Corona infection or vaccination what causes more antibodies
Corona infection or vaccination what causes more antibodies 
आरोग्य

कोरोना संक्रमण की लसीकरण, कशामुळे निर्माण होतात जास्त अँटीबॉडीज?

सकाळ डिजिटल टीम

कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी लसीकरणाचा उपक्रम (Vaccination) संपूर्ण जगामध्ये राबविला जात आहे. तज्ञ्जांचे मत आहे की, ''कोरोना संक्रमणामुळे निर्माण झालेली रोगप्रतिकारशक्ती (Immunity) देखील सुरक्षेसाठी प्रभावी आहे पण, अँटीबॉडीज (Antibodies) आणि रोगप्रतिकारशक्तीच्या बाबतीत वेळो-वेळी रिसर्च आणि अभ्यास होत आहेत.

याबाबत नुकताच अमेरिकेतील एका रिसर्च हॉस्पिटलमध्ये संशोधन करण्यात आले, ज्यामध्ये फक्त कोरोना संक्रमण, फक्त लसीकरण आणि संक्रमणानंतर केलेले लसीकरण (Vaccinated after infection) केलेल्या लोकांना समाविष्ट केले होते. आतापर्यंत संक्रमणानंतर किंवा लसीकरणानंतर निर्माण झालेली रोगप्रतिकार शक्तीला 'सूपर इम्युनिटी' म्हटले जात होते पण, दोन्ही वेगवेगळे मुल्यमापन केल्यास कोणती रोगप्रतिकारशक्ती जास्त चांगली आहे? कोरोना संक्रमण की लसीकरण, कशामुळे तयार होतात जास्त अँटीबॉडीज? जाणून घ्या (Corona infection or vaccination, what makes more antibodies)

सध्या अमेरिकेमध्ये सेंट च्यूड चिल्ड्रंस रिसर्च हॉस्पिटलतर्फे केलेल्या संशोधनामध्ये ३९९ लोकांचा सहभाग केला होता. या सर्व्हे आणि अभ्यासानुसार, हॉस्पिटलच्या एका असोसिएट फॅकल्टी सदस्य डॉ. जोश वॉल्फ यांनी सांगितले की, ''सार्स कोव-२ बाबतीत व्हेरिएंट्सच्या विरोधात संक्रमणामुळे निर्माण झाल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती किंवा कोरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर निर्माण होणाऱ्या रोगप्रतिकार शक्तीमध्ये कोणती जास्त चांगली आहे ही भविष्यवाणी करणे अवघड आहे. तसेच कोरोना संक्रमण की लसीकरण, कशामुळे अँटीबॉडीज जास्त वाढतात हे सांगणे कठीण आहे. याचा नेमका अंदाज लावणे कठीण आहे पण, हॉस्पिटलतर्फे केल्या जाणाऱ्या संशोधनामध्ये आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे, ज्यामुळे लसीकरण खूप महत्त्वाचे ठरते आहे.

३ गटांवर झाले संशोधन

या संशोधनामध्ये, तीन वेगवेगळ्या अँटीजेन एक्सपोजरचे उदाहरण म्हणून समाविष्ट केले आहेत. ज्यामध्ये १२० लोकांना समाविष्ट केले होते ते ज्यांना फक्त कोरोना संक्रमण झाले होते आणि अशा २३७ लोकांना समाविष्ट केले होते ज्यांनी कोरोना एमआरएनए लस (mRNA vaccine) घेतली होती, तर ४२ लोक असे सामविष्ट केले होते ज्यांनी कोरोना संक्रमण होऊन गेल्यानंतर कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. दरम्यान, तिन्ही गटांच्या लोकांमध्ये चार महत्वपूर्ण व्हेरिअंट अल्‍फा, बीटा, गामा और डेल्‍टा (Delta) च्या विरोधात अँटीबॉडीजच्या पातळीची चाचणी केली होती.

या गटातील लोकांच्यामध्ये क्रॉस रिएक्टिव अँटीबॉडीज जास्त प्रमाणात आढळल्या

संशोधनातून असा अंदाज बांधण्यात आला की, सर्वात जास्त क्रॉस रिअॅक्टिव्ह अॅन्टीबॉडीजची पातळी त्या लोकांमध्ये आढळली ज्यांनी नुकतीच कोरोना प्रतिंबधक लस घेतली होती. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, संक्रमणामुळे निर्माण झालेल्या अॅन्टीबॉडीजच्या तुलनेत लसीकरणामुळे निर्माण झालेल्या अॅन्टीबॉडीजची संख्या जास्त चांगली आहे. तसेच ज्या लोकांना संक्रमण झाले होते आणि मग त्यांना लस देण्यात आली, ज्याच्यामध्ये सर्वात चांगली रोग प्रतिकारक्षमता दिसते, ज्याला सुपर इम्युनिटीने देखील म्हटले जाते. यामध्ये विशेषत: अल्फा, वाईल्ड टाइप व्हेरिअंटविरोधात चांगली रोगप्रतिकार शक्ती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अमित शहा यांचा ए़िडिटेड व्हिडिओ शेअर केल्याच्या आरोपावरून काँग्रेस आमदाराच्या 'पीए'ला अटक

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT