home remedy for weight loss tips by hansa yogendra daily routine care  sakal
आरोग्य

वजन कमी करायचंय? हे कराच...

काही पदार्थ तुमच्या शरीरात चरबी आणि वजन वाढवतात, तर काही पदार्थ योग्य प्रमाणात घेतल्यास वजन कमी होण्यास हातभार लागतो.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. हंसा योगेंद्र

काही पदार्थ तुमच्या शरीरात चरबी आणि वजन वाढवतात, तर काही पदार्थ योग्य प्रमाणात घेतल्यास वजन कमी होण्यास हातभार लागतो. येथे काही पदार्थ आहेत, जे योग्य वजन राखण्यास मदत करतात आणि अतिरिक्त वजन कमी करण्यास मदत करतात.

मध ः आपण झोपायच्या आधी मध खातो तेव्हा झोपेच्या सुरुवातीच्या काळात शरीरात जास्त चरबी जाळण्यास सुरुवात होते. यकृताला ग्लुकोज तयार करण्यासाठी मध इंधन म्हणून काम करते. हे ग्लुकोज मेंदूतील साखरेची पातळी उच्च ठेवते आणि चरबी जाळण्यासाठी हार्मोन्स सोडण्यास भाग पाडते. तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात सर्व गोड पदार्थांना मधाने बदलू शकता. झोपण्यापूर्वी एक चमचा मध घ्या.

लिंबाच्या रसामध्ये सब्जाच्या बिया : वजन कमी करण्यासाठी सकाळी लिंबू पाणी आणि सब्जाच्या बियांचे (चिया बिया) सेवन उत्तम पर्याय आहे. एक ग्लास लिंबू पाणी कमीतकमी सहा कॅलरी ऊर्जा बर्न करू शकतात. सब्जाच्या बियांमुळे तुम्हाला तृप्त वाटू शकते. महत्त्वाचे म्हणजे, दिवसभर जास्त खाणे टाळू शकतात. दोन चमचे चिया बियाणे तुम्हाला दिवसभरातील फायबरच्या ४० टक्के भाग देऊ शकतात.

जिऱ्याचे पाणी : वजन कमी करण्यासाठी जिरे अत्यंत फायदेशीर आहेत. जिऱ्याचे पाणी भूक कमी करून चरबी जाळण्याची प्रक्रियेत सुधारणा करते. त्याचबरोबर चयापचय क्रियेत लक्षणीयरित्या सुधारणा होते. एक चमचा जिरे एका ग्लास पाण्यात भिजवून रात्रभर ठेवा. हे मिश्रण सकाळी गाळून सेवन करावे. हे पाणी पिताना तुम्ही काही भिजवलेले जिरे चावून खाऊ शकता.

भाज्या : तुमच्या दैनंदिन आहारात कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली भाज्यांचा समावेश करा. या भाज्या फायबरचा मोठा स्रोत आहेत. त्यामुळे तुम्हाला दिवसभर तृप्त वाटू शकते. त्यामध्ये कॅलरी आणि कर्बोदके कमी असतात. स्टार्च नसलेले, फायबर युक्त अन्न वजन कमी करण्याच्या योजनेचा भाग बनले पाहिजे.

सफरचंद : दररोज एक सफरचंद केवळ डॉक्टरांना दूर ठेवत नाही तर अतिरिक्त वजन देखील ठेवते. सफरचंद सालासह खावे. सफरचंद हा उत्कृष्ट कॅलरीयुक्त आहार असून, त्यामुळे पोट भरते.

लोह, जस्त आणि सेलेनियम समृद्ध अन्न : लोह, जस्त आणि सेलेनियम समृद्ध अन्न थायरॉईड क्रियाकलाप वाढविण्यासाठी ओळखले जातात. थायरॉईडची क्रिया जितकी जास्त असेल तितकी चयापचय क्रिया जास्त असेल.

चयापचय वाढल्याने कॅलरी वेगाने जळण्यास होण्यास मदत होते. तुमच्या शरीराला पुरेसे लोह, जस्त आणि सेलेनियम मिळण्यासाठी तुमच्या आहारात अधिक काजू, सुकामेवा यांचा समावेश करावा.

वरील सर्व पदार्थ तुमचे वजन वाढण्यापासून रोखू शकतात, परंतु त्यासोबतच इतर बाबींचीही काळजी घेतली पाहिजे. शारीरिक क्रियाकलाप आवश्यक आहे. चालणे, धावणे, पोहणे यासारख्या क्रिया आपल्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनल्या पाहिजेत. सकाळी योगाभ्यास करणे आवश्यक आहे. दिवसातून ४ तासांच्या अंतराने ४ वेळा खाणे आवश्यक आहे. योग्य आहाराच्या सवयी आणि योग्य दिनचर्या पाळा. सक्रिय राहा आणि आनंदी राहा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT