Fitness Tips  esakal
आरोग्य

Fitness Tips : जिममध्ये न जाता तंदुरुस्त राहायचे आहे? मग, 'या' सोप्या अ‍ॅक्टिव्हिटीजचा सराव करा दररोज

Fitness Tips : तुमचे शरीर तंदूरूस्त ठेवण्यासाठी तुम्हाला आहार आणि व्यायामकडे लक्ष द्यायला हवे.

Monika Lonkar –Kumbhar

Fitness Tips : सध्याचे धावपळीचे जीवन, कामाचा वाढलेला ताण, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही नियमितपणे व्यायाम आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे.

थोडक्यात तुमचे शरीर तंदूरूस्त ठेवण्यासाठी तुम्हाला आहार आणि व्यायामकडे लक्ष द्यायला हवे. जर तुम्ही नियमित व्यायाम केला तर तुमचे मानसिक आरोग्य आणि शारिरीक आरोग्य देखील तंदूरूस्त राहू शकेल.

परंतु, अनेकांना जिममध्ये जाऊन व्यायाम करण्याचा कंटाळा येतो. तसेच, घरी व्यायाम करायला ही अनेक जण टाळाटाळ करतात. परंतु, जर तुम्हाला तंदूरूस्त रहायचे असेल तर तुम्ही काही शारिरीक अ‍ॅक्टिव्हिटीज नियमित करू शकता. या अ‍ॅक्टिव्हिटीज करायला ही अतिशय सोप्या आहेत आणि तुम्हाला करताना काही कंटाळा ही येणार नाही. कोणत्या आहेत या अ‍ॅक्टिव्हिटीज? चला तर मग जाणून घेऊयात.

योगा करा

जर तुम्हाला व्यायाम करण्याचा आणि वर्कआऊट करण्याचा कंटाळा येत असेल तर  तुम्ही योगाचा पर्याय नक्कीच निवडू शकता. नियमित योगा केल्याने तुमचा अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर, तुम्ही नियमितपणे योगा करायला हवा. शिवाय, घरच्या घरी तुम्ही योगाची विविध आसने करू शकता.

कोणताही खेळ खेळा

वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत खेळाचा समावेश करू शकता. रोज कोणताही खेळ खेळल्याने तुमची शारिरीक हालचाल होते. यामुळे, शारिरीक आणि मानसिक आरोग्य तंदूरूस्त राहण्यास मदत होते.

फिट राहण्यासाठी तुम्ही कोणताही मैदानी खेळ खेळू शकता. जसे की, फुटबॉल, हॉकी, खोखो, कबड्डी, पोहणे, टेनिस इत्यादी. हे खेळ नियमित खेळल्याने स्नायू मजबूत होतात आणि वजन ही आपोआप कमी होण्यास मदत होते.

चालायला जा

शारिरीक तंदूरूस्तीसाठी नियमितपणे चालायला जाणे हा देखील उत्तम व्यायाम प्रकार आहे. तंदूरूस्त राहण्यासाठी रोज चालायला जाणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे, वजन ही नियंत्रणात राहते. शिवाय चालण्याने तुमचे आरोग्य चांगले राहू शकते. ज्या लोकांना लठ्ठपणाची समस्या आहे, अशा लोकांनी नियमितपणे चालायला हवे. यामुळे, त्यांचे वजन नियंत्रित ठेवले जाऊ शकते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT