Dengue Fever Prevention  esakal
आरोग्य

Dengue Fever Prevention : डेंग्यू-व्हायरल तापात रामबाण उपाय ठरतील हे 5 मसाले

व्हायरल किंवा डेंग्यूच्या तापात काही मसाले रामबाण उपाय ठरू शकतात. हे मसाले कोणते ते जाणून घेऊया

साक्षी राऊत

Dengue Fever Prevention : हल्ली वातावरणातील बदलांमुळे व्हायरल ताप, इन्फेक्शन, डेंग्यू यांसारखे आजार उद्भवतात. जर २-३ दिवसांपेक्षा जास्त काळ ताप, थंडी वाजणे, थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी, भूक न लागणे यांसारख्या समस्या उद्भवत असतील लगेच टेस्ट करून घ्यावी. अशात व्हायरल किंवा डेंग्यूच्या तापात काही मसाले रामबाण उपाय ठरू शकतात. हे मसाले कोणते ते जाणून घेऊया.

इम्युन सिस्टिम आपल्या शरीरातील नॅचरल डिफेंस सिस्टिम असते. जे शरीरातील इन्फेक्शनशी लढण्याचे काम करते. तुमची इम्युन सिस्टिम कमकुवत असेल तर तुम्हाला कुठलाही आजार लवकर होतो. तेव्हा इम्युनिटी वाढवण्यासाठी खालील ५ मसाल्यांचे सेवन करा.

ऑरगॅनो

पिझ्झा किंवा पास्तामध्ये तुम्ही ऑरिगॅनो वरून घालून अनेकदा खाल्ला असेल. अनेकजण मॅगी किंवा मोमोजवरही टाकून ऑरिगॅनो टाकून खातात. मात्र तुम्ही ऑरिगॅनो सलाड, सूप इत्यादीमध्ये टाकून तुम्ही सेवन करू शकता.

आलं

आल्यामध्ये अँटिऑक्सिडंट्सयुक्त गुणधर्म असतात. भाज्या, सूप, ज्यूस, चहामध्ये घालून तुम्ही सहज त्याचे सेवन करू शकता. त्यात जिंजरॉल नावाचे अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी कंपाऊंड असते. जळजळ कमी करण्यासोबतच ते पचन आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते.

हळद

हळद अनेक गुणांनी युक्त आहे. या गोल्डन स्पाइसमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि इन्फ्लेमेटरी गुण असतात. यात असलेले करक्यूमिन इम्यून सिस्टिम मजबूत बनवतात. आणि इन्फेक्शनशी लढण्यास मदत करतात.

दालचिनी

इम्युन सस्टिमचा पावर वाढवण्यासाठी दालचीनीचे सेवन केले पाहिजे. यात भाज्या, डेझर्ट, चहा, ज्यूस टाकूनही तुम्ही पिऊ शकता. यात अँटिऑक्सिडंट्स आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुण असतात जे नॅचरली इम्युनिटी वाढवतात. हा मसालेदार पदार्थ मधुमेह कंट्रोल करण्यासही मदत करते. (Health)

लसूण

लसूण हे पावरफुल इम्युनिटी बूस्टर फूड आहे. या कंपाउंडमध्ये अँटीमायक्रोबियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. ज्यामुळे व्हायरस आणि बॅक्टेरियाचा शरीरावर फारसा प्रभाव होत नाही. हा पदार्थ सेल्सला अॅक्टिव्ह करण्यासही मदत करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदी

SCROLL FOR NEXT