Vitamin A Foods Sources List
Vitamin A Foods Sources List  esakal
आरोग्य

Vitamin A Foods : डोळ्यांसाठी फायदेशीर आहे ‘Vitamin A’; जाणून घ्या, ते कोणत्या पदार्थात जास्त मिळतं!

Pooja Karande-Kadam

Vitamin A Foods: आपल्या शरिराला अन्न आणि पाण्याची गरज असते. त्याचप्रकारे सुदृढ शरीरासाठी व्हिटॅमिनची देखील आवश्यकता असते. कारण शरीरात व्हिटॅमिनची कमी भासली तर आपल्याला अनेक आजारांना तोंड द्यावे लागते. लोकांना Vitamin A च्या कमतरतेमुळे काय काय आजार होऊ शकतात हेच माहित नसते.

व्हिटॅमिन 'ए' ची पुरेशी मात्रा शरीराला मिळायलाच हवी. कारण Vitamin A हे दृष्टी सुधारण्यात मदत करते, शिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, स्वस्थ प्रजनन प्रणाली आणि त्वचेच्या चांगल्या आरोग्यासाठी सुद्धा आवश्यक असते. Vitamin A ला रेटीनॉल असे सुद्धा म्हणतात.

Vitamin A ची कमी असल्याने डोळ्यांच्या आजारांना आमंत्रण मिळते. नजर कमजोर होणे. रातांधळेपणाची समस्या होणे, असे प्रकार व्हायला लागतात.

पण,तुम्ही असे गंभीर आजार काही पदार्थांच्य नियमित सेवनाने करू शकता. तर आज जाणून घेऊयात Vitamin A युक्त कोणकोणते पदार्थ आहेत. आणि त्याच्या सेवनाने काय फायदे मिळतात हे पाहुयात.  

दृष्टी सुधारण्यासाठी डॉक्टर व्हिटॅमिन ए घेण्याचा सल्ला देतात. पालकची पाने तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. होय, पालक ज्यामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन या दोन अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. ते तुमची दृष्टी सुधारण्यास मदत करू शकतात.

WHO चा धक्कादायक खुलासा

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) एका अहवालानुसार, व्हिटॅमिन ए ची कमतरता जर शरीरात निर्माण झाली तर रातआंधळेपणा ही सर्वात आधी होणारी समस्या होय. याच्या पुढच्या स्टेजमध्ये व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे रेटिना आणि कॉर्नियाला अधिक नुकसान पोहोचते.

त्याचा डोळ्यांवर मोठा परिणाम होऊ शकतो. एका अहवालानुसार व्हिटॅमिन ए ची कमतरता असणारी 2 लाख ५० हजार मुले दरवर्षी आंधळी होतात. त्यातील अर्धी मुले आंधळी झाल्यावर 12 महिन्यांच्या आतच मृत्यू पावतात.

पालक या आजारांवर फायदेशीर आहे

पालकच्या काही रेसिपीज पाहुया

पालक कोशिंबीर

ऑलिव्ह ऑईल आणि पालक कोशिंबीर हे असे पदार्थ आहेत जे तुमची दृष्टी सुधारण्यास मदत करतील. अँटिऑक्सिडंट्स, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन, योग्यरित्या शोषले गेल्याची खात्री होते. त्यामुळे पालक धुवून थोडी वाफ घ्या. नंतर त्यात कांदा, मिरची, मीठ आणि ऑलिव्ह ऑईल घालून सेवन करा.

पालक स्मूदी

तुम्ही पालक बारीक करून आणि लिंबाचा रस घालून पालक स्मूदी तयार करू शकता. ही स्मूदी तुमची पचनक्रिया वेगवान करण्यासोबतच तुमची दृष्टी वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. पालकातील ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन, लिंबू सोबत एकत्रित केल्याने डोळे निरोगी राहतात आणि त्याचे कार्य गतिमान होते.

पालक रायता

पालक रायता आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. तुमची दृष्टी वाढवण्यासोबतच इतर समस्या टाळण्यास मदत होते. त्यामुळे पालक शिजवून बारीक करून दह्यामध्ये मिसळून सेवन करा. हा पालक रायता तुमच्या आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरेल. तर, तुमची दृष्टी वाढवण्यासाठी तुम्ही या पद्धतीने पालक खाऊ शकता.

Vitamine A असलेले इतर पदार्थ

मांस, मासे, अंडी, गाजर, टोमॅटो, दूध, पालक, चाकवत, सफरचंद, द्राक्षे, संत्री,  पालेभाज्या, किवी,  ब्रोकोली, ऍव्होकॅडो,  बदाम, अक्रोड,

(Disclaimer: हा मजकूर फक्त सल्ल्यासह सर्वसाधारण माहिती प्रदान करतो. अधिक माहितीसाठी नेहमी तज्ज्ञ किंवा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Action: ग्राहक चिंतेत! येस बँक आणि ICICI बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?

Latest Marathi Live News Update : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबलचक लांब रांगा

Shahid Kapoor And Mira Rajput: शाहिद अन् मिरानं वरळीत घेतलं आलिशान घर; किंमत माहितीये?

Rafael Nadal French Open 2024 : लाल मातीचा बादशहा नदाल पहिल्या फेरीत बाहेर

Rahul Gandhi: सावरकरांची बदनामी प्रकरण; पुणे पोलिसांनी कोर्टाला असं काय सांगितले? ज्यामुळे राहुल गांधींच्या अडचणी वाढणार

SCROLL FOR NEXT