Child Skin Care:  Sakal
आरोग्य

Child Skin Care: लहान मुलांसाठी योग्य स्किनकेअर रूटीन कोणती? वाचा डॉक्टर काय सांगतात

Child Skin Care: लहान मुलांची त्वचा खुप संवेदनशील असते. यामुळे स्किनकेअर रूटिनमध्ये काणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Child Skin Care: लहान मुले स्वत:च्या त्वचेची काळजी घेऊ शकत नाही. यामुळे पालकांना त्याच्या त्वचेकडे लक्ष द्यावे लागते. परंतू अनेक वेळा पालकांना मुलांच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी हे कळत नाही.

लहान मुलांची त्वचा खुप संवेदनशील असते. यामुळे त्वचेची योग्य काळजी घ्यावी लागते. अनेक वेळा मुल आणि पालक देखील नकळत कोणत्याही साबणाचा वापर करतात. ज्यामुळे त्वचेवर पुरळ येतात. यामुळे पालकांनी मुलांच्या त्वचेची कोणती काळजी घ्यावी हे डॉक्टरांकडून जाणून घेऊया.

योग्य स्किनकेअर प्रोडक्ट

मुलांच्या स्किनकेअरच्या बाबतीत त्यांच्यासाठी योग्य रसायनमुक्त स्किनकेअर प्रोडक्ट वापरावे. लहान मुलांच्या त्वचेवर नैसर्गिक घटकांचा वापर करावा. ज्यामुळे पुरळ किंवा खाज येणार नाही.

सौम्य साबण आणि शॅम्पू

मुलांची त्वचा स्वच्छ ठेवण्यासठी नेहमी सौम्य साबण आणि शॅम्पूचा वापर करावा. यामुळे त्वचेला कोणतेही नुकसान होमार नाही.

मुलांसाठी योग्य स्किनकेअर रूटीन कोणती?

नियमित स्वच्छता

लहान मुलांची त्वचा नियमितपणे स्वच्छ ठेवावी. लहान मुलांना दिवसातून एकदा सौम्य साबणाने आंघोळ घालावी. यामुळे त्वचेतील धूळ, घाम आणि इतर संसर्ग निघून जातात. ज्यामुळे त्यांची त्वचा स्वच्छ आणि फ्रेश राहते. लहान मुलांची त्वचा संवेदनशील असते यामुळे त्वचेला जास्त घासू नका.

मॉइस्चरायझरचा वापर

आंघोळीनंतर मुलांच्या त्वचेला मॉइश्चरायझर लावावे. बाळाची त्वचा मऊ ठेवण्यासाठी बनवलेले मॉइश्चरायझर वापरावे. यामुळे मुलांच्या त्वचेवर जळजळ किंवा खाज येण्याची समस्या कमी होऊ शकते.

मुलांच्या त्वचेच्या समस्या कोणत्या?

पुरळ येणे

लहान मुलांच्या त्वचेवर पुरळ येणे ही एक सामान्य समस्या आहे. याची अनेक कारणे असू शकतात. जसे की अॅलर्जी किंवा चुकीची स्किनकेअर प्रोडक्ट वापरणे. पुरळ टाळण्यासाठी मुलांची त्वचा स्वच्छ आणि कोरडी ठेवावी.

इसब

मुलांमध्ये एक्जिमामुळे त्वचेवर खाज आणि लालसरपणा येतो. ही समस्या कमी करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्वचेला मॉइश्चरायझर लावणे खूप महत्वाचे आहे, जेणेकरून ती ओलसर राहते आणि कोरडी होत नाही.

बाळाच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी कोणती काळजी घ्यावी

  • मुलांच्या त्वचेवर तीव्र सुगंध किंवा कठोर रसायने असलेली प्रोडक्ट वापरणे टाळा.

  • मुलांना सैल आणि सुती कपडे घालावे. यामुळे त्यांची त्वचा श्वास घेऊ शकेल आणि संसर्ग टाळू शकेल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT