Health Tips esakal
आरोग्य

Health Tips : रिकाम्या पोटी या 3 गोष्टी अजिबात खाऊ नका, नाहीतर...

रिकाम्या पोटी काय खावे आणि काय खाऊ नये तसेच त्याचे फायदे काय व तोटे काय ते सविस्तर जाणून घेऊया

सकाळ ऑनलाईन टीम

Health Tips : बऱ्याच गोष्टी रिकाम्या पोटी खाऊ नये असं म्हणातात. एवढेच नव्हे तर पावरफुळ गोळ्यासुद्धा रिकाम्या पोटी न खाण्याचा सल्ला आपल्याला डॉक्टर देतात. तेव्हा आज रिकाम्या पोटी कोणत्या गोष्टी आवर्जून टाळल्या पाहिजे ते आपण जाणून घेऊया.

कायम लक्षात ठेवावे की तुमचं पित्त वाढवणारे पदार्थ कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये. असे पदार्थ रिकाम्या पोटी खाल्याने आतड्यांवर ताण पडतो आणि आतड्यांच्या आतील बाजून संसर्ग होण्याचा धोका वाढतो. तेव्हा आज रिकाम्या पोटी काय खावे आणि काय खाऊ नये तसेच त्याचे फायदे काय व तोटे काय ते सविस्तर जाणून घेऊया.

रिकाम्या पोटी या गोष्टी खाव्या

१) अंडी

अंड्यामध्ये प्रोटीनचा चांगला सोर्स असतो. तेव्हा अंडी सकाळचा नाश्ता म्हणून खाण्याचाही सल्ला दिला जातो. सकाळी अंड्याचं सेवन केल्यास दिवसभर पोट भरल्यासारखं वाटतं. तसेच दिवसभर तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा कायम राहते.

२) पपई

पपई हे एक सुपरफुड आहे. प्रत्येक ऋतूमध्ये मिळणारं हे फळ तुम्ही आवर्जून नाश्त्यामध्ये खाऊ शकता. पपई खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते. यामुळे हृदयाशी संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यात कमी होते.

३) भिजवलेले बदाम

सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी चार भिजवलेले बदाम खाणं आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचं असतं. यामुळे शरिराला बरेच फायदे होतात. फायबर, ओमेगा-थ्री, ओमेगा-सिक्सचा उत्तम स्त्रोत म्हणून बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. रात्रभर भिजवलेले बदाम सकाळी रिकाम्या पोटी खावेत. हे बदाम खाताना त्याची सालं काढून खाणं अधिक फायद्याचं ठरतं.

४) ओट्स

कॅलरी आणि हाय न्युट्रिएंटच्या दृष्टीने ओट्स हा एक उत्तम नाश्ता आहे. यामुळे वजन नियंत्रणात राहाण्यात मदत होते.

रिकाम्या पोटी या गोष्टी अजिबात खाऊ नका

१) टोमॅटो - कच्चं टोमॅटो खाण्याचे तशे बरेच फायदे आहे. मात्र रिकाम्या पोटी टोमॅटो खाऊ नका. टोमॅटोमध्ये असलेले अॅसिडिक गुणधर्म पोटात असलेल्या गॅस्ट्रोइंटस्टाइन अॅसिडबरोबर प्रक्रिया करुन रिअॅक्शन क्रिएट करतात ज्याने पोटदुखीचा त्रास वाढतो. तेव्हा सकाळी रिकाम्या पोटी या गोष्टी खाणे टाळा.

२) दही - दही रिकाम्या पोटी खाऊ नये. दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असतं. यामुळे सकाळी सकाळी दही खाल्ल्याने शरीराला त्याचा फारसा फायदा होत नाही.

३) सोडा - सोड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोनेट अॅसिड असतं. जेव्हा हे अॅसिड पोटातील अॅसिडबरोबर एकत्र येतं तेव्हा पोटदुखीची समस्या निर्माण होते. त्यामुळेच रिकाम्या पोटी सोडा पिऊ नये. (health)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

Crime News : तरुणाने आई-वडिल अन् भावाची केली हत्या; मित्राला म्हणाला- अख्खं कुटुंबच संपवलं, आता इथून पुढे...

SCROLL FOR NEXT