क्षयरोगाचे रुग्ण शोधण्यासाठी sakal media
आरोग्य

Health : क्षयरोगाचे निदान

डॉक्टरांशी सल्लामसलत करून त्यांनी दिलेल्या औषधांसोबत सरकारी औषधे घेऊ शकता.

सकाळ वृत्तसेवा

डॉ. कोमल बोरसे आरोग्यशास्त्र

क्षयरोग असल्याचे निदान झाल्यानंतर आपल्याला ६ महिन्यांचा औषधांचा कोर्स करावा लागतो. औषधांचा काही त्रास झाल्यास ती लगेच बंद करू नयेत. मळमळत असल्यास रक्ताची तपासणी करून कावीळीची शक्यता तपासता येते. मळमळ कमी करण्यासाठी दिलेल्या गोळीने शरीराला खाज सुटू शकते. ती ॲलर्जीच्या गोळीने आपण टाळू शकतो.

दृष्टी कमकुवत झाल्यास तातडीने तपासणी केली पाहिजे. क्षयरोगाच्या औषधांबरोबर अन्य कोणतेही औषध सुरू असल्यास मूळ औषधांचा परिणाम कमी होऊ शकतो. क्षयरोगाच्या गोळ्या वजनानुसारच घेतल्या पाहिजेत. सर्व गोळ्या नाश्त्याच्या दोन तासानंतर घेतल्यास मळमळ कमी होते. सरकारी औषधे, म्हणजे डॉट्स मोफत असतात.

तुम्ही उपचार घेत असलेल्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून त्यांनी दिलेल्या औषधांसोबत सरकारी औषधे घेऊ शकता. यकृताला सूज आल्यावरच औषधे बदलली जातात आणि डॉक्टरांच्या तपासणीनंतर पुन्हा सुरू केली जातात. किडनीला त्रास झाल्यास गोळ्यांचा डोस कमी होतो. संधीवाताचा त्रास जाणवू शकतो. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मधुमेह असल्यास इन्सुलिन घेऊन त्यावर पूर्ण नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मधुमेह किंवा इतर कोणत्याही कारणाने प्रतिकारशक्ती कमी झाल्यास क्षयरोग आणखी बळावू शकतो. गरोदरपणातही क्षयरोगाची औषधे सुरू ठेवणे आवश्यक असते.

क्षयरोगाचा संसर्ग घरातील लोकांनाही होऊ शकतो. विविध शास्त्रीय चाचण्यांद्वारे क्षयरोगाचे निदान करता येते. पॉझिटिव्ह आल्यावर आपण क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचार सुरू करू शकतो. फुप्फुसांचा क्षयरोग पसरतो. बाकी शरीराच्या दुसऱ्या भागांत झालेला टीबी पसरत नाही. उपचार मार्गदर्शक तत्त्वांद्वारे केला पाहिजे.

क्षयरोगची ओषधे पुनःपुन्हा परत बदल्यावर किंवा कमी केल्यावर क्षयरोग बळावतो. उपचार लांबतात आणि औषधांचे दुष्परिणाम अधिक होतात. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस नावाचा विषाणू आजार पसरवतो. ताप, खोकला, वजन कमी होणे, भूक न लागणे ही सामान्य लक्षणे आहेत. मानेवर सूज येणे, खोकल्यामध्ये रक्त पडणे, पाठ दुखणे, पोटात दुखणे, वंध्यत्व हे दुर्मिळ लक्षणे आहेत.

क्षयरोगाचे उपचार आजार निश्‍चित झाल्याशिवाय करू नये. थुंकीचा तपास किंवा ब्रॉकोस्कोपीद्वारे तपास व सूक्ष्मदर्शकाखाली विषाणू सापडल्यावर आपण क्षयरोग असल्याचे निदान करतो. त्यानंतर औषधांना प्रतिसाद असणाऱ्या क्षयरोगाचीही चाचणी उपलब्ध आहे. औषध संवेदनशीलता चाचणी करून सुरवातीलाच साधा क्षयरोग आहे की वेदनशील हे निश्‍चित करता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT