Fast Food
Fast Food Sakal
आरोग्य

Fast Food : मुलांना द्या पोषण आहार; नको फास्ट फूड, जंक फूडही टाळाच

अनिल जमधडे

आजकाल बोलबाला असलेल्या फास्ट फूड, जंक फूड, केक, खारी, चॉकलेट, वेफर्सची अशा खाद्य पदार्थांची मुलांना आवड निर्माण झाली आहे.

औरंगाबाद - लहान मुलांना पोषण आहार भरवणे म्हणजे निव्वळ दिव्यच आहे. खाण्यापिण्याच्या बाबतीत मुले नेहमीच नाक मुरडत असतात. मात्र आजकाल बोलबाला असलेल्या फास्ट फूड, जंक फूड, केक, खारी, चॉकलेट, वेफर्सची अशा खाद्य पदार्थांची मुलांना आवड निर्माण झाली आहे. मुळात पालकांची उदासीनता मुलांच्या सवयी बिघडवण्यास कारणीभूत ठरत आहे. हे पदार्थ मुलांना आवडत नाहीत याउलट फास्ट फूड, जंक फूड आणि हवाबंद डब्यातील पदार्थांकडे मुलांचा ओढा वाढला आहे.

डॉक्टरांच्या मते, हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. लहान मुलांसाठी व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फॅट, प्रोटीनयुक्त संतुलित आहार देणे आवश्यक आहे. याशिवाय हिरव्या भाज्या खाण्याने पचनशक्ती चांगली होते. त्यामुळेच मुलांच्या आहारामध्ये नेहमीच मटार, पालक, कोबी, फळे, वरण-भात, पोळी-भाजी, पराठा, दूध, दुग्धजन्य पदार्थ यासारखे पदार्थांची गरज आहे असे बालरोगतज्ज्ञ डॉ. मंजूषा शेरकर यांनी सांगितले.

फास्ट फूडचा बोलबाला

फास्ट फूड हे स्वस्त असल्यामुळे सर्वांच्या खिशाला परवडतात. विशेषतः पिझ्झा, पास्ता, बर्गर, नूडल्स, सँडविच, फ्रेंच फ्राईज, ओनियन रिंग, टाकोज, फ्रँकी, नाचोस, फिश अ‍ॅण्ड चिप्स (तळलेले मासे, बटाट्याचे चिप्स), तळलेले क्रिस्पी चिकन, आइस्क्रीम व डोनट, बिस्किट व केक हेही पदार्थ फास्ट फूडमध्येच गणले जातात.

जंक फूडचाही वाढला वापर

तळलेल्या किंवा साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांना जंक फूड म्हणतात. त्यात मिठाचे म्हणजेच सोडियमचे प्रमाणही अधिक असते. पटकन तोंडात टाकता येतील असे सुके पदार्थ जसे चिप्स, कॉर्न चिप्स, कुकीज, कॅण्डी व पिता येतील असे सोडा, सॉफ्ट ड्रिंक यांचा यात समावेश असतो. तसेच डोनट, फ्राइज, ओनियन रिंग, पिझ्झा, बर्गर अशा पदार्थांचा यात समावेश आहे.

मुलांना लागतेय व्यसन

मुलांना जंक फूडचे लागत असलेले व्यसन अतिशय घातक आहे. मुले मागतात म्हणून पालकही हे खाद्य पुरवण्यात कसर सोडत नाहीत. आजची पिढीच वेगळी आहे किंवा हट्टी आहे, असे म्हणत पालक सर्रास हे खाद्यपदार्थ मुलांना पुरवत असल्याचे चित्र आहे. यातील बहुतांश खाद्यपदार्थांच्या किमती अगदी पाच, दहा-वीस रुपये असल्याने पालकही विरोध करत नाही. नेमकी हीच चूक मुलांच्या सवयी बिघडण्यास कारणीभूत ठरते. मुलांकडून टीव्हीसमोर बसल्या बसल्या दोन-तीन पाकिटांचा फडशा पडतो कळतच नाही.

शरीराला घातकच

अशा पदार्थांमुळे पुढे वय वाढल्यावर पोटातील चरबी वाढून बालस्थूलता, मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयविकार, दातांची कीड, यकृताच्या कामातील बिघाड यासारखे आजार होतात. हे पदार्थ टिकविण्यासाठी त्यात वापरली गेलेली प्रिझव्‍‌र्हेटिव्हज आणि इतर रासायनिक घटक तसेच साखर, मीठ आणि चरबीयुक्त घटक शरीराला हानिकारक असतात.

समतोल आहाराची गरज

डॉ. मंजूषा शेरकर (सचिव बालरोगतज्ज्ञ संघटना) - लहान मुलांच्या झपाट्याने वाढणाऱ्या वयात शरीरासाठी आवश्यक समतोल जीवनसत्त्वयुक्त आहाराची गरज असते. कार्बोटके, प्रथिने, पिष्टमय पदार्थ, तंतुमय पदार्थ, स्निग्धपदार्थ यांचे योग्य प्रमाण असावे. लोह, कॅल्शियम, झिंक, आयोडीन, फोलिक ॲसिड, कॉपर सेलेनियम आदी विविध जीवनसत्त्व आवश्यक आहेत. फास्टफूड, जंकफूडमध्ये साखर आणि मिठाचे प्रमाण अधिक असते जे की शरीराला हानीकारक आहे. चव लागते म्हणून मुले या पदार्थांकडे आकृष्ट होतात त्यामुळे पालकांनी घरच्या घरी हेल्दी फूड तयार करुन त्याची सवय मुलांना लावली पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: ९० वर्षांचे भाजप नेते राम नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT