Dr. Neha Abhijit Patil Health Tips esakal
आरोग्य

Health Tips : उतारवयात दातांची कशी घ्यावी काळजी? डॉ. नेहा पाटील यांच्या 'या' खास टिप्स करा फाॅलो

Dr. Neha Abhijit Patil Health Tips : तोंडाची किंवा मौखिक आरोग्याची (Health) काळजी घेणे, ही आपल्या शरीराची काळजी घेणे यापेक्षा वेगळी नसते.

सकाळ डिजिटल टीम

जसं वय वाढत जाते, तसे दातांची हाडे (Dental Bones) व हिरड्या कमकुवत होत जातात. परिणामी दातांची पकड सैल होऊन जाते. बऱ्याच वेळेला दात झिजलेले असतात.

-डॉ. नेहा अभिजित पाटील

nehathakurrr@gmail.com

तोंडाची किंवा मौखिक आरोग्याची (Health) काळजी घेणे, ही आपल्या शरीराची काळजी घेणे यापेक्षा वेगळी नसते. पण वयोमानानुसार शरीराची, तोंडाची काळजी घेणे बऱ्याच वेळेला कठीण होत जाते. अशा व्यक्तींना जाणवणाऱ्या अडचणी आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळेच या लेखात वयोमानानुसार तोंडात, दातात होणारे बदल व त्यानुसार दातांची काळजी कशी घ्यावी, याबद्दल सांगितलेले आहे.

जसं वय वाढत जाते, तसे दातांची हाडे (Dental Bones) व हिरड्या कमकुवत होत जातात. परिणामी दातांची पकड सैल होऊन जाते. बऱ्याच वेळेला दात झिजलेले असतात. तोंडातील त्वचा सुद्धा नाजूक होते. तोंडातील लाळ ग्रंथींची क्षमता कमी होते. त्यामुळे दातांच्या मुळांना कीड लागण्याचे प्रमाण वाढते. तसेच तोंडामध्ये पांढऱ्या बुरशीचे प्रमाण सुद्धा वाढू शकते. या अशा होणाऱ्या बदलानुसार दातांची नेमकी काळजी कशी घ्यावी?

  • सर्वप्रथम म्हणजे दात स्वच्छ करण्यासाठी मऊ किंवा अति मऊ ब्रशचा वापर करावा.

  • दातांच्या गरजेनुसार फ्लोरिनेटेड टूथपेस्ट किंवा सेंसिटिव्हिटी टूथपेस्ट वापरावी.

  • ब्रश करताना उभ्या पद्धतीने ब्रश करावा (म्हणजेच ब्रश हिरडी पासून विरुद्ध दिशेने करावा)

  • दात घासताना हलक्या हाताने दात घासावेत.

  • दर तीन महिन्यांनी ब्रश बदलावा

  • तसेच जीभ स्वच्छ करण्यास विसरू नये.

जर पॅरालिसिस किंवा इतर काही कारणांमुळे हातातील ताकद कमी असेल, तर इलेक्ट्रिक ब्रशचा वापर करता येऊ शकतो. शक्य झाल्यास रात्री झोपण्यापूर्वी माऊथ रिन्सचा वापर करावा. बऱ्याच वेळेला वयोवृद्ध माणसे दात हलत असतात किंवा दातांशिवाय आपल्याला दिसतात. पण दात हलत असताना अशा दातांनी अन्न चावल्यास ते पूर्णपणे बारीक होत नाही. तसेच दातांशिवाय खाताना सुद्धा अन्नाचे कण बारीक होत नाही. अशा पद्धतीने दातांशिवाय खाणे योग्य आहे का? तर अर्थातच नाही.

जसे वय वाढत जाते, तसेच आपली पचनक्रिया सुद्धा मंदावत जाते. त्यामुळे व्यवस्थित बारीक न झालेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही. अन्नातून जास्तीत जास्त ऊर्जा शरीरापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे शरीराची ताकद कमी होणे, थकवा अशा गोष्टी जाणवतात आणि पचनक्रियेवर सुद्धा भार पडतो. शरीराचे कुपोषण झाले तर इतर आजारांचा सुद्धा धोका संभवतो. त्यामुळे दात नसल्यास, कृत्रिम पद्धतीने दात बसवल्यास (कोणत्याही पद्धतीने काढा-घालायचे किंवा फिक्स) त्याने आपल्या शरीराला त्याचा नक्कीच फायदा होतो.

  • बरेच वयोवृद्ध कवळी वापरताना दिसतात. पण त्या कवळीची काळजी कशी घ्यावी ?

  • कवळी चा वापर नसताना ती नेहमी स्वच्छ डब्यात काढून ठेवावी.

  • डब्यातील पाणी दररोज बदलावे.

  • कवळी तोंडातून काढून ती स्वच्छ पाण्याने धुऊन मगच डब्यात ठेवावी.

  • जशी आपण दातांची स्वच्छता ठेवतो तशीच कवळीची स्वच्छता ठेवणे सुद्धा गरजेचे आहे.

  • कवळीचे दात, प्लेट आतून बाहेरून दोन्ही बाजूंनी स्वच्छ करणे गरजेचे आहे.

  • कवळी स्वच्छ करण्यासाठी वेगळी पावडर, ब्रश सुद्धा बाजारात उपलब्ध आहे त्यांचाही वापर करता येऊ शकतो. नवीन कवळी बनवून घेतली की सुरुवातीच्या काळात सवय होण्यात वेळ लागतो. बराच वेळेला कवळी बनवून घेतली जाते व त्याने नीट चावता येत नाही किंवा सवय नसल्यामुळे ती बराच वेळेला वापरात आणली जात नाही. तर असे न करता थोडा संयम ठेवून कवळी वापरत राहावे, त्याने नक्कीच मौखिक आरोग्यासाठी आणि शरीरासाठी फायदा होईल.

Dr. Neha Abhijit Patil Health Tips

वृद्ध व्यक्तींमध्ये फिक्स दात सुद्धा बसवता येतात. इम्प्लांट पद्धतीने म्हणजे स्क्रू चा वापर करून दात बसवता येतात. अशा प्रकारे दात बसवण्यास वयाची कुठलीही मर्यादा नाही. पण दात कुठल्याही पद्धतीने बसवलेले असावेत आणि त्याची स्वच्छता ठेवता आली पाहिजे. जसे दात खराब झाल्यावर किंवा दात नसल्यास जशा उपचार पद्धती आहेत, तसेच वयोमानानुसार दात खराब होऊ नये यासाठी सुद्धा प्रतिबंधात्मक उपचार पद्धती आहेत. त्याचा वापर करून दातांचे आयुष्य जास्तीत-जास्त वाढवता येऊ शकते. परिणामी त्यामुळेच सुदृढ आयुष्य मिळू शकते.

(डॉ. स्वस्तिक हॉस्पिटल रत्नागिरी येथे दंतविकार तज्ज्ञ व हिरडी शल्यचिकित्सक तज्ज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: अशोक खरातच्या मुलाने दिली धक्कादायक कबुली... आई कुणाकडे पैसे द्यायची? उत्तर ऐकून पोलिसही चक्रावले

Gold Rate Today: युद्धाचा परिणाम! सोन्याच्या भावात मोठी उलथापालथ; पाहा ताजे भाव

Solapur Car Accident : पहाटे भीषण अपघात ! कार कॅनॉलमध्ये कोसळली, जावई बचावला मात्र पत्नीसह सासू-सासऱ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Latest Marathi News Live Update : साखरपा येथे खाजगी प्रवाशी ट्रॅव्हल्स जळून खाक, मोठा अनर्थ टळला

Good Friday 2026: आज 'हॅपी गुड फ्रायडे' का म्हणत नाहीत? जाणून घ्या यामागचं खरं कारण आणि इतिहास

SCROLL FOR NEXT