Government Initiatives for Antenatal and Postnatal Care in Villages: प्रसूतीची अंतिम तारीख उलटूनही रुग्णालयात येण्यास नकार देत असताना जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या अथक प्रयत्नांमुळे एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भागातल्या वाडसकला येथील २२ वर्षीय वीणा वासुदेव पोटावी या मातेला वेळेवर उपचार मिळाले. यामुळे माता आणि बाळ दोघांचाही जीव वाचला. प्रशासनाच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वीणा पोटावी यांची प्रसूतीची अपेक्षित तारीख २१ मे २०२५ असतानाही त्या उपचारासाठी प्राथमिक आरोग्य पथक जारावंडी येथे येण्यास तयार नव्हत्या. मागील एक महिन्यापासून ‘९०-४२ दिवस मिशन’ अंतर्गत जारावंडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशील घोनमोडे आणि आशा सेविका मीना आतला त्यांच्या घरी जाऊन नियमित तपासणी करत होत्या.
१५ मे २०२५ पासून आरोग्य सेविका सुनंदा आतला आणि आशा सेविका मीना आतला यांनी दररोज त्यांच्या घरी जाऊन आरोग्य सेवा दिली. डॉ. घोनमोडे यांनीही अनेक वेळा मातेची तपासणी केली, परंतु माता आणि त्यांच्या कुटुंबीय रुग्णालयात येण्यास स्पष्ट नकार देत होते.
मागील ५-६ दिवसांपासून मातेच्या पायावर आणि चेहऱ्यावर सूज वाढली होती, तसेच रक्तदाबही वाढत होता. यामुळे माता आणि बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकत होता. ही गंभीर परिस्थिती माता आणि तिच्या नातेवाईकांना समजावून सांगितली असतानाही, त्यांनी रुग्णालयात येण्यास नकार दिला.
२६ मे रोजी डॉ. प्रशील घोनमोडे, ज्ञानेश्वर गिरहे (समुदाय आरोग्य अधिकारी, भापडा) आणि आरोग्य सेविका सुनंदा आतला यांनी पुन्हा एकदा ‘९०-४२ दिवस मिशन’ अंतर्गत घरी जाऊन तपासणी केली असता मातेच्या चेहऱ्यावरील आणि पायांवरील सूज तसेच रक्तदाब लक्षणीय वाढलेला दिसला. यावरही माता आणि नातेवाईक दवाखान्यात येण्यास तयार नव्हते. डॉ. घोनमोडे यांनी तातडीने ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण चौधरी यांच्या निदर्शनास आणली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.