Monsoon Health Precautions to Avoid Mosquito-Borne Diseases: बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता इमरान हाश्मी याला नुकताच डेंग्यू झाल्याचे समोर आले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच देशात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागते, त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे. इमरान सध्या तेलुगू चित्रपट 'ओजी'च्या शूटिंगमध्ये व्यस्त होता, याच दरम्यान त्याला थकवा आणि ताप यासारखी लक्षणे जाणवली. तपासणीनंतर त्याला डेंग्यू झाल्याचे निदान झाले. काही काळासाठी चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले असून, सध्या इमरान विश्रांती घेत आहेत.
परंतु हा रोग कोणालाही होऊ शकतो. विशेषतः पावसाळ्यात ही शक्यता अधिक असते. त्यामुळे डेंग्यूची लक्षणे ओळखणे आणि प्रतिबंधात्मक उपाय माहित असणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचणे, त्यामुळे डासांचा संचार होणे हे प्रकर्षाने होते. यामुळे विविध प्रकारचे आजार देखील डोके वर काढतात. वातावरणातील बदल, ओलावा आणि साचलेलं पाणी यामुळे संसर्गजन्य रोग वेगाने पसरतात. ताप, सर्दी-खोकला, त्वचेचे संक्रमण, टायफॉईड, कॉलरा यांसारख्या आजारांसोबतच डेंग्यू हा एक गंभीर आजार पावसाळ्यात अधिक आढळतो.
विशेषतः डेंग्यू डासांमुळे होणारा आजार आहे आणि पावसाळ्यात डासांची संख्या लक्षणीयरीत्या वाढते. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची तब्येत जपणे आवश्यक आहे. योग्य स्वच्छता, पाण्याचे योग्य व्यवस्थापन, पोषक आहार आणि वेळच्यावेळी वैद्यकीय सल्ला घेणे, ही काळजी पावसाळ्यात अत्यंत महत्त्वाची आहे.
साचलेले पाणी टाळा
घरात किंवा आजूबाजूला कुठेही पाणी साचू देऊ नका. कूलर, बादल्या, फुलपात्रे, जुने टायर, पाळीव प्राण्यांची भांडी या सगळ्या ठिकाणी नियमितपणे पाणी बदलणे किंवा कोरडे ठेवणे आवश्यक आहे.
मच्छरदाणी आणि नेटचा वापर
झोपताना मच्छरदाणी लावा आणि खिडक्या-दारांवर जाळ्या बसवा. डास दिवसाही चावू शकतात, हे लक्षात ठेवा.
पूर्ण अंग झाकणारे कपडे घाला
विशेषतः सकाळ आणि संध्याकाळी लांब बाह्यांचे कपडे आणि पाय झाकले जातील अशा पद्धतीचे कपडे वापरा.
घर व परिसर स्वच्छ ठेवा
पावसाळ्यात घाणीमुळे संसर्गजन्य आजार सहज पसरतात. त्यामुळे दररोज झाडून पुसून घेणे, कचरा व्यवस्थापन आणि नाल्यांची साफसफाई महत्त्वाची आहे.
प्रतिकारशक्ती वाढवा
ताजी फळे, भाज्या, पुरेशी झोप, भरपूर पाणी आणि स्वच्छ आहार यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहते.
आरोग्याबाबत जागरूक राहा
थोडी जरी अस्वस्थता वाटली तरी डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेवर निदान आणि उपचार केल्यास आजार गंभीर होण्यापासून टाळता येतो.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.