Doctor Warn About Unregulated Anti- Aging Drugs| Shefali Jariwala Death sakal
आरोग्य

Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाच्या मृत्यूसाठी अँटी-एजिंग औषधांचा 'कॉकटेल' ठरला जीवघेणा? वाचा डॉक्टरांचा इशारा

What Caused Shefali Jariwala’s Sudden Death: शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर अँटी-एजिंग औषधांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Anushka Tapshalkar

थोडक्यात:

  1. अभिनेत्री शेफाली जरीवालाचा मृत्यू अँटी-एजिंग औषधांच्या गैरवापरामुळे झाला असल्याचा संशय आहे.

  2. ती गेल्या काही वर्षांपासून एफडीए मंजुरी नसलेल्या अँटी-एजिंग इंजेक्शन्स आणि औषधे घेत होती.

  3. उपवासाच्या दिवशी रिकाम्या पोटी घेतलेले इंजेक्शन तिच्या हृदयावर परिणाम करत जीवघेणे ठरले.

Can Anti-Aging Medicines Cause Heart Attack: 27 जून 2025 रोजी 'कांटा लागा गर्ल' शेफाली जरीवाला हीच अचानक मृत्य झाला. यामुळे सिनेक्षेत्रासह सगळ्यांनाच मोठा धक्की बसला आहे. प्राथमिक माहितीनुसार शेफालीचा रक्तदाब खूपच कमी होऊन हार्ट अटॅक आल्याने मृत्य झाल्याचे समोर आले.

परंतु पोस्टमार्टम केल्यानंतर मात्र तिचा रक्तदाब इतका घातक स्तरावर का पोहोचला, याची मूळ कारणं आता हळूहळू समोर येत आहेत डॉक्टारांनी देखील काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.

झगमगती दुनिया

सिनेसृष्टीच्या झगमगाटात टिकून राहण्यासाठी अनेकांना तरुण आणि आकर्षक दिसायचं मोठं दडपण असतं. याच कारणामुळे काहीजण डॉक्टरांचा सल्ला न घेता इंटरनेटवर सहज मिळणाऱ्या अँटी-एजिंग उपायांकडे वळतात. चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ नयेत, त्वचा उजळ आणि तरुण दिसावी यासाठी लोक वेगवेगळे बायोहॅक्स, गोळ्या, पूरक आहार आणि इंजेक्शन वापरतात.

अगदी कॉलेजमधले तरुणही हल्ली शुगर टाळणं, स्किन ट्रीटमेंट्स करणं, आणि वृद्ध दिसू नये म्हणून वेगवेगळ्या ट्रेंडमध्ये सहभागी होतात. हे सगळं करताना शरीरावर काय परिणाम होतो, याचा विचार न करता केवळ परिपूर्ण दिसावं यासाठी धडपड सुरू असते.

अँटी-एजिंग औषधे

सूत्रांच्या माहितीनुसार, शेफाली गेल्या 7-8 वर्षांपासून तरुण दिसण्यासाठी ग्लुटाथिओन, व्हिटॅमिन सीसह अँटी-एजिंग औषधे आणि इंजेक्शन्स घेत होती. ग्लुटाथिओन हे ट्रायपेप्टाइड असून, ते ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करून शरीराची डिटॉक्स आणि रोगप्रतिकारक प्रक्रिया सुधारते ज्यामुळे आपण आपल्या वयापेक्षा तरूण दिसायला मदत होते.

मात्र, ती घेत असलेल्या काही औषधांना एफडीए (फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन) ची मंजुरी नव्हती, अशी माहिती समोर आली आहे.

ग्लूटाथिओन म्हणजे काय?

तज्ञांच्या मते, ग्लूटाथिओन हा एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आहे जो शरीरातील प्रत्येक पेशीत आढळतो. हा तीन प्रकारच्या रेणूंमधून बनलेला आहे ज्याला आमिनो ऍसिड्स म्हणून ओळखले जाते, जे शरीरातील सर्व प्रोटीन तयार करण्यासाठी विविध पद्धतींमध्ये एकत्रित केले जातात. ग्लूटाथिओनची एक अद्वितीय वैशिष्ट्य म्हणजे तुमचे शरीर हे यकृतात तयार करू शकते, जे बहुतेक अँटिऑक्सिडंटसाठी खरे नाही. ग्लूटाथिओनची अनेक महत्त्वाची कार्ये आहेत, त्यापैकी काही आहेत:

  • डीएनए तयार करण्यात मदत करतो, जे प्रथिनं आणि पेशींच्या बांधणीसाठी आवश्यक असतं

  • रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत करतो

  • शरीरात तयार होणारे काही हानिकारक घटक (मुक्त रॅडिकल्स) तोडून टाकतो

  • काही महत्त्वाच्या एन्झाइम्सच्या कामकाजात सहकार्य करतो

  • जीवनसत्व C आणि E यांना पुन्हा सक्रिय करतो

  • नियमितपणे होणाऱ्या पेशींच्या नैसर्गिक मृत्यूची प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी मदत करतो.

रिकाम्या पोटी घेतलेलं इंजेक्शन ठरले जीवघेणे

त्या दिवशी तिच्या घरी पूजा होती म्हणून शेफालीने उपवास केला होता. ती रिकाम्या पोटीच होती, पण तरीही नेहमीप्रमाणे अँटी-एजिंग औषधे आणि इंजेक्शन घेतले. काही वेळाने तिला थंडी वाजायला लागली, अंग थरथरू लागले आणि ती चक्कर येऊन खाली पडली. पतीने तिला लगेच रुग्णालयात नेले, पण तिथे तिला मृत घोषित करण्यात आले.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं ठरू शकतं धोकादायक

या घटनेनंतर डॉक्टरांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. डॉ. प्रशांत बोटे, अधीक्षक, कमला नेहरू हॉस्पिटल यांनी सांगितले की, "एफडीएच्या मंजुरीशिवाय औषधांचा वापर आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकतो. काही औषधे हृदयावर थेट परिणाम करून हार्ट अटॅकसारख्या गंभीर स्थिती निर्माण करतात."

यासंदर्भात डॉ. दर्शना कुडले, लेक्चरर, स्किन डिपार्टमेंट यांनी देखील प्रतिक्रिया देताना सांगितले की, "सौंदर्य वाढवणाऱ्या किंवा वजन कमी करणाऱ्या अनेक औषधांचा बाजारात सध्या वापर वाढला आहे. मात्र या औषधांची गुणवत्ता आणि त्यांचे परिणाम यांची खातरजमा न करता त्यांचा वापर केल्याने आरोग्याचा गंभीर धोका संभवतो."

FAQs

  1. शेफाली जरीवालाचा मृत्यू कशामुळे झाला?

    • प्राथमिक माहितीनुसार, रक्तदाब अत्यंत कमी होऊन हार्ट अटॅक आल्याने तिचा मृत्यू झाला.

  2. तिने कोणती अँटी-एजिंग औषधे घेतली होती?

    • ग्लुटाथिओन, व्हिटॅमिन सीसारखी अँटी-एजिंग औषधे आणि इंजेक्शन्स ती नियमितपणे घेत होती.

  3. या औषधांबाबत डॉक्टरांचे मत काय आहे?

    • डॉक्टरांनी सांगितले की एफडीए मंजूरी नसलेली औषधे वापरणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

  4. सौंदर्यवाढीसाठी औषधे घेण्यापूर्वी काय काळजी घ्यावी?

    • डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे आणि औषधांची गुणवत्ता व मंजुरी तपासणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT