How Sugar Offering at a Shiva Temple is Linked to Diabetes Relief: आपल्या आजूबाजूला बघितले तर प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला डायबिटीज म्हणजेच मधुमेहाची समस्या आहे. कोणी सकाळी उठल्यावर शुगर चेक करते, कोणी गोळ्या घेते, तर कोणी रोज चालायला जाते फक्त साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी.
कितीही काळजी घेतली तरी ही शुगर काही जात नाही, आणि त्यामुळे अनेक जण त्रस्त असतात. पण कल्पना करा, जर एखादे असे ठिकाण असेल जिथे फक्त श्रद्धेने तुमची शुगर कमी होऊ शकते? हो, तमिळनाडूमधल्या एका खास मंदिराची अशीच एक कहाणी आहे, जिथे लोक सांगतात की इथे येऊन त्यांच्या डायबिटीजच्या विकारावर चमत्कार झाला.
तिरुवारूरजवळ कोइल वेन्नी गावात वसलेले वेन्नी करुंबेश्वरर मंदिर हे शिवभक्तांसाठी आस्थेचे स्थान मानले जाते. या मंदिरात एक खास परंपरा आढळते. येथे भाविक भगवान शिवाला साखर अर्पण करतात आणि ती साखर मंदिराच्या आवारात पसरवली जाते. स्थानिक श्रद्धेनुसार, जशा-जशा मुंग्या ही साखर खातात, तशी-तशी भक्तांच्या शरीरातील साखरेची पातळी म्हणजेच ब्लड शुगर कमी होत जाते.
ही कल्पना ऐकायला थोडी आश्यर्यकारक वाटू शकते, मात्र अनेकांनी सांगितले आहे की या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण प्रत्यक्षात कमी झाले आहे.
या मंदिरातील शिवलिंगाला "करुंबेश्वरर", म्हणजेच ऊसाचे रक्षक असे नाव आहे. मान्यता आहे की हे शिवलिंग ऊसाच्या लाकडांपासून बनवले गेले आहे. भगवान शिवाला येथे रवा-साखरेचा नैवेद्य दाखवला जातो, आणि भक्त आपल्या मनोकामना व्यक्त करतात.
अनेक रुग्णांनी सोशल मिडियावर त्यांच्या अनुभवांची माहिती शेअर केली आहे. काहींनी सांगितले की त्यांची औषधे कमी झाली, काहींनी तर पूर्ण बरे झाल्याचा दावा केला आहे.
परंतु या मंदिरातील घटनांची माहिती मिळाल्यानंतर काही वैज्ञानिकांनीही येथे पाहणी केली आहे. काही प्रकरणांमध्ये पूजा केल्यानंतर रुग्णांच्या ब्लड शुगरमध्ये प्रत्यक्ष घट झाल्याचेही निष्पन्न झाले. त्यामुळे काही डॉक्टर आणि संशोधक देखील याला 'चमत्कार' म्हणण्यास मागेपुढे पाहत नाहीत.
काही आख्यायिकांनुसार, हे मंदिर सुमारे 5000 वर्षांपूर्वीचे आहे आणि ते भगवान श्रीकृष्णांनी स्थापन केले होते. एक मान्यता अशीही आहे की, जेव्हा मुघल आक्रमक या मंदिरावर हल्ला करण्यासाठी आले होते, तेव्हा 'भगवंताच्या मुंग्यांनी' मंदिराचे रक्षण केले होते.
मंदिरात सकाळी ८ ते १२ आणि संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत दर्शन घेता येते. त्रिची हे सर्वात जवळचे विमानतळ असून मंदिर तिरुवारूरपासून ३६ किमी अंतरावर आहे.
आज या मंदिराकडे केवळ धार्मिक स्थळ म्हणून नव्हे, तर एक श्रद्धेचे उपचारकेंद्र म्हणूनही पाहिले जाते. श्रद्धा आणि आत्मविश्वास यांचा योग्य समन्वय केला, तर अनेक अशक्य गोष्टी शक्य होतात, हे या मंदिराने दाखवून दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.