Chikungunya New Virent:  Sakal
आरोग्य

Chikungunya New Virent: चिकनगुनियाचा नवा प्रकार झपाट्याने वाढतोय, 'ही' 3 लक्षणे दिसल्यास वेळीच व्हा सावध

Chikungunya New Virent: बदलत्या वातावरणात चिकनगुनियाचा धोका वाढत आहे. चिकनगुनियाची लक्षणे कोणती आहेत हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Chikungunya New Virent: हवामानातील बदलामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डास चावल्यामुळे डेंग्यु आणि चिकनगुनियाची प्रकरणे वाढत आहे. यामुळे रूग्णांना सांधेदुखीचा त्रास होतो आणि चालणे अवघड होते. जुलै महिन्यानंतर हा आजार पसरू लागतो.

या आजाराचा त्रास मुलांना आणि वृद्ध लोकांना होऊ शकतो. लहान मुले आणि वृद्धांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी मच्छरदाणी लावावी. घराच्या जवळपास पाणी साचू देऊ नका. साचलेल्या पाण्यात नियमितपणे अळ्या-विरोधी फवारणी करावी. हेल्थ साईटने दिलेल्या माहितीनुसार चिकनगुनियाची लक्षणे कोणती आणि उपाय कोणते याची माहिती दिली आहे.

चिकुनगुनियाचा प्रसार कसा होतो?

चिकुनगुनियाचे विषाणू डासांमुळे पसरत असल्याचे डॉ.निखिल यांनी सांगितले. सामान्यतः, हा रोग एडिस इजिप्‍टी डासापासून डेंग्यू पसरतो. हे डास प्रामुख्याने दिवसा चावतात. हे डास साचलेल्या पाण्यात अंडी घालतात. जेव्हा सामान्य डास एखाद्या व्यक्तीला चावतो ज्याच्या रक्तात आधीपासूनच CHIKV आहे, तेव्हा विषाणू डासांमध्ये देखील येतात. जेव्हा हा डास नवीन व्यक्तीला चावतो तेव्हा त्या व्यक्तीलाही चिकुनगुनियाची लागण होऊ शकते.

प्रमुख लक्षणे कोणती?

  • चिकुनगुनिया डास चावल्यानंतर साधारणतः 4-8 आजाराची सुरूवात होते.

  • यामध्ये अचानक जास्त ताप येतो.

  • यासोबतच हाताच्या आणि पायांच्या जॉईंटमध्ये वेदना होतात.

  • हा त्रास काही दिवस राहतो, परंतु ते काही आठवडे, महिने किंवा वर्षांपर्यंत टिकू शकते.

चिकुनगुनियामुळे मृत्यू होऊ शकतो का?

CHIKV संसर्गामुळे कधीकधी डोळा, हृदय आणि मज्जातंतूंचा त्रास होऊ शकतो. वृद्ध रुग्णांना गंभीर आजार होण्याचा धोका जास्त असतो. प्रसूतीदरम्यान संसर्ग झालेले नवजात आणि आधीच आजाराने पिडित असलेले वृद्ध प्रौढ गंभीरपणे आजारी होऊ शकतात आणि CHIKV संसर्गामुळे मृत्यूचा धोका वाढू शकतो. पण तज्ज्ञांच्या मते एकदा कोणीही या आजारातून बरा झाला की त्याची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. भविष्यातील संसर्गाचा धोका कमी होतो.

चिकुनगुनियाची चाचणी

या आजाराच्या पहिल्या आठवड्यात रक्तातील एजीएम चिकनगुनिया अँटीबॉडीची चाचणी करून चिकनगुनियाचा विषाणू आढळून येतो. ही चाचणी पाच दिवसांनी केली जाते. याच्या दोन-तीन दिवस आधी चाचणी केली तर चिकनगुनिया ओळखणे कठीण होते.

चिकनगुनियावर उपचार आणि लस

डॉक्टरांनी सांगितले की, चिकुनगुनियाच्या सांध्यातील तीव्र वेदना अँटी-पायरेटिक्सने बरं होऊ शकते. यासोबतच जास्त पाणी किंवा ज्यूस पिऊन विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. CHIKV संसर्गासाठी कोणतेही विशिष्ट अँटीव्हायरल औषध नाही.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT