Health Tips पपईच्या अतिसेवनाचे तोटे Esakal
आरोग्य

Health Tips पपई खाण्याचे Side Effects तुम्हाला ठाऊक आहेत का? आरोग्यासाठी हानिकारकही ठरू शकतं पपईचं सेवन

Health Tips काही वेळा किंवा काही आरोग्याच्या इतर समस्या असल्यास पपईचे फायदे होण्याएवजी आरोग्यासाठी ते नुकसानदायक ठरू शकतं. तसंच पपईचं अतिप्रमाणात सेवनही आरोग्यासाठी घातक ठरू शकतं

Kirti Wadkar

Health Tips पपई या फळाचे आजवर तुम्ही असंख्य फायदे ऐकले असतील. पपईमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि फायबर उपलब्ध असतं. त्याचसोबत पपईमध्ये नियासिन, मॅग्नेशियम सारख्या पोषक तत्वांसोबतच मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स उपलब्ध असतात. यासाठीच पपईचं सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. Marathi Health Tips Papaya also Can be harmful to your health

वजन कमी करण्यासाठी तसंच निरोगी हृदयासाठी पपईचं Papaya सेवन उपयुक्त ठरतं. पपईच्या सेवनामुळे अपचनाच्या Indigestion समस्या दूर होवू शकतात. तसंच त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी पपई खाणं गरजेचं आहे.

पपईचे अनेक फायदे असले तरी काही परिस्थितींमध्ये पपई खाणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.

काही वेळा किंवा काही आरोग्याच्या इतर समस्या असल्यास पपईचे फायदे होण्याएवजी आरोग्यासाठी ते नुकसानदायक ठरू शकतं. तसंच पपईचं अतिप्रमाणात सेवनही आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.

किडनी स्टोन- अनेकजण रिकाम्यापोटी पपईचं नियमितपणे सेवन करतात. पपई आरोग्यासाठी चांगलं असलं तरी पपईचं रिकाम्या पोटी जास्त प्रमाणात सेवन केल्यास किडनी स्टोन Kidney Stone म्हणजेच मूतखडा होण्याची शक्यता वाढते.

पचनसंस्थेवर परिणाम- पपईच्या सेवनामुळे पचनाच्या समस्या दूर होत असल्या तरी रिकाम्या पोटी सकाळच्या वेळी जास्त प्रमाणात पपईचं सेवन केल्यास गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सिस्टीम खराब होवू शकते. ज्यामुळे पोटामध्ये वेदना निर्माण होणं किंवा छातीत जळजळ अशा समस्या उद्भवू शकतात.

हे देखिल वाचा-

अॅलर्जीची समस्या वाढू शकते- जर तुम्ही जास्त प्रमाणात पपईचं सेवन केलं तर अॅलर्जीची समस्या निर्माण होवू शकते. यामुळे डोकेदुखी, चक्कर येणं, सूज तसंच त्वचेवर रॅशेस किंवा खाज येऊ शकते. ज्या व्यक्तींना लेटेक्सची अॅलर्जी आहे अशा व्यक्तींनी पपई खाणं टाळावं.

श्वसनाचा त्रास- पपईमध्ये पपेन नावाचं संयुग उपलब्ध असतं ज्यामुळे काही एलर्जी होवू शकतात. जास्त प्रमाणात पपईचं सेवन केल्यास श्वास घेण्यास त्रास होवू शकतो. त्यामुळे पपईचं सेवन नियंत्रणात करणं गरजेचं आहे.

गरोदर आणि स्तनपान कऱणाऱ्या महिलांनी पपईचं सेवन टाळावं

गरोदर महिलांसाठी पपईचं सेवन हानिकारक ठरू शकतं. पपईमध्ये लॅटेक्सचं प्रमाण जास्त असल्याने गर्भाशयाच्या पदरांना इजा होवू शकते. तरसं पपईमधील पेपेनमुळे पेशींच्या पडद्याचं नुकसान होवू शकतं. या पेशी गर्भाच्या विकासासाठी गरजेच्या असल्याने बाळाच्या वाढीवर परिणाम होवू शकतो.

अशा प्रकारे पपईचे आरोग्यासाठी फायदे असले तरी काही तोटे देखील आहेत. त्यामुळेच जर तुम्हाला आरोग्याच्या काही समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT