health Eating Junk food is responsible for Low calcium
health Eating Junk food is responsible for Low calcium sakal
आरोग्य

जंकफूड कॅल्शिअम संपवतंय, हाडं ठिसूळ होण्याचं प्रमाण वाढलं!

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर जैन : मॉडर्न लाइफस्टाइल जगण्याच्या नावाखाली जंक फूड खाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण सर्वत्र होत आहे. यामुळे आहारात पोषक तत्वांची कमतरता ,स्थूलता अशा अनेक कारणांमुळे लहान मुलांमध्ये कॅल्शियमची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या कॅल्शिअम गरजेकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

विविध ठिकाणी किंवा हॉटेलमध्ये विकले जाणारे जंक फूड लहान मुलांपासून ते मोठयापर्यंत अनेक जण आवडीने खाताना दिसून येतात, एखाद्या वेळेस जंकफूड सारखे पदार्थ खाणे ठीक आहे, परंतु बरीचशी लहान मुले इतर काही खातच नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. ते केवळ जंकफूड च मागतात. परंतु यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.पालकांकडून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

लहान मुलांमध्ये वाढत्या वयासोबत त्यांचा विकास होत असतो.शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यास हाडे ठिसूळ होतात, दात लवकर तुटणे असे परिणाम दिसून येतात. यासोबतच कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हात आणि पायाला मुंग्या येणे, अशक्तपणा जाणवणे अशा समस्या उद्भवतात. मात्र मुले पालकाकडे जंकफूड खाण्यासाठी आग्रह धरला जातो,जंकफूडचा अतिसेवनाने याचा विपरीत परिणाम शरीरावर दिसून येत आहे.

जंकफूड अतिसेवनामुळे कॅल्शियम कमी

जंकफूडमध्ये फॅट, कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असते, तर प्रोटीन, व्हिटॅमिनचे प्रमाण कमी असते.त्यामुळे त्यांच्या अतिसेवनामुळे कॅल्शियम, लोह कमी होण्याची शक्यता अधिक असते. सोबतच लठ्ठपणा व ईतर समस्या ,उच्चरक्तदाब,हार्ट संबंधित समस्या कमी वयातच जाणवू शकतात.त्यामुळे पोषक आहार, हिरव्या पालेभाज्याचा वापर आहारात करणे गरजेचे आहे.त्यामुळे शरीरात कॅल्शियम ची पूर्तता होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT