side effects of ginger  esakal
आरोग्य

Health Care : आल्याचा जास्त वापर करणे आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक, जाणून घ्या 'हे' दुष्परिणाम

आल्याचे जास्त प्रमाणात सेवन करणे, हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

Monika Lonkar –Kumbhar

Side Effects of Ginger : वातावरण बदलले की, त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. बदलत्या वातावरणामुळे मग अनेक समस्यांना सुरूवात होते. सर्दी, खोकला आणि ताप इत्यादी समस्यांचे प्रमाण वाढते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना या सर्दी-खोकला आणि तापाचा त्रास सुरू होतो.

या समस्यांपासून दूर राहण्यासाठी मग काढा, आलं घातलेला चहा पिला जातो. थंडीमध्ये शरीराला ऊब मिळावी, यासाठी आपण उष्ण खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करतो.

थंडीच्या दिवसांमध्ये तर आलं घातलेला चहा जास्त प्रमाणात पिला जातो. मात्र, आल्याचे जास्त सेवन करणे हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. हे तुम्हाला माहित आहे का? आल्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने कोणत्या समस्या निर्माण होतात? ते आपण जाणून घेऊयात.

तोंडात जळजळ होते

आल्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तोंड येणे किंवा तोंडात जळजळ होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. थंडीच्या दिवसांमध्ये तर आल्याचे सेवन हे मर्यादित प्रमाणात करावे.

पोटाच्या समस्या

आल्यामध्ये उष्णतेचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे, जेव्हा आल्याचे जास्त प्रमाणात सेवन केले जाते, तेव्हा पोटात जळजळ आणि पचनाच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. कधीकधी पोट बिघडण्याची समस्या देखील होऊ शकते.

आल्याचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने, पोटाला सूज येणे आणि पोटात गॅसेसची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे, आल्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करा.

साखरेची पातळी अचानक कमी होते

जर तुम्ही खाद्यपदार्थांमध्ये आल्याचा जास्त समावेश केल्यास तुमच्या शरीरातील साखरेची पातळी अचानक कमी होते. तसेच, इन्सुलिनच्या पातळीत अडथळा निर्माण होतो. या अडथळ्यामुळे रक्तातील साखरेची पातळी ही अचानक कमी होते.

हृदयासाठी धोकादायक

आल्याचे जास्त प्रमाणात सेवन करणे, हे हृदयविकाराच्या रूग्णांसाठी धोकादायक ठरू शकते. तसेच, रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांनी देखील आल्याचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे.

आल्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने हृदयाची स्थिती बिघडण्याची शक्यता निर्माण होते. तसेच, हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता येऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT