Diet
Diet sakal
आरोग्य

वसा आरोग्याचा : आहाराचे ‘पथ्य’

सकाळ वृत्तसेवा

दिवसभर आहार व्यवस्थित सांभाळला जातो; परंतु रात्रीच्या आहारात गडबड होते. एक तर खूप खाल्ले जाते, नाही तर भीतीने सॅलेड किंवा सूप पिऊन भूक भागवली जाते.

- डॉ. कोमल बोरसे

दिवसभर आहार व्यवस्थित सांभाळला जातो; परंतु रात्रीच्या आहारात गडबड होते. एक तर खूप खाल्ले जाते, नाही तर भीतीने सॅलेड किंवा सूप पिऊन भूक भागवली जाते. खरेतर, रात्रीच्या आहाराचे गणित जमले, तर वजनवाढ, पित्त अशा अनेक समस्या कमी होतील.

पूर्वीचे लोक रात्रीचा आहार सूर्यास्तानंतर लगेच म्हणजे संध्याकाळी ६.३० ते ७.३०च्या दरम्यान करत. त्या वेळी आहार जास्त, भरपूर व्यायाम व जीवनशैलीही सुदृढ असल्याने त्यांना पचनाचे विकार नव्हते; शिवाय इतर आजारांच्याही तक्रारी नव्हत्या. मधुमेह, ताणतणाव, हृदयविकार हे मोठे आजार तर चार हात दूरच होते.

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात काम, वेळ, ताणतणाव तसेच आहारातील भेसळ, पॅकेज्ड-प्रोसेस व जंक फूड यामुळे आपल्याला आरोग्याच्या मोठ्या समस्या जाणवतात. आरोग्य सांभाळायचे असल्यास योग्य वेळी, योग्य आहार खाण्यावर भर दिला पाहिजे. विशेषत: रात्रीचे जेवण. याच्याशीच निगडित आपले आरोग्य जास्त असते. रात्री चयापचय क्रियेचा वेग मंदावलेला असल्याने रात्रीचा आहार हलका असावा. या मागचे आहारशास्त्र तंतोतंत पाळल्यास अॅसिडिटीपासून ते लठ्ठपणा अशा अनेक तक्रारींपासून दूर राहता येईल.

रात्रीचे जेवण महत्त्वाचे

नाश्ता आणि दुपारचे जेवण आपण वेळेवर करतो; कारण नाश्ता करून नोकरी-व्यवसायाला बाहेर पडतो आणि दुपारी कामाच्या ठिकाणी जेवतो. म्हणून या दोन्ही वेळचा आहार आपण सांभाळतो. मात्र, रात्रीचे जेवण हे वेळेवर होत नाही; कारण बदलती जीवनशैली, उशीरा जेवण्याची सवय, आळस किंवा कामाचे बदलते तास म्हणजे शिफ्टमध्ये असणारी नोकरी. मात्र, एकदा का ठरवले, की आरोग्याबाबत कोणतीच तडजोड करायची नाही, की या आग्रहापोटी रात्रीच्या जेवणाची वेळ पाळायची सवय आपोआप लागते. काहीही झाले, तरी संध्याकाळी लवकर जेवणाची वेळ चुकवता कामा नये.

आपण काय खातो, किती खातो, कोणत्या वेळेला खातो, व्यायाम काय आणि किती करतो यावर आरोग्य अवलंबून असते. रात्रीचा आहार काय आणि किती यावरही खूप काही अवलंबून असते. मांसाहार, दूध किंवा दुधाचे पदार्थ, फळे यांचे दिवसा सेवन केल्यास ते व्यवस्थित पचतील; परंतु ते रात्री खाल्ले, तर त्याचा परिणाम अपचन किंवा पित्त असा होऊ शकतो. आपण रात्री जास्त प्रमाणात कर्बोदके खातो आणि लगेचच झोपतो, तेव्हा या कर्बोदकातील ऊर्जा खर्च होत नाही. ऊर्जेचे रूपांतर चरबीमध्ये होते. ती शरीराच्या विविध भागांवर जमा होते. परिणामी, वजन वाढत जाते आणि इतर आजारांना आयतेच निमंत्रण मिळते.

पोटाचा घेर हा महिलांमध्ये ८० सेमीपेक्षा कमी असावा आणि पुरुषांमध्ये त्याचे प्रमाण ९० सेंटीमीटर जास्त नसावे. गृहिणींनी कितीही चांगला व्यायाम केला, दिवसभर आहार सांभाळला आणि रात्री उशीरा पचण्यास जड असा आहार घेऊन लगेचच झोपले, की पोटाचा घेर वाढायला सुरुवात होते; त्यामुळे नाश्ता हा जसा दिवसाच्या सुरुवातीचा महत्त्वाचा आहार आहे, तसेच रात्रीचे जेवण आपण काय आणि कधी करतो हेही खूप महत्त्वाचे ठरते. आहार कसा असावा याविषयी पुढील लेखात माहिती घेऊ..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Latest Marathi News Update : नाशिकमध्ये कपालेश्वर हॉटेलच्या मागच्या बाजूला आग

SCROLL FOR NEXT