आरोग्य

लॅपटॉपवर काम केल्याने डोळ्यांना त्रास होतो? मग करा ‘हे’ घरगुती उपाय

सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही समस्येपासून सुटका करू शकता

सकाळ डिजिटल टीम

ऑफिसमध्ये किंवा घरी लॅपटॉप, संगणकावर बसून दिवसभर काम करावे लागते. त्यामुळे सतत आपल्या हातांच्या बोटांना आणि डोळ्यांना त्याचा त्रास होतो. त्याचबरोबर डोळ्यांना लॅपटॉप किंवा संगणक वापरल्यामुळे थकवा जाणवतो आणि डोळे जळजळ करतात. जर तुम्हाला देखील हा त्रास होत असेल किंवा तणाव जाणवत असेल तर काही सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही होणाऱ्या समस्येपासून सुटका प्राप्त करू शकता.

डोळ्यांना आराम द्या

काम करत असताना सतत लॅपटॉप किंवा मोबाइलचा वापर करावा लागत असेल तर काम करत असताना थोड्या थोड्या वेळाने ब्रेक घ्या. याने तुमचे डोळे दुखायचे किंवा जळजळ कमी होतील. तसंच जर तुम्हाला तुमचे डोळे कोरडे होत आहेत असं वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही आय ड्रॉप्स वापरू शकता.

टी बॅग आय मास्क

डोळ्यांचा थकवा दूर करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे टी बॅग. याचा वापर करण्यासाठी टी बॅग्सच्या पिशव्या काहीवेळ फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीजमधून काढल्यानंतर बॅग सामान्य पाण्यात बुडवून डोळ्यांवर ठेवा. या टी बॅगच्या वापराने डोळ्यांचा थकवा दूर होण्यासोबतच डोळ्याखालील काळ्या वर्तुळाची समस्याही दूर होते.

काकडी मास्क

काकडीचे गोल काप करून डोळ्यावर ठेवू शकता. यामुळे डोळे थंड होण्यास मदत होईल. यासोबतच या मास्कमुळे डोळ्यांचा थकवा सहज दूर होईल.

गुलाबपाणी

गुलाबपाणीच्या वापरामुळे डोळ्यांतील कोरडेपणा आणि थकवा येण्याची समस्या सहजपणे दूर होते. यासाठी कापूस किंवा कॉटन पॅड गुलाब पाण्यात बुडवा आणि काही वेळ डोळ्यांवर ठेवा. यामुळे तुमच्या डोळ्यांना नक्कीच आराम मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान किसान योजनेतून एकाच वेळी मिळणार 18,000 रुपये

Viral News: मुघल काळातील खजिना सापडला! चांदीच्या नाण्यांचा शोध, उर्दू-फारसीत कोरिव काम

Ravichandran Ashwin : रविचंद्रन अश्विनने ८ महिन्यांनंतर सांगितलं निवृत्तीमागचं खरं कारण...राहुल द्रविड समोर झाला भावूक!

Maharashtra Latest News Live Update : राज आणि उद्धव ठाकरे यांची झाली युती, मात्र बेस्टच्या निवडणुकीत झाली त्यांची माती-रामदास आठवले

Pune Crime : पुण्यात तरुण अभियंत्याचा निर्घृण खून, मानलेल्या बहिणीच्या प्रेमप्रकरणातून सुडाचा थरार; नेमकं काय घडलं ?

SCROLL FOR NEXT