शिबिर राबवीत आहे. वर्षभरात ५ हजार जणांच्या मोतीबिंदू शल्यक्रियेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पहिल्या दोन महिन्यांत ६१९ जणांचे अंधत्व दूर झाले.

ग्रामीण भागात नेत्रतपासणी शिबिरांमधून लाभार्थ्यांची निवड केली जाते. ज्या नागरिकांना मोतीबिंदू आढळेल त्यांना मेयोच्या नेत्र विभागात बोलावून त्यांची अंधत्वातून मुक्तता केली जात आहे.

मेयोचे अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण हे स्वतः नेत्ररोग शल्यचिकित्सक असल्याने त्यांच्या पुढाकाराने वेकोलिसोबत हा सामंजस्य करार करण्यात आला. त्यामुळे वेकोलिने अडीच कोटींचा निधी मेयोच्या खात्यात वळता केला आहे. या निधीतून मोतीबिंदू शल्यक्रियांसाठी लागणारी वैद्यकीय उपकरणे, साहित्य आणि औषधांसोबतच शल्यक्रियेनंतर चष्मा देखील वितरित केला जात आहे.

अशी झाली मोतीबिंदू मुक्ती

  • मार्च २०२५ - ३०२

  • एप्रिल २०२५ - २१९

  • २२ मे २०२५ पर्यंत - ९८

  • एकूण - ६१९

नि:शुल्क शल्यक्रिया

मेयोने चालू वर्षात आतापर्यंत ६१९ जणांच्या नेत्रांमधील मोतीबिंदू दूर केला. या शस्त्रक्रियांपैकी जास्तीत जास्त शस्त्रक्रिया या अद्ययावत फेकोमिल्सिफिकेशन पद्धत व फोल्डेबल लेन्स टाकून केल्या गेल्या. या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना खासगी रुग्णालयात प्रत्येकी किमान १५ त २० हजार रुपये मोजावे लागले असते. मात्र मेयो रुग्णालयाने या सर्व शस्त्रक्रिया मोफत केल्या. यासाठी विभागप्रमुख आणि अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली डॉ. राहुल डगवार, डॉ. सचिन अग्रवाल, डॉ. जयश्री इखार या डॉक्टरांच्या चमूने मोलाचे योगदान दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Election Maharashtra : राज्यसभा निवडणुकीसाठी हालचालींना वेग, भाजप उमेदवार विधानभवनात; शरद पवार, पार्थ पवार अर्ज दाखल करणार

Nagpur Video Viral : संतापजनक! होळी खेळताना अंगावर रंग उडवला म्हणून संतापलेल्या आजीने चार वर्षांच्या नातवावर ओतलं उकळतं पाणी, कमरेखालचा भाग गंभीररित्या भाजला

Latest Marathi News Live Update : पुणे-बेंगलुरु महामार्गावर नवीन कात्र बोगद्याजवळील दरी पुलाजवळ कंटनेर आणि चार वाहनांचा भीषण अपघात

Iran Israel War : इराणवर भारतीय तळांवरून हल्ले? अमेरिकन कर्नलच्या दाव्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचं निवेदन, काय आहे सत्य?

'शुटिंग करताना अचानक मोठे स्फोट झाले अन्...' दुबईत अडकलेल्या लारा दत्तने सांगितला भंयकर प्रसंग, सत्य परिस्थिती सांगताना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT