मधाचं अतिसेवन हानिकारक Esakal
आरोग्य

Honey Side Effects: मधामुळे केवळ फायदेच नव्हे तर नुकसानही होवू शकतं, अतिसेवनामुळे शरीरावर होतील दुष्परिणाम

मधामध्ये ग्लुकोज आणि अमिनो ऍसिड उपलब्ध असल्याने मधाच्या अतिसेवनामुळे त्याचे शरीरावर काही दुष्परिणामही दिसू शकतात

Kirti Wadkar

मधाचे शरीराला अनेक फायदे आहेत. मधामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वं आढळतात. मधामध्ये Honet मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ६, कार्बोहायड्रेट, अमीनो ऍसिड अशी पोषक तत्व आढळतात. यामध्यै नैसर्गिक साखर Natural Sugar म्हणजेच गोडवा असतो ज्याचे शरीरासाठी काही फायदे आहेत. Health Tips Marathi Know the ill effects of over consumption of honey

अनेकजण साखरेला पर्याय म्हणून मधाचा वापर करतात. काहीजण खास करून वेटलॉससाठी Weight Loss दैनंदिन आहारामध्ये मधाचा वापर करत असतात. मग सकाळचा ग्रीन टी Green Tea असो किंवा ओट्स, चहा तसंच एखाद्या गोड पदार्थातही साखरेएवजी मधाचा Honey वापर केला जातो. मात्र मधामध्ये ग्लुकोज आणि अमिनो ऍसिड उपलब्ध असल्याने मधाच्या अतिसेवनामुळे त्याचे शरीरावर काही दुष्परिणामही दिसू शकतात.

मधाच्या अतिसेवनामुळे पचनासह आरोग्याच्या इतरही समस्या निर्माण होवू शकतात.

रक्तातील साखर वाढू शकते- अनेकजण साखरेला पर्याय म्हणून मधाचा वापर करतात. मात्र मधामध्ये नैसर्गिक गोडवा असला तरी त्याच साखरेप्रमाणेच Sugar संपूर्ण दिवस सतत विविध माध्यमातून सेवन करणं शरीरासाठी घातक ठरू शकतं. कारण मधामध्ये मोठ्या प्रमाणात कार्ब्स तसंच ग्लुकोज असतं. ज्यामुळे ब्लड शुगर वाढू शकते.

खास करून मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांनी मधाचं सेवन करताना काळजी घेणं गरजेचं आहे. अगदी नियंत्रणात किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच अशा व्यक्तींनी मधाचं सेवन करावं.

पोटाच्या समस्या- जर तुम्हाला सतत बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होत असेल तर मधाचा अगदी कमी प्रमाणात वापर करावा. कारण अधिक प्रमाणात मधाचं सेवन केल्यास पचनाच्या समस्या निर्माण होतात. यामुळे तुम्हाला पोटदुखीचा त्रास देखील होवू शकतो.

हे देखिल वाचा-

वजन वाढू शकतं- अनेकजण वजन करण्यासाठी डाएट Diet करत असताना आहारातून साखर काढून टाकतात. मात्र त्याएवजी मधाचा वापर वाढवतात. मात्र मधाचं जास्त सेवन केल्याने वजन देखील वाढू शकतं.

कारण मधामध्ये देखील मोठ्या प्रमाणात कार्ब्स, कॅलरी आणि साखर आढळते. ज्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं. यासाठीच वेटलॉस डाएटमध्ये देखील मधाचं नियंत्रणात सेवन करावं.

फूड पॉयझनिंग- मधाचं अतिसेवन केल्यास फूड पॉयझनिंग Food Poisoning होण्याचा धोका असतो. यामुळे तुम्हाला उलटी, मळमळ, पोटदुखी तसंच जुलाब असा त्रास होवू शकतो. म्हणून मधाच सेवन करताना ते काळजीपूर्वक करावं.

दातांच्या समस्या- मधामध्ये देखील साखर असल्याने दातांच्या समस्या निर्माण होवू शकतात. मधाच्या अतिसेवनामुळे दात किडण्याची शक्यता वाढते.

अॅलर्जीचा धोका- ज्या व्यक्तींना पराग कणांची एलर्जी आहे अशा व्यक्तींनी मधाचं सेवन टाळावं. मधाच्या सेवनामुळे अशा व्यक्तींमध्ये अॅलर्जीची समस्या वाढू शकते. यामुळे त्वचेवर खाज येणं, तसंच रॅशेस येणं, त्वचा लाल होणं अशा समस्या उद्भवू शकतात.

ज्याप्रमाणे कोणत्याही पदार्थाच्या अतिसेवनामुळे शरीराचं नुकसान होवू शकतं त्याचप्रमाणे मधाचे आरोग्याला फायदे असले तरी त्याच्या अतिसेवनामुळे काही तोटे निर्माण होऊ शकतात. म्हणून मधाचं नियंत्रणात सेवन करणं गरजेचं आहे.

हे देखिल वाचा-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT