Heatstroke Prevention Tips
Heatstroke Prevention Tips Sakal
आरोग्य

Heatstroke: शरीरातील पाण्याची पातळी ठेवा कायम; उष्माघातापासून होईल संरक्षण

सकाळ डिजिटल टीम

Heatstroke: फेब्रुवारी महिना संपला की वातावरणात उष्णता निर्माण होते. मार्च ते जून या काळात प्रचंड उन तापते. शरीरातून घामाच्या धारा लागतात. त्यामुळे घामावाटे शरीरातून सोडियम पोटॅशियम, पाणी बाहेर टाकलं जातं आणि जीवनघटकांचा नाश होतो. याचे दुष्परिणाम शरीरावर होऊन क्षयरोग, गोवर, कांजण्या, नागिणसारखे विकार होण्याचा धोका होतो. विशेषतः शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे उष्माघाताचाही धोका संभवतो. त्यामुळे नागरिकांनी शरीरातील पाण्याची पातळी कमी होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे आहारतज्ज्ञ डॉ. रेणुका माईंदे यांनी सांगितले. (Heatstroke Prevention Tips)

उन्हाळ्यातील वाढती उष्णता आणि कोरडे उष्ण वारे यामुळे शरीराला उच्च तापमानाचा सामना करण्यासाठी आहारात बदल गरजेचे आहे. शरीरातील अंतर्गत तापमानाचा समतोल सांभाळणे आवश्यक आहे. मात्र, उन्हाळ्यात कमी श्रमात ऊर्जा खर्च होते. शरीरातील इतर प्रक्रियांमधून ऊर्जेचा ऱ्हास होतो. यामुळे शरीर थंड ठेवणे आवश्यक असल्याचेही डॉ. माईंदे यांनी सांगितले. (Maintain body water level; Will protect from heatstroke)

उन्हाळ्यातील आहार-

  • ताक, काकडी, कोकम शरबत, लिंबू पाणी, नारळाचे पाणी

  • दही, दूध, बटर

  • सातूचे पिठ दुधामध्ये घेणे

  • कच्चा कांदा व कांद्याचे लोणचे, कोशिंबीर

  • कच्च्या आंब्यापासून बनवलेले पेय (पन्ह)

  • टरबूज, कस्तुरी खरबूज, नासपती, पपई, बेरी, जर्दाळू, चेरी, आंबा, संत्री आदी फळांचे सेवन

  • कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह आणि फ्लेव्होनाॅइड्स लोह असलेल्या पालेभाज्या

  • व्हिटॅमिन-ए युक्त घोळीची भाजी आहारात असावी

  • काकडीमध्ये ९४ टक्के पाणी असते. व्हिटॅमिन सी भरपून असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. यामुळे आहारात काकडी असावी.

हे टाळावे-

  • घरून बाहेर निघताना खूप थंड पाणी पिणे टाळावे

  • शरबतामध्ये जास्त साखर घालू नये

  • मधुमेहींनी पिकलेल्या आंब्याचा आहारात समावेश टाळावा

  • मसालेदार तळलेले पदार्थ खाणे टाळावे

उन्हाळ्यातील त्रास-

  • सर्वांगाचा दाह होणे

  • अतिसाराची लागण

  • लघवीत जळजळ

  • उलटी, डोकेदुखी

  • घामामुळे त्वचारोग

  • त्वचा काळसर पडणे

उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरात पाण्याचं प्रमाण कमी झाल्याने मळमळ तसेच अतिसारा- चाही त्रास होतो. घराबाहेर पडताना तोंडाला रुमाल बांधा. अंग झाकून घ्या. सुती आणि सैल कपडे वापरावे. त्वचा कोरडी पडू नये म्हणून उन्हाळ्यात जास्तीतजास्त पाणी प्यावे, आहारतज्ञ डॉ. रेणुका माईंदे म्हणाल्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drought : राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र! दहा हजारांवर गावे, वाड्यांत दुर्भिक्ष; सरकारची डोळेझाक

RBI : रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारला मिळणार सर्वोच्च लाभांश

Arvind Kejriwal : खासदार स्वाती मालिवाल प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

Marathi Student : मराठी विद्यार्थ्यांना परत आणा; किर्गिझस्तानमध्ये राज्यातील ५०० जण अडकल्याची भीती

Water Supply : हरियाना सरकारने रोखले दिल्लीचे पाणी; आतिशी मार्लेना यांचा भाजपवर आरोप

SCROLL FOR NEXT