आरोग्य

Health Care News: पाणी पिण्यासाठी एकच बॉटल अनेकदा वापरता? ही सवय ठरू शकते आरोग्यासाठी घातक

तुम्ही एकाच बॉटलनी पाणी पिता तर सावधान!

Aishwarya Musale

बर्‍याच वेळा असं घडतं की आपण एकाच ग्लासातील किंवा बाटलीमधील पाणी अनेक वेळा पीत असतो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एकाच भांड्यातील पाणी अनेक वेळा प्यायल्याने शरीरावर याचे वाईट परिणाम होतात. यामुळे अनेक आजार होतात.

अनेकदा लोक बाहेर जातात किंवा ऑफीसला जातात तेव्हा सोबत पाण्याची बॉटलसुद्धा घेऊन जातात. काही लोक घरीसुद्धा त्याच बॉटलनी पाणी पितात. अनेकदा लोक पाण्याच्या बॉटल रीयूज करतात.

आपण एकाच ग्लासातून किंवा बाटलीतून अनेक वेळा पाणी पितो हे बहुतेकजण मान्य करतील. आता याचे कारण केवळ आळशीपणा नसून माहितीचा अभाव देखील असू शकतो. होय, एकाच भांड्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे अनेकांना माहीत नसेल.

एकाच ग्लासमधून पाणी अनेक वेळा प्यायल्यास अत्यंत संसर्गजन्य विषाणू काचेच्या वरच्या भागावर जमा होतात आणि या ग्लासातील पाणी प्यायल्याने हे संसर्गजन्य विषाणू पोटात जातात, त्यामुळे उलट्या आणि जुलाब सारखे आजार होऊ लागतात.

यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे पोटाच्या विकारासाठी हे अधिक धोकादायक असतं. आतड्यांचे आजारालाही हे बॅक्टेरीया निमंत्रण देतात.

यात महत्त्वाचं म्हणजे प्लास्टीक बॉटलनी पाणी पिणे सहजा टाळावे. कारण प्लास्टीक बॉटलनी पाणी पिणे शरीरासाठी आणि विशेष म्हणजे आरोग्यासाठी योग्य नसतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुण्याची वाहतूक बदलणार! एचसीएमटीआर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, ‘पाताळलोक’साठी तज्ज्ञांकडून सर्वेक्षण

Shirgaon Sarpanch Killed : पतीचं दीड वर्षापूर्वी निधन, लग्नासाठी तगादा लावला म्हणून प्रियकरानं सरपंचाला संपवलं, रात्रभर कारच्या डिकीत मृतदेह ठेवून 500 किमीचा केला प्रवास

Latest Live Updates Marathi : केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसचा विरोध

आणि प्रवीण तरडेंनी कुशल बद्रिकेला सणसणीत कानफडात लगावली; अभिनेत्याने स्वतः सांगितलं काय घडलं

Ujani Dam: निम्माही पाऊस नाही, तरी उजनी धरण फुल्ल! १६ दरवाजे उघडले, भीमेत ४० हजार क्युसेक विसर्ग

SCROLL FOR NEXT