menstrual periods sakal
आरोग्य

मनाची शक्ती : अनियमित मासिक पाळी

मासिक पाळी अनियमित झाल्यास वेदना होऊ शकतात. याला वैद्यकीय परिभाषेत ऑलिगोमेनोरिया असे म्हणतात. पाळी २१ ते ४२ दिवसांच्या दरम्यान येत असेल तर ती नियमित मानली जाते.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. हंसा योगेंद्र

मासिक पाळी अनियमित झाल्यास वेदना होऊ शकतात. याला वैद्यकीय परिभाषेत ऑलिगोमेनोरिया असे म्हणतात. पाळी २१ ते ४२ दिवसांच्या दरम्यान येत असेल तर ती नियमित मानली जाते. या पलीकडे कोणतेही चढ-उतार झाल्यास ते अनियमित मानले जातात. पाळी येण्याचा कालावधी सतत बदलत असेल, तर त्या स्थितीलाही अनियमित मानले जाते. मासिक पाळी अनियमित होण्याची विविध कारणे आहेत. त्यापैकी काही सामान्य कारणे खालीलप्रमाणे

  • पीसीओएस (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम)

  • गर्भधारणेच्या गोळ्या

  • अतिव्यायाम

  • जास्त वजन

  • वजन जलद गतीने कमी होणे

  • ताण-तणाव, बैठी जीवनशैली

अनियमित मासिक पाळी टाळण्यासाठी काही सोपे उपाय

आले : एक चमचा ताजे आले पाण्यात ५ मिनिटे उकळवा. त्यात थोडी साखर घाला आणि जेवणानंतर दिवसातून तीन वेळा ते मिश्रण प्या. मासिक पाळी नियमित होण्यासाठी आले फायदेशीर आहे.

कच्ची पपई : हिरवी, कच्ची पपई मासिक पाळीसाठी उपयुक्त मानली जाते. काही महिने कच्च्या पपईचा रस नियमितपणे घ्या. मात्र, पाळीच्या काळात रस पिऊ नका.

दालचिनी : दालचिनीमुळे मासिक पाळीचे नियमन होते आणि पीसीओएसवर उपचार करण्यासदेखील ती लाभदायक ठरते.

वजनावर नियंत्रण : वजन जास्त असल्यास किंवा वजन जलद गतीने एकदम कमी केल्यास मासिक पाळी अनियमित होते. त्यामुळे आपल्या प्रकृतीनुसार वजनाचे संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. ज्या महिलांचे वजन जास्त असते, त्यांना अनियमित मासिक पाळीचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. पाळीच्या काळात जास्त रक्तस्राव आणि वेदनाही होऊ शकतात.

योगासने : योगतंत्राचा सराव केल्याने हार्मोनलचे संतुलन राखण्यास मदत होते. त्यासाठी हस्तपादासन, भद्रासन, वक्रासन, यास्तिकासन, हस्तपादंगुस्तासन, धनुर्वक्रासन आणि सर्वांगासनासारखी आसने नियमित करा.

ध्यान : ध्यानासाठी दिवसातून किमान १५ मिनिटांचा द्या. हार्मोनल असंतुलनामागे ताण-तणाव हे प्रमुख कारण आहे. त्यावर ध्यान हा सर्वोत्तम उपाय आहे. सुखासनाचा सराव करून ध्यान केल्यास फरक दिसून येईल. जीवनशैलीत योग्य ते बदल करून अनियमित मासिक पाळी टाळता येऊ शकते. त्यासाठी स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT