Medical Representatives (MR) Not Allowed In Government Hospitals sakal
आरोग्य

MR Access Denied in Govt Hospitals: सरकारी रुग्णालयांत ‘एमआर’ला प्रवेशबंदी; डॉक्टरांना जाहिरातदारांपासून संरक्षण

Government Policies to Regulate Pharmaceutical Marketing: सरकारी रुग्णालयांत डॉक्टरांना फार्मास्युटिकल जाहिरातींपासून सुरक्षित ठेवण्यासाठी एमआर प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

How MR Restrictions Protect Doctors from Pharma Influence: औषधांच्या विक्रीसाठी कंपन्यांकडून नेमल्या जाणाऱ्या वैद्यकीय प्रतिनिधींना (एमआर) सरकारी रुग्णालयांमध्ये जाऊन डॉक्टरांना भेटण्यास केंद्र सरकारने मज्जाव केला आहे. अलीकडेच आरोग्य मंत्रालयाच्या अख्त्यारितील आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून (डीजीएचएस) याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले होते.

सरकारी वैद्यकीय रुग्णालयांच्या आवारात ‘एमआर’ ना येण्यास मनाई केली जावी, असे ‘डीजीएचएस’ने आदेशात म्हटले आहे. औषधे तसेच विविध वैद्यकीय उत्पादनांच्या विक्रीसाठी कंपन्यांकडून वैद्यकीय प्रतिनिधींची नेमणूक केली जाते. आपापल्या कंपन्यांच्या औषधांची विक्री करण्यासाठी या प्रतिनिधींमध्ये अक्षरशः स्पर्धा सुरू असते.

अनेकजण सरकारी आणि खासगी रुग्णालयांत जाऊन जाहिरातबाजी करत असतात. विशेषत: नव्याने तयार झालेले औषध, त्याची उपचार पद्धती याची माहिती देण्यासाठी हे प्रतिनिधी काही नमुने (सॅम्पल) देखील भेट म्हणून डॉक्टरांना देत असतात.

दिल्लीतील सफदरजंग, डॉ. राममनोहर लोहिया, लेडी हार्डिंग्ज, रूरल हेल्थ ट्रेनिंग सेंटर तसेच अन्य सरकारी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय प्रतिनिधींना येण्यास मज्जाव केला जावा, असे ‘डीजीएचएस’ने आदेशात म्हटले आहे.

माहिती मेलवर द्यावी लागणार

रुग्णालयात येण्यास ‘एमआर’ना मनाई असल्याबाबत सर्व विभाग प्रमुखांना कळवावे तसेच या आदेशाचे काटेकोरपणे पालन केले जावे, असे ‘डीजीएचएस’ने सरकारी रुग्णालयांना कळविले आहे. औषधाचे स्वरूप, नवीन उपचारपद्धती, शोध अथवा औषध घेण्याची प्रक्रिया अशी माहिती द्यायची असल्यास वैद्यकीय प्रतिनिधी ती मेल किंवा ऑनलाइनच्या माध्यमातून देऊ शकतात.

डॉक्टरांवर प्रभाव टाकण्यासाठी वैद्यकीय प्रतिनिधी नाना क्लृप्त्या लढवीत असतात. शिवाय त्यांच्या वारंवार भेटी देण्यामुळे रुग्णसेवेत बाधा येते. हे टाळण्यासाठी वरील आदेश जारी केल्याचे ‘डीजीएचएस’ने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Tiruchi N. Siva: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही होणार बिनविरोध?, ‘I.N.D.I.A’ आघाडीकडून तिरुची शिवा उमेदवारीसाठी चर्चेत!

“वयाचं गणित फेल!” – सुबोध-रिंकूच्या जोडीनं सोशल मीडियावर रंगली ट्रोलिंग, रिंकू- सुबोधच्या वयात नक्की किती अंतर आहे?

Latest Marathi News Live Updates : निम्न दूधनाचा पाणीसाठा ७० टक्क्यांवर

SCROLL FOR NEXT