Coffee For Health esakal
आरोग्य

Coffee For Health : खरंच कॉफी प्यायल्याने ब्लड प्रेशर वाढतं का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

ब्लड प्रेशर 120/80 mm Hg पेक्षा जास्त असेल तर हाय ब्लड प्रेशरचे लक्षण असू शकते.

साक्षी राऊत

Coffee For Health : बहुतांश लोकांची सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीने होते. मात्र कॉफीचे जास्त सेवन केल्याने शरीरावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. हे तुम्हाला माहिती होते काय? काही लोक असेसुद्धा आहेत जे दिवसातून ८-१० कप कॉफी पितात. काही लोकांमध्ये असासुद्धा समज आहे की कॉफी प्यायल्याने ब्लड शुगर झपाट्याने वाढतं. ब्लड प्रेशर 120/80 mm Hg पेक्षा जास्त असेल तर हाय ब्लड प्रेशरचे लक्षण असू शकते. या स्थितीकडे दूर्लक्ष करणे तुमच्या आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते.

कॉफी प्यायल्याने खरंच ब्लड प्रेशर वाढतं का?

कॅफीनचे गरजेपेक्षा जास्त सेवन केल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कॉफीमध्ये असलेले कॅफीनने हार्ट रेट वाढू शकतो. ज्यामुळे काही काळासाठी ब्लड प्रेशरही वाढू शकतं. एवढेच नव्हे तर कॉफीचे सेवन केल्याने ब्लड वेसल्सवर प्रभाव पडतो. ज्यामुळे ब्लड प्रेशर कमी जास्त होऊ शकतं. याशिवाय असेही म्हटले जाते की कॉफी प्यायल्याने तुमच्या झोपेवरही परिणाम होतो. ज्यामुळे ब्लड प्रेशरवरही प्रभाव पडू शकतो.

कॉफी प्यायल्याने ब्लड प्रेशर वाढतं का? यावर डॉक्टर केके कपूर सांगतात की, प्रमाणात कॉफी प्यायल्याने शरीराला कुठलेही नुकसान होत नाही. दूधाची कॉफी पिण्याऐवजी ब्लॅक कॉफी पिणे कधीही फायद्याचे. ज्यामुळे तुमचे मूडही चांगले राहते आणि ब्लड प्रेशरमध्येही फायदा होतो. ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी रोज २ कप कॉफीचे सेवन करावे. याचे तुम्हाला आरोग्यदायी फायदे मिळतील.

मेडिकल न्यूज टुडेमध्ये प्रकाशित एका स्टडीमध्ये असे म्हटले गेले आहे की, प्रमाणात कॉफी प्यायल्याने कुठलेही नुकसान होत नाही. कॉफीमध्ये असणारे अँटी ऑक्सिडंट्स ब्लड वेसल्स सुरळीत करण्यास मदत करतात. रोज दोन कप कॉफी प्यायल्याने ब्लड प्रेशर सुरळीत राहते. तुमचे मानसिक आरोग्यही चांगले राहते.

जास्त कॉफी पिण्याचे तोटे

कॉफीमध्ये एनर्जी, फॅट, थायमिन, रायबोफ्लेविन, फॉस्फोरस, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन असते. मात्र जास्त कॉफीचे सेवन केल्याने पोटाचे विकार, स्किन डिसीज, ब्लड प्रेशर वाढणे यांसारख्या आजारांसह अनेक आजारांचा धोका वाढतो. ब्लड प्रेशरच्या समस्येमध्ये तुम्ही रोज १-२ कप कॉफीचे सेवन करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT