Heart Attack Reason in Marathi Sakal
आरोग्य

Heart Attack: हार्ट अटॅक अन् हार्ट फेल्युअरमध्ये काय फरक असतो? वेळीच उपचारांची असते गरज...

धमण्यांमध्ये कुठला अडसर, कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढणं किंवा हाय ब्लड प्रेशरमुळे हार्ट अटॅकचा धोका असतो. जर वेळेतच हे ओळखलं तर जीव वाचू शकतो. हार्ट फेल्युअर म्हणजे कंझेस्टिव्ह हार्ट फेल्युअर तेव्हा होतो जेव्हा हृदय योग्य प्रकारे पंम्पिंग करत नाही. हार्ट फेल्युअरवर कुठलाही उपचार नाही.

संतोष कानडे

Heart Attack Vs Heart Failure: हृदयरोगाचे रुग्ण जगभरात वाढत आहेत. मागच्या काही वर्षांपासून प्रत्येक वयाच्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचे रुग्ण वाढत आहेत. काही अभ्यासानुसार, कोविड-१९ नंतरच हार्ट डीसीज आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा वाढला आहे.

भारतामध्ये ३० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांमध्ये हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टचं प्रमाण वाढलं आहे. हार्ट फेल्युअर आणि हार्ट अटॅक हे दोन्ही प्रकार एकच आहे, असं अनेकांचा समज असतो. परंतु असं नसून दोन्ही प्रकारांमध्ये फरक आहे.

हेल्थ एक्स्पर्ट सांगतात की, हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्युअर दोन्ही वेगवेगळ्या कंडिशन आहेत. हार्ट अटॅक म्हणजेच हृदयविकाराचा झटका. यालाच मायोकार्डियल इंफार्क्शन म्हणटलं जातं. हृदयातल्या कुठल्यातरी भागात जेव्हा ब्लड फ्लोमध्ये अचानक कमरता येते किंवा कुठल्यातरी कारणाने ब्लड सर्क्युलेशला अडसर ठरतो.

धमण्यांमध्ये कुठला अडसर, कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढणं किंवा हाय ब्लड प्रेशरमुळे हार्ट अटॅकचा धोका असतो. जर वेळेतच हे ओळखलं तर जीव वाचू शकतो. हार्ट फेल्युअर म्हणजे कंझेस्टिव्ह हार्ट फेल्युअर तेव्हा होतो जेव्हा हृदय योग्य प्रकारे पंम्पिंग करत नाही. हार्ट फेल्युअरवर कुठलाही उपचार नाही.

फरक काय?

हार्ट अटॅकमध्ये जर रुग्णाला वेळेत उपचार मिळाले तर त्याला वाचवलं जाऊ शकतं. सीपीआरसारख्या उपायांमुळे मोठी मदत होऊ शकते. परंतु हार्ट फेल्युअरला कुठलाही इलाज नाही. हार्ट अटॅक हा कोणत्याही वयामध्ये येऊ शकतो. आजकाल तरुण मुलांमध्येही अटॅकचं प्रमाण वाढलं आहे.

हार्ट अटॅकचे अनेक कारणं असू शकतात. ज्यात धूम्रपान, मधुमेह, लठ्ठपणा आणि ताण-तणावाचा समावेश आहे. हार्ट अटॅकनंतर रुग्णांना आराम करण्यासोबतच नियमित एक्सरसाईज आणि हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करावं लागतं. हार्ट सर्जरीनंतर रुग्णाला काही आठवड्यांमध्ये बरं होण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मनसे नेते अविनाश जाधव यांची सुटका, आंदोलनात घेतला सहभाग

MNS Mira bhayandar Morcha: मराठी मोर्चाला पोलिसांचा अडथळा? गुजराती-मारवाडींची चिथावणी; मीरा-भाईंदरमध्ये काय घडलं?

निशिकांत दुबेंच्या विधानावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले मंत्री प्रताप सरनाईक?

Viral Video : पुढील कसोटीसाठी येण्याची तसदी घेऊ नकोस! Dinesh Karthik ने सर्वांसमोर रवी शास्त्रींची केली पोलखोल

अखेर अस्मिताला समजणार प्रियाचा खरा चेहरा; भावजयीवर चांगलीच भडकली , वाचा 'ठरलं तर मग' मध्ये पुढे काय होणार?

SCROLL FOR NEXT