Bajari Thalipeeth Recipe sakal
आरोग्य

Bajari Thalipeeth Recipe: बाजरीचे थालीपीठ

बाजरी ही कॅल्शियम, लोह, प्रोटिन, फायबर अशा पोषक घटकांनी युक्त असल्याने लठ्ठपणा कमी करण्यासाठी,

सकाळ वृत्तसेवा

आता हिवाळा सुरू झाला आहे. या ऋतूत शरीरातील उष्णता टिकवण्यासाठी उष्ण गुणांनी युक्त बाजरीचा उपयोग होतो.

तसेच, बाजरी ही कॅल्शियम, लोह, प्रोटिन, फायबर अशा पोषक घटकांनी युक्त असल्याने लठ्ठपणा कमी करण्यासाठी, तसेच मधुमेह आणि हृदयविकार अशा आजारांमध्ये फायदेशीर ठरते, म्हणूनच आज आपण या बाजरीची एक साधी सोपी; पण चविष्ट आणि पौष्टिक अशी एक पाककृती पाहू...

साहित्य :

  • १ कप बाजरी पीठ

  • १ कप बारीक चिरलेला कोबी

  • १/२ कप बारीक चिरलेला कांदा

  • १/२ कप खिसलेले गाजर

  • १ कप बारीक चिरलेली मेथी

  • १/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर

  • २ चिरलेल्या मिरच्या

  • मीठ चवीप्रमाणे

  • १/२ चमचा जिरे

  • तिखट चवीप्रमाणे

  • १/२ चमचा हळद

  • २ लहान चमचे तेल

  • २ चमचे दही

कृती :

  • सर्वप्रथम वरील सर्व जिन्नस एकत्र करून त्यामध्ये दोन चमचे दही घाला आणि चांगले थालीपीठाचे पीठ मळून घ्या.

  • नंतर तव्यामध्ये थोडेसे तेल लावून किंवा नॉनस्टिक तव्यावर नेहमीच्या थालीपीठाप्रमाणे थालीपीठ थापा.

  • थोडेसे तेल घालून दोन्ही बाजूने थालीपीठ खमंग भाजून घ्या.

  • हे थालीपीठ कोणत्याही चटणीबरोबर किंवा सॉस बरोबर छान लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT