Peace
Peace Sakal
आरोग्य

मनाची शक्ती : प्रभाते मनी...!

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. हंसा योगेंद्र

पूर्वीच्या काळात, लोक सकाळची शांतता स्वीकारत, त्यांच्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी विशिष्ट मंत्रोच्चाराने करत. तथापि, आधुनिक युगात अनेक व्यक्ती नकळतपणे सकाळी अनेक चुका करतात. त्याचा अनवधानाने संपूर्ण दिवसावर परिमाण होऊ शकतो. आपण आज पाच सामान्य त्रुटींची माहिती घेणार आहोत. त्यावर मात केल्यास तुमची दिवसाची सुरूवात चांगली होईल आणि दिवसभरात तुमच्याच ऊर्जा कायम राहील.

सूर्योदयाच्या वेळी किंवा त्यापूर्वी न उठणे

पहाटेच्या वेळी जागे होण्याचे जुने शहाणपण आजही खरे आहे. सूर्योदयाच्या दोन तास आधी होणारा ब्रह्म मुहूर्त ही उगवण्याची आदर्श वेळ मानली जाते. ही वेळ स्वत:ची काळजी आणि पोषण करण्यास योग्य मार्ग दाखवते व तुमच्या शरीराला पुढील दिवसासाठी ऊर्जा देते. तुम्हाला लवकर जागे होण्याची सवय नसल्यास हळूहळू प्रयत्न करा. ही वेळ सूर्योदयाशी जुळत नाही तोपर्यंत शरीराला त्याप्रमाणे आज्ञा द्या. लवकर जागे होण्याची सवय तुमची उत्पादकता लक्षणीयरित्या वाढवू शकते.

दिवसाची सुरूवात प्रार्थनेने करा

जागृत झाल्यावर तुमची पहिली कृती प्रार्थनेची असावी. कृतज्ञता व्यक्त करणे आणि सकारात्मक हेतू निश्चित केल्याने तुमचा दिवस अनुकूल दिशेने जाईल. त्यामुळे मनात सकारात्मक उद्देश आणि आशावादाची भावना निर्माण होईल.

पाणी पिणे

रात्रीच्या शांत झोपेनंतर तुमच्या शरीराला हायड्रेशनची इच्छा होते. अन्न सेवन करण्यापूर्वी पाणी पिण्याकडे दुर्लक्ष केल्याने तुमच्या पचनसंस्थेवर अनावश्यक ताण पडतो. सकाळी एक ग्लास कोमट पाणी तुमच्या शरीरातील हायड्रेशनची पातळी पुन्हा भरून काढते, तुमच्या मूत्रपिंडातून विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि तुमच्या पचनक्रिया सक्रिय करते. तुमच्या पाण्यात लिंबू पिळून टाकल्याने तुमचे शरीर डिटॉक्सिफाय करण्यात मदत होऊ शकते. या साध्या कृतीला प्राधान्य देऊन, तुम्हाला अधिक ताजेतवाने आणि उत्साही वाटेल, दिवसासाठी एक टवटवीतपणा जाणवले.

अंघोळ न करणे

सकाळी अंघोळ न केल्यास तुम्हाला दिवसभर आळशी वाटू शकते. अंघोळ एक शुद्धीकरण विधी म्हणून काम करते. त्यामुळे शरीर आणि मन दोघांनाही चेतना मिळते. दिवसभरातील उल्हासित आणि अध्यात्माची भावना निर्माण होते. न्याहारीपूर्वी लवकर अंघोळ करून आणि स्वच्छ कपडे घालून तुम्ही तुमच्या दिवसाला सौंदर्य आणि सद्‍गुणांना आमंत्रित करता.

पुरेशी शारीरिक हालचाल

सकाळी पुरेशी शारीरिक हालचाल न केल्यास संभाव्य आरोग्य समस्यांना आपण आमंत्रण देऊ शकतो. तुमचा दिवस सुरू करण्यासाठी काही प्रकारच्या व्यायामात गुंतणे अत्यावश्यक आहे. सौम्य योगाचा क्रम असो, उत्साहवर्धक चालणे असो किंवा साधे स्ट्रेचिंग असो, सकाळी तुमचे शरीर हलवण्याचा कोणताही प्रयत्न तुम्हाला दिवसभर शारीरिकदृष्ट्या मजबूत आणि मानसिकदृष्ट्या अधिक आत्मविश्वास देईल.

सकाळी होत असलेल्या या चुका सुधारून सजग आणि उद्देशपूर्ण दिनचर्या स्वीकारावी. त्यामुळे तुम्ही अधिक फलदायी दिवसासाठी मार्ग मोकळा कराल. तुमचे शरीर जलद बरे होईल आणि तुम्ही आजारापासून दूर रहाल. म्हणून, यश आणि कल्याणासाठी दिवसाची चांगली सुरूवात करण्यासाठी प्रयत्नशील राहुयात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT