Weight Loss
Weight Loss Sakal
आरोग्य

मनाची शक्ती : वजन कमी करण्यासाठीची योगासने

सकाळ वृत्तसेवा

वजन कमी करण्याबाबत अनेक लोकांच्या मनात विविध शंका असतात. वस्तुतः वजन कमी करणे फारसे अवघड नाही.

- डॉ. हंसा योगेंद्र

वजन कमी करण्याबाबत अनेक लोकांच्या मनात विविध शंका असतात. वस्तुतः वजन कमी करणे फारसे अवघड नाही. किंबहुना, शाश्वत पद्धतीने प्रयत्न केल्यास त्याचे शरीरावर सकारात्मक आणि दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला फक्त व्यायाम आणि क्रॅश डाएट करण्याची गरज नाही. योगासनांमुळे शाश्वत पद्धतीने वजन कमी करता येते. हा जीवनाचा एक मार्ग असून, योग्य मार्गदर्शन आणि योग्य श्वासोच्छवासाचे तंत्र अवगत केल्यास वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी साधन असू शकते.

ही तीन आसने करा

हस्तपादासन

  • या आसनामुळे पोटात जमा होणारी अनावश्यक चरबी कमी होते.

  • दोन्ही पाय जुळवून उभे राहा. दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवा.

  • श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या पुढच्या बाजूने वर करा.

  • श्वास सोडत आपल्या पायाच्या बोटांना स्पर्श करण्यासाठी हात खाली आणा. गुडघे सरळ ठेवा आणि आपले डोके गुडघ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.

  • योग्य श्वास घेत शक्य तेवढा वेळ आसनस्थितीत राहा. हळूवारपणे पूर्वपदावर या.

धनुर्वक्रासन

  • हे तुमच्या पोटाच्या भागावर योग्य पद्धतीने दाब निर्माण करते.

  • शरीराच्या बाजूला हात ठेवून पोटावर झोपा.

  • गुडघे वाकून घोट्यांना पकडा.

  • श्वास घेत डोके वरच्या दिशेने उचला आणि त्याचवेळी दोन्ही पाय एकत्र ठेवून मणक्याची कमान करत पाय खेचा.

  • संथ श्वास घेत शक्य तेवढा वेळ आसनस्थिती ठेवा. हळूवारपणे आसनस्थिती सोडा.

त्रिकोनासन

  • हे पोटाच्या आणि कंबरेच्या स्नायूंना मजबूत करण्यासाठी मदत करते.

  • पाय एकत्र करून आणि हात शरीराच्या बाजूला ठेवून सरळ उभे राहा.

  • श्वास घेत दोन्ही हात खांद्याच्या पातळीवर वर करा.

  • नजर एका टप्प्यावर स्थिर ठेवून श्वास सोडत पाठीचा कणा आणि पाय सरळ ठेवून कंबरेतून पुढे वाका.

  • सरळ हातांनी आपल्या पायाची बोटे पकडा. श्वास संथपणे सुरूच ठेवा.

  • थोडावेळ आसनस्थितीमध्ये रहा. हळूवारपणे आसनस्थिती सोडा.

अतिरिक्त टिप्स

  • वजन वाढण्यामागे तणाव हे एक प्रमुख कारण आहे. ध्यान आणि निशपंध भावना यांसारखी योगिक तंत्रे मदत करू शकतात.

  • चालणे हा तुमच्या दिनचर्येचा नियमित भाग असला पाहिजे. एकूण वजन कमी करण्यासाठी या व्यायामप्रकाराचा चांगल्याप्रकारे फायदा होतो.

  • तुमच्या आहारातून सर्व अपोष्टिक घटक. पोषक आणि उत्तम अन्नाचे ग्रहण करा.

  • दिवसभर हायड्रेटेड राहा, विशेषतः उन्हाळ्यात काळजी घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT