Monsoon Joint Pain esakal
आरोग्य

Monsoon Joint Pain : बदलत्या वातावरणात सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो? 'या' सोप्या टिप्सच्या मदतीने मिळवा आराम

Monsoon Joint Pain : हवामानातील बदलांमुळे सांधेदुखीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते.

Monika Lonkar –Kumbhar

Monsoon Joint Pain : देशातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पावसाळा म्हटलं की, वातावरणात आर्द्रता आणि दमट वातावरण निर्माण होते. या बदलत्या वातावरणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.

हवामानातील बदलांमुळे सांधेदुखीची समस्या वाढते. वातावरणातील हवेचा दाब कमी असल्याने सांधेदुखीचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असते. खास करून वयोवृद्ध व्यक्तींना याचा अधिक त्रास संभवतो. या सांधेदुखीमुळे दैनंदिन कामे करताना लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. खास करून उठताना आणि बसताना ही समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवते.

सांधेदुखीमागे इतरही अनेक कारणे आहेत. ज्यामुळे, तरूणाई देखील या समस्येला बळी पडत आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे बैठी जीवनशैली होय. सक्रिय जीवनशैलीच्या अभावामुळे सांध्यांशी संबंधित समस्या देखील उद्भवतात. त्यामुळे, पावसाळ्यात सांधे निरोगी ठेवण्यासाठी आणि सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात त्या टिप्सबद्दल.

हॉट-कोल्ड थेरपी

सांधेदुखीच्या वेदना कमी करण्यासाठी तुम्ही आईस पॅक किंवा गरम पाण्याच्या पिशवीची मदत घेऊ शकता. याला हॉट-कोल्ड थेरपी असे म्हटले जाते. तुमच्या सांध्यांमध्ये जर तीव्र वेदना होत असतील तर या थेरपीची नक्की मदत घ्या.

यामुळे, तुम्हाला सांधेदुखीपासून आराम मिळू शकेल. गरम पाण्याच्या पिशवीमुळे सांध्यांमधील कडकपणा कमी होतो आणि वेदनांपासून आराम मिळतो. तसेच, कोल्ड थेरपीमुळे सांध्यांमधील वेदना अधिक प्रमाणात जाणवत नाहीत.

व्यायाम करा

सांधेदुखीच्या वेदना कमी करण्यासाठी व्यायाम करणे अतिशय महत्वाचे आहे. कारण, कमी शारिरीक हालचालींमुळे सांध्यांमधील कडकपणा वाढू शकतो, त्यामुळे, वेदना वाढतात. या वेदना कमी करण्यासाठी रोज व्यायाम करा. पावसाळ्यामुळे तुम्हाला घराबाहेर पडणे शक्य नसेल तरी तुम्ही घरच्य घरी व्यायाम नक्कीच करू शकता.

संतुलित आहार घ्या

शरीरातील हाडांच्या बळकटीसाठी आणि स्नायूंच्या मजबूतीसाठी कॅल्शिअम, प्रथिने आणि व्हिटॅमिन डी महत्वाचे आहे. त्यामुळे, आहारात कॅल्शिअम, व्हिटॅमिन डी आणि प्रथिनांनीयुक्त असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश जरूर करा. तसेच, व्हिटॅमिन बी १२ आणि मॅग्नेशिअमने समृद्ध असलेले खाद्यपदार्थ खा. यामुळे, सांधे मजबूत होतील आणि वेदनांपासून आराम मिळेल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT