Navratri 2023 esakal
आरोग्य

Navratri 2023 : नऊ दिवसांच्या उपवासानंतर लगेच या 5 गोष्टी खाऊ नका, आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम

आज आपण आहारतज्ज्ञ दिव्या गांधी यांच्याकडून याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

साक्षी राऊत

Navratri 2023 : काही लोक नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतात. ज्यामुळे शरीर चांगल्याप्रकारे डिटॉक्स झाले असते. या नऊ दिवसांत काही लोकांचे वजनसुद्धा कमी करते. नवरात्रीच्या नऊ दिवसांत बहुतांश लोक हलकं फुलकं खातात. ज्यामुळे शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. हृदयाचे आरोग्यही चांगले राहते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो. त्यामुळे उपवास ठेवणे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते.

मात्र उपवास सोडताच अनेक लोक अनहेल्दी पदार्थ खाण्यास सुरुवात करतात. अनेक लोकांना उपवासानंतर आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करून घ्यावा याची कल्पना नसते. तेव्हा आज आपण आहारतज्ज्ञ दिव्या गांधी यांच्याकडून याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

तिखट जेवण

नवरात्रीच्या दिवसांत बहुतेक लोक हलका आहार घेतात. त्यामुळे हळू हळू नऊ दिवसांत आपल्या शरीराला त्याची सवय होऊ लागते. अशात उपवास संपताच तुम्ही लगेच तिखट पदार्थ खाऊ नका. यामुळे छातीत जळजळ आणि पोटदुखीच्या समस्या उद्भवतात.

फास्ट फूड

उपवास सुटल्यानंतर फास्ट फूड खाऊ नका. उपवासाच्या दिवसांत शरीरातील सगळे टॉक्झिन्स बाहेर पडतात. अशात तुम्ही फास्ट फूड खाल्ल्यास तुम्हाला पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

प्रोसेस्ड फूड

नवरात्रीच्या उपवासात ब्लड शुगर लेव्हल कमी झालेली असते. अशात ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे अशा रूग्णांनी प्रोसेस्ड फूड खाऊ नये. प्रोसेस्ड फूडमध्ये शुगर, सोडियम आणि फॅट भरपूर असते. याचे सेवन केल्यास तुमचे आरोग्य बिघडू शकते. मधुमेहाच्या रूग्णांसाठी प्रोसेस्ड फूड योग्य मानले जात नाही.

उपवासानंतर काय खावे?

उपवास सोडल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांत हलके जेवण जेवा. यात फळांचा, नारळ पाणी आणि व्हेजिटेबल सूपचा समावेश करून घ्या.

उपवासानंतर तुम्ही फळांमध्ये केळी, डाळींब आणि सफरचंद यांसारखी फळे खाऊ शकता.

उपवासानंतर दही खाणे फार महत्वाचे आहे. दही प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

SCROLL FOR NEXT