Urine Problem google
आरोग्य

Health News : कमी पाणी पिऊनही वारंवार लघवीला का जावं लागतं?

पाणी कमी पिऊनही तुम्हाला वारंवार लघवीला होत असेल तर ही चिंतेची बाब आहे.

वैष्णवी कारंजकर

उन्हाळा आता सुरू झाला आहे. त्यामुळे आपण सर्वच जण शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पितो. जेव्हा शरीरात पाणी जास्त असतं, तेव्हा वारंवार लघवीला लागते. पण काही जणांना कमी पाणी पिऊनही वारंवार लघवीला जावं लागतं. ते कशामुळे?

उन्हाळ्यामध्ये दिवसात ५ ते ८ वेळा लघवीला जाणे हे सामान्य आहे. पण जर पाणी कमी पिऊनही तुम्हाला वारंवार लघवीला होत असेल तर ही चिंतेची बाब आहे. असं का होतं?या मागची कारणं काय आहेत? जाणून घ्या...

यूटीआय - युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन

ब्लॅडरला सूज आल्याने हे इन्फेक्शन होतं. त्यामुळे वारंवार लघवीला जावं लागतं. कारण ब्लॅडर लघवी साठवून ठेवू शकत नाही.

डाय़बेटिस

जर तुम्ही कमी पाणी पित असाल आणि तरीही तुम्हाला वारंवार लघवीला जावं लागू शकतं. याचं कारण डायबेटिस असू शकतं. टाईप टू डायबेटिस असलेल्या रुग्णांमध्ये हे लक्षण दिसतं. तुम्हालाही हे लक्षण दिसत असेल, तर त्वरीत रुग्णांचा सल्ला घ्या.

जर तुम्हाला पाणी पिल्याशिवाय वारंवार लघवीला जावं लागत असेल तर तुमचं युरिनरी ब्लॅडर जास्त सक्रिय असू शकतं. जेव्हा ब्लॅडरची लघवी साठवून ठेवण्याची क्षमता कमी होते, किंवा दबाव येतो, तेव्हा लघवीला जावं लागतं.

किडनी इन्फेक्शन

वारंवार लघवीला जावं लागत असेल तर तुम्हाला किडनी इन्फेक्शन झालेलं असू शकतं. असं जर होत असेल, तर त्वरीत डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या. जेव्हा किडनीचे फिल्टर खराब होतात, तेव्हा लघवी करण्याचं प्रमाण वाढतं.

प्रोस्टेट

जर पुरुषांना वारंवार लघवीला जावं लागत असेल, तर याचं कारण प्रोस्टेट ग्रंथी वाढणं हेही असू शकतं. प्रोस्टेट ग्रंथी ब्लॅडरच्या खालच्या भागात असते. ही ग्रंथी आयुष्यभर वाढत असते. पण जेव्हा ती प्रमाणापेक्षा वाढते, तेव्हा मूत्रमार्गावर दबाव येऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Hike : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा फटका, आता एसटीचा प्रवास आणखी महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले संकेत...

Kolhapur Ministers Convoy Stopped : कोल्हापुरातील मंत्र्यांचे दिशादर्शक पाऊल; मुश्रीफ, आबिटकर, क्षीरसागरांनी वाहनांचा ताफा नाकारला, आमदार, खासदार बंद करणार का?

Chhatrapati Sambhaji Maharaj Procession : छत्रपती संभाजी महाराजांच्या मिरवणूकीला पोलिसांनी परवानगी नाकारली, शिव-शंभू समर्थक आक्रमक, गारगोटीत तणाव

मोठी बातमी! मॉर्टगेज लोनसाठी शेतकऱ्यांना बॅंकांचे दरवाजे बंद; थकबाकी वाढल्याने बॅंकांनी आखडला हात; केवळ पीक कर्जवाटपालाच प्राधान्य, वाचा...

Panchang 15 May 2026 : आजचे पंचांग! शनि जयंती, अमावस्या आणि शुभ मुहूर्त; जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण राशीभविष्य

SCROLL FOR NEXT